"श्रीनिवास खळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४६:
 
श्रीनिवास खळे यांनी फारशा चित्रपटांना संगीत दिलेले नसले तरी भावगीत-भक्तिगीत हे प्रकार भरपूर हाताळले आहेत. त्यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली जवळजवळ १००० हून जास्त गायक गायिकांनी गाणी गायलेली आहेत. पंडित [[भीमसेन जोशी]], [[सुधीर फडके]], [[वसंतराव देशपांडे]], [[लता मंगेशकर]], [[आशा भोसले]], [[सुमन कल्याणपूर]], [[माणिक वर्मा]], [[सुलोचना चव्हाण]] पासून ते [[हृदयनाथ मंगेशकर]], [[उषा मंगेशकर]], [[अरुण दाते]], [[सुधा मल्होत्रा]], [[सुरेश वाडकर]], [[देवकी पंडित]], [[कविता कृष्णमूर्ती]], [[शंकर महादेवन]] यांच्यापर्यंत कैक नामवंतांनी खळेसाहेबांच्या दिग्दर्शनाखाली गाणी गायलेली आहेत. त्यांतली प्रसिद्ध गाणी: लताने गायलेले १) भेटी लागी जीवा अथवा २) वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरेसारखे तुकारामाचे अभंग; अथवा १) नीज माझ्या नंदलाला २) श्रावणात घननीळा बरसला सारखी मंगेश पाडगावकरांची भावगीते; भीमसेन जोशींनी गायलेले १) सावळे सुंदर रूप मनोहर २) राजस सुकुमार मदनाचा पुतळा सारखे अभंग; अथवा सुरेश फडके यांचे लळा जिव्हाळा शब्दच खोटे सारखे चित्रपटगीत; वसंतराव देशपांड्यांनी गायलेले १) बगळ्यांची माळ फुले २) राहिले ओठातल्या ओठात वेडे; आशा भोसले यांचे १) कंठातच रुतल्या ताना २) टप्‌ टप्‌ टप्‌ टप्‌ काय बाहेर वाजतंय ते पाहू.
त्यांची गाजलेली अजून काही गाजलेली गीते पुढील प्रमाणे-
१)हृदयनाथ मंगेशकर........ १) वेगवेगळी फुले उमलली २) लाजून हासणे अन्‌
२)अरुण दाते/सुधा मल्होत्रा.... १) शुक्रतारा मंद वारा २) हात तुझा हातातुन धुंद ही हवा