"विकिपीडिया:चावडी/व्यवस्थापन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
या पानाचा उद्देश चावड्यांचे स्वरूप विदागारांचे व्यवस्थापन या बद्दल माहिती संकलीत करणे व संब
 
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
 
या पानाचा उद्देश चावड्यांचे स्वरूप विदागारांचे व्यवस्थापन या बद्दल माहिती संकलीत करणे व संबधीत चर्चेचे विदागारीकरण (अर्काईव्हींग) करणे असा आहे.
 
 
 
::'''मराठी विकिपीडियाला नवीन दिशा आणि बळ '''
 
::नमस्कार अभय,
 
:: मी अशा आशयाचे पान करण्यास आणि सांभाळण्यास तयार आहे. काय करायचे ते सुचवा.[[ सदस्य चर्चा:Rahuldeshmukh101 | राहुल देशमुख ]] १४:२७, २३ जून २०११ (UTC)
 
:::राहुल,
:::[[विकिपीडिया:चावडी/धोरण चर्चा]] किंवा तत्सम नावाचे पान तयार करणे.
:::येथील प्रत्येक सूचना/मुद्दा घेउन त्यासाठी नवीन पानावर एक विभाग तयार करणे.
:::तेथे चर्चा सुरू असताना लक्ष ठेवून तेथील अडगळ काढणे, सदस्यांना मार्गदर्शन करणे.
:::या पानाबद्दल चावडीवर वरचेवर आठवण करुन देणे.
:::इतके मला आठवते आहे. इतरांनीही यात भर घालावी.
:::[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] १४:३९, २३ जून २०११ (UTC)
 
::::* नव्या चावडीस ''' विकिपीडिया:चावडी (ध्येय आणि धोरणे)''' असे नामकरण करावे का?
 
::::* येथील प्रत्येक सूचना/मुद्दा घेउन त्यासाठी नवीन पानावर एक विभाग तयार करणे. -अभय नातू , हे थोडे अधिक विशारद करा (म्हणजे सूचना/मुद्दा आल्या नंतर नवीन पान करायचे किंवा कसे?)
::विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे असे करावे म्हणजे ते उपपान होईल. प्रत्येक मुद्द्यासाठी नवीन पान अपेक्षित नाही. पण पान खूप मोठे झाले तर मग त्याची दोन-तीन पाने नंतर करू.
::[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ०५:२७, २४ जून २०११ (UTC)
::>>>>>>> स्ल्याश (/) च्या ऐवजी दुसरे काही चिन्ह वापरता येईलका ? जसे (-), (:-) वैगरे . स्ल्याश थोडा तांत्रिक होतो. [[ सदस्य चर्चा:Rahuldeshmukh101 | राहुल देशमुख ]] ०५:४७, २४ जून २०११ (UTC)
 
 
 
::::इतरांच्याही सूचना/प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत [[ सदस्य चर्चा:Rahuldeshmukh101 | राहुल देशमुख ]] १७:५१, २३ जून २०११ (UTC)
 
 
 
::::* <big>''''सूचना संकेत ''''</big>
 
::::नवीन होऊ घातलेल्या चावडीवर ('''विकिपीडिया:चावडी (ध्येय आणि धोरणे)''')वाचकांना सुलभ जावे म्हणून काही सूचक साचे वापरावेत असे वाटते. सूचक साच्यांच्या मालिकेतील पहिला साचा, '''साचा:सूचना संकेत ''' बनवला आहे. जर हि कल्पना ग्राह्य असेल तर इतरही साचे त्वरित बनून उपलब्ध करता येतील
 
::::{{साचा:सूचना संकेत}}
::::- प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत [[ सदस्य चर्चा:Rahuldeshmukh101 | राहुल देशमुख ]] १९:४५, २३ जून २०११ (UTC)
 
=== विकिपीडिया:चावडी (ध्येय आणि धोरणे) ===
==== लोगो ====
:::::* <big>'''लोगो (स्मुती चिन्ह -चावडी (ध्येय आणि धोरणे)) '''</big>
 
::::: विकिपीडिया:चावडी (ध्येय आणि धोरणे) ह्या नवीन होऊ घातलेल्या चावडी साठी लोगो तयार केला आहे. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत [[ सदस्य चर्चा:Rahuldeshmukh101 | राहुल देशमुख ]] ०४:४०, २४ जून २०११ (UTC)
 
<gallery>
चित्र:Dheya.JPG|'''ध्येय आणि धोरणे'''
</gallery>
 
==== लोगोतील अक्षरे ====
या लोगोत रंगीत जिगसॉ तुकड्यांवरची "एलजीबीटी" ही अक्षरे नेमकी कुठल्या कारणाने मराठी विकिपीडियाशी संबंधित आहेत, ते कळले नाही. किंबहुना हे चित्र जर कॉमन्स किंवा अन्य ठिकाणाहून उचलले असेल, तर "एलजीबीटी" = "लेस्बियन गे बायस्क्शुअल ट्रान्सजेंडर" अर्थात "लेस्बियन गे उभयलैंगिक लिंगांतरित" माणसांच्या गटांना उल्लेखण्यासाठी इंग्लिश भाषेत वापरण्यात येणारे लघुरूप असायची शक्यता अधिक दिसते. शिवाय, या तुकड्यांवर सप्तरंग दाखवले आहेत; ते मानवी समाजातील अभिरुचि-वैविध्य अधोरेखित करण्यासाठी लेस्बियन-गे-उभयलैंगिक-लिंगांतरित व्यक्तींच्या सामाजिक व कायदेशीर हक्कांसाठीच्या चळवळीत वापरले जातात. मराठी विकिपीडियाचा या चळवळींशी थेट संबंध येत नसल्याने, सध्याचा लोगोप्रस्ताव संदिग्ध वाटतो.
 
:--[[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड]] ([[सदस्य चर्चा:Sankalpdravid|चर्चा]] | [[विशेष:योगदान/Sankalpdravid|योगदान]]) ०२:२७, २५ जून २०११ (UTC)
 
 
 
संकल्प, सूचना/प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद. लोगो विकसित होतो आहे. हो मूळ विकी ग्लोब हा कॉमन्स वरूनच घेऊन पुढे विकसित करीत आहो. क्रिएटीव कॉमन्स डेरिव्हेटिव अंतर्गत आपण तो विकसित करण्यास नियमानुसार अडचण नसावी असे वाटते.
 
*संकल्पना :- लोगो मध्ये चावडी (ध्येय आणि धोरणे) प्रतिबिंबित करण्याचा दृष्टीने विपी चा ग्लोब दाखवला आहे आणि त्यास दोन रंगारी शिडीवरून सप्तरंग रंगवतांना दाखवले आहे.
 
*अर्थबोध :-
# मूळतः विपी हा कृष्ण धवल दाखवला आहे
# विपीला रंगवणे हे नूतनीकरन/बदलावाचे प्रतिक आहे
# रंगकाम वरील भागापासून सुरवात करून अपूर्ण अवस्थेत हे दर्शवते कि ध्येय ठरवण्याचे उद्दिष्ट आहे.
# सप्तरंग हे सर्वतर्हेच्या नवीन विचारांचे प्रतिनिधित्व करतात
# तर शिडी हि प्रगती आणि धोरण/दिशा दाखवते
# देन रंगारी हे सामुदाईक प्रयत्नांचे निरुपण करतात
 
लोगोत रंगीत जिगसॉ तुकड्यांवरची अक्षरे बदलवायची आहेत. चार अक्षरे द्यावी लागतील पण ती काय असावी येथे काम अडले आहे समर्पक अक्षरावर मी विचार करतो आहे ( चावडी, ध्येय -धोरणे , मराठी आदी. पर्याय बाद झाले कारण चारच अक्षरे हवी ) आपणास काही सुचले तर कळवा. स्लोगन सर्वानुमते मान्य झाला तर तोहि तळाशी लिहावा असे वाटते.- [[ सदस्य चर्चा:Rahuldeshmukh101 | राहुल देशमुख ]] १९:५८, २५ जून २०११ (UTC)
 
===अक्षरे===
काही उमेदवार
* अ, क किंवा ग - पहिले अक्षर/वर्ण
* म - मराठी
* ज्ञ - ज्ञान, शेवटचे अक्षर/वर्ण
[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] २१:२२, २५ जून २०११ (UTC)
 
==लोगोतील अक्षरे==
गमभन ही चार अक्षरे मराठी लेखनाचे प्रतीक आहेत. देवनागरी लिपी जरी इतर काही भाषा वापरत असल्या तरी गमभन ही संकल्पना त्यांच्यात असल्याचे ऐकिवात नाही. हीच चार अक्षरे लोगोवर असावीत....[[सदस्य:J|J]] १४:२६, २६ जून २०११ (UTC)
 
:::::*<big>'''सूचकवचन (नारा/ स्लोगन)'''</big>
:::::विकिपीडिया:चावडी (ध्येय आणि धोरणे) ह्या नवीन होऊ घातलेल्या चावडी साठी सूचकवचन (नारा/ स्लोगन) सुचवीत आहे. इतरही सदस्यांच्या सूचनांचे स्वागत आहे.[[ सदस्य चर्चा:Rahuldeshmukh101 | राहुल देशमुख ]] ०५:३६, २४ जून २०११ (UTC)
 
. <big>'''"मराठी पाऊल पडते पुढे..."'''</big>
::आत्तापर्यंत समर्थ रामदासांचे '''आपणासी जे जे ठावें, ते दुसर्‍यांसी सांगावे, शहाणे करूनी सोडावे, सकलजन.''' हे बोधवाक्य म्हणून वापरलेले आहे. हे विकिपीडियाच्या तत्त्वाला अगदी १००% जुळून आहे. आता यालाच आपले ऑफिशियल बोधवाक्य करावे हा माझा प्रस्ताव.
::[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] २१:२६, २५ जून २०११ (UTC)
 
:: छान. त्यातही शहाणे करूनी सोडावे सकलजन ही अर्धी ओळ गाळावी असा माझा प्रस्ताव. कारण शहाणे करून सोडायची जबाबदारी विकिपीडिया घेत नाही. पहिल्या दोन चरणांचेच काम येथे चालते (हलकेच घ्यावे) -[[सदस्य:मनोज|मनोज]] ०६:३८, २० जुलै २०११ (UTC)
 
:छान आहे.नवीन चावडी उपपानाचे मी स्वागतच करतो, पण आपल्याकडे [[विकिपीडिया:चावडी/प्रगती]] असे एक पान आधी पासून तत्सम चर्चेकरिता वापरले गेले आहे त्या पानाचे भविष्य काय असेल. दुसरे असे की विकिपीडिया:चावडी (ध्येय आणि धोरणे) करिता स्ट्रॅटेजी विकि वर जशी थ्रेड डिस्कशनची सोय आहे तसे तेवढ्या एका पाना करिता करणे जमण्या सारखे आहे का ? [[सदस्य:Mahitgar|माहितगार]] ०५:५५, २४ जून २०११ (UTC)
 
 
:माहितगार,
:''कॉमन्स सारख्या काही विकिंवर खूप सार्‍या सूचना स्वागत साचात दिल्या आहेत , तसा प्रयत्न करून पहावयास माझी ना नाही पण फळाबद्दल मला साशंकता वाटते.या पेक्श्ःआ भर सदस्य विकिपीडियावर येण्या पूर्वीच साप्ताहिके दृक्श्राव्य माध्यमे आणि पॉवरपाँईट प्रेझेंटेश आणि कार्यशाळातून सजग करता आले तर येथे येणार्‍या अडचणींचे प्रमाण कमी राहील.''
:>>माझ्या मते असे केल्यास एकाच ठिकाणाहून बर्‍याच माहितींकडे जाणारे दुवे मिळाल्याने नवीन सदस्यास बरे वाटेल. एका दुव्यावर जाउन मग आणखीन दुसर्‍या दुव्यावर जा, जर हवी ती माहिती मिळाली नाही तर तिसर्‍या ठिकाणी जा, असे करायला सामान्यत: नवा सदस्य नाखूष असतो. अशा वेळी खूप सूचना स्वागत साच्यात दिल्याने सदस्य खूष होण्याची शक्यता आहे. परंतु अति सूचना देण्याने सदस्य घाबरून न वाचण्याचीही शक्यता आहे.
:''संपादन संख्येवर आधारीत आपोआप पाठविल्या जाणार्‍या सहाय्यता संदेशांची सोय विकि सॉफ्टवेअर मध्येच असावी असा मुद्दा मी बगझीलावर मांडलेला आहे अर्थात ते काम होईल का नाही आणि झालेतर केव्हा हा लांबचा प्रवास आहे.''
:>>हा मुद्दा आपण बगझीलावर कधी मांडला आणि त्यावर काम होईळ की नाही किंवा झाले की नाही हे इतर सदस्यांस (उदा. मला) कसे समजू शकेल? त्यासाठी बगझीलावर एखादे पान आहे काय?
:पण स्वागत प्रकल्पात संपादन संख्येवर आधारीत काही संदेश मी उपलब्ध केले आहेत त्यात सुधारणा आणि वापर करण्यास स्वयंसेवकांची आवश्यकता आहे.
:>>हे संदेश मला कुठे पहावयास मिळतील आणि त्यात कायकाय सुधारणा अपेक्षित आहेत?
:''हा मुद्दा स्ट्रॅटेजी विकिवर आधीच मांडला गेला असल्यास पहावा नसल्यास तेथे मांडावा सोबतच बगझीलावरही हि बाब मांडता येईल पण बगझीला वर मांडण्यापूर्वी मराठी विकिसदस्यांची सहमती असल्याचे कौल घेऊन सिद्ध करून द्यावे लागेल.''
:>>स्ट्रॅटेजी विकि हा काय प्रकार आहे? मला त्याचा दुवा मिळेल का? आणि बगझीलावर विनंती कशी मांडता येईल? सध्या चावडीअंतर्गत ध्येयधोरणाचे नवे पान त्यार झाल्यावर आपण कौल घेउ.
:''या संबधाने मी आणि संकल्पने दोन वेगवेगळे प्रकल्प निर्माण केले आहेत पण त्यात सध्यातरी आमच्या आमच्या प्रकल्पात आम्ही दोघेच काम करतो :). इमेलच्या तळाशी माहिती देणारे साचे मागील काही वर्षांपासन उपलब्ध आहेत.वापरणारी मंडळी हवीत.''
:>>मला त्या प्रकल्पांचे दुवे द्या. मला वाटते की मीही सामील होऊ शकेन.
:''रिच टेक्स्ट एडिटर बनवण्याचे स्वागतच आहे त्या करता स्वयंसेवक हवेतच पण त्याही पेक्षा असे काम करणार्‍या व्यक्तीस त्या आंतर्भूत केलेल्या सहाय्य मजकुरात काय बदल हवेत हे मराठी विकिपीडियाची वाचक मंडळी मोकळे पणाने सांगत नाहीत असा आजवरचा अनुभव आहे''
:>>परत रिच टेक्स्ट एडिटर साठी कायकाय करता येईल?
:>>इतर लोक मोकळेपणाने अनुभव सांगत नाहीत ह्यावर एक उपाय म्हणजे एखादी मोहीम हाती घेऊन अलीकडील कार्यरत सदस्यांच्या चर्चापानांवर भेटी देऊन त्याबद्दल विशद करणे. त्यांना मते/अनुभव मांडण्यास प्रोत्साहन देणे.
:''त्या शिवाय विशीष्ट पान.विशीष्ट वर्गातील पान संपादन करतानाही विशेष सूचना देण्याची व्यवस्था इंग्रजी विकिपीडियात काही ठिकाणी दिसते तशी मराठी विकिपीडियात करणे अशक्य नाही पण तीथे ही स्वयंसेवक हवेत हा मुद्दा येतोच.''
:>>आपण मला त्याबद्दल माहिती द्यावी. आवाका पाहून ते आपल्याकडे आणण्याचा मी प्रयत्न करेन किंवा इतर स्वयंसेवक जमवून पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. पण त्याबद्दल स्पष्ट माहिती हवी आहे.
 
 
राहुल,
:''नव्या चावडीस विकिपीडिया:चावडी (ध्येय आणि धोरणे) असे नामकरण करावे का?''
:''येथील प्रत्येक सूचना/मुद्दा घेउन त्यासाठी नवीन पानावर एक विभाग तयार करणे. -अभय नातू , हे थोडे अधिक विशारद करा (म्हणजे सूचना/मुद्दा आल्या नंतर नवीन पान करायचे किंवा कसे?)''
:>>हे चावडीप्रमाणे वापरायचे आहे. पण त्या पानांवर फक्त धोरणे आदींसंदर्भात चर्चा व्हाव्यात.
:''स्ल्याश (/) च्या ऐवजी दुसरे काही चिन्ह वापरता येईलका ? जसे (-), (:-) वैगरे . स्ल्याश थोडा तांत्रिक होतो.''
:>>तांत्रिक होतोच, पण ते संगणंकीय आ/द्न्यआ/वलींच्या दृष्टीने योग्य आहे. ह्याचा अर्थ "/" चिन्हानंतरचे पान हे "/" चिन्हाच्या आधी दाखविलेल्या पानांतर्गत आहे अशा होतो. तांत्रिक क्लिष्टता घालविण्याच्या दृष्टीने एखादा सुलभ साचा तयार करावा, ज्यात चावडी, चावडी/प्रगती, चावडी/ध्येयधोरणे आदी दुवे बसवावे आणि त्यात "/"चे चिन्ह काढून टाकावे म्हणजे उदा. <nowiki>[[चावडी/धेयधोरणे|ध्येयधोरणॆ]]</nowiki>इ.
:''लोगो, नारा इ.''
:>>सध्या लोगो नारा आदी विषयांवर तटस्थ पण वेगळे पान असावे ह्याला माझा पाठिंबा आहे.
:>>नार्‍यासाठी अभय नातूंनी जो नारा दिलाय - आपणासी जे जे ठावें, ते दुसर्‍यांसी सांगावे, शहाणे करूनी सोडावे, सकलजन. - त्याच माझा पाठिंबा आहे.
:>>काही अक्षरे:- म - मराठी, वि - विकिपीडिया, ब - बदल आणि, ध्ये - ध्येयधोरणे. ही अक्षरे लोगोसाठी वापरता येईल.
 
माहितगार,
:''छान आहे.नवीन चावडी उपपानाचे मी स्वागतच करतो, पण आपल्याकडे विकिपीडिया:चावडी/प्रगती असे एक पान आधी पासून तत्सम चर्चेकरिता वापरले गेले आहे त्या पानाचे भविष्य काय असेल. दुसरे असे की विकिपीडिया:चावडी (ध्येय आणि धोरणे) करिता स्ट्रॅटेजी विकि वर जशी थ्रेड डिस्कशनची सोय आहे तसे तेवढ्या एका पाना करिता करणे जमण्या सारखे आहे का?''
:>>चावडी/प्रगती म्हणून जे पान आधीच आहे त्याचा वापर फक्त विकिपीडियावर होणारी प्रगती, लेखसंख्या विस्तार, आणि त्यासाठी काही बेत वगैरे तेथे मांडावेत. ह्या नव्या (धेयधोरणे) पानावर फक्त धेयधोरणांची चर्चा व्हावी.
:>>थ्रेड डिस्कशनबद्दल अधिक माहिती मिळेल का?
:[[सदस्य:Aniruddha22Paranjpye|अनिरुद्ध परांजपे]] १३:२९, २६ जून २०११ (UTC)
 
==बोधवाक्य आणि चावडी==
 
"आपणासी जे जे ठावें, ते दुसर्‍यांसी सांगावे, शहाणे करूनी सोडावे, सकलजन" हे बोधवाक्य उत्कृष्ट आहे ते कायम करावे.
 
चावडी हे नाव बदलायची काय गरज आहे? गावाच्या चावडीवर गावकर्‍यांच्या गप्पा होतात आणि कधीकधी त्या गप्पांमधूनच गावाच्या प्रगतीसाठीची ध्येय धोरणे निश्चित होतात. हे सर्व चावडी या नावाने साध्य होते....[[सदस्य:J|J]] १४:२०, २६ जून २०११ (UTC)