"रंजना देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''रंजना देशमुख''' (अन्य नाव: रंजना;) (जन्मतारीख अज्ञात, [[इ.स. १९५५]] - [[३ मार्च]], [[इ.स. २०००]]) ही लोकप्रिय [[मराठा|मराठी]] अभिनेत्री होती. एकोणीसशे सत्तर आणि एकोणीसशे ऐंशीच्या दशकांत अनेक मराठी चित्रपटांत तिने अभिनय केला. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री [[संध्या]] ही रंजना हिची आत्या होय. आपल्या आत्येप्रमाणेच रंजना हिने [[व्ही. शांताराम]] निर्मित व [[किरण शांताराम]] दिग्दर्शित [[चंदनाची चोळी, अंग अंग जाळी]] या चित्रपटातून [[इ.स. १९७५]]साली मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पुढे व्ही. शांताराम यांच्या 'झुंज' या चित्रपटात तिने मुख्य नायिकेची भूमिका साकारली. [[अरे संसार संसार]] या चित्रपटातील भूमिकेसाठी रंजनेला राज्यसरकारचा [[इ.स. १९८०]]सालचा 'उत्कृष्ट अभिनेत्री' पुरस्कार मिळाला. [[इ.स. १९८३]]साली हाच पुरस्कार तिला [[गुपचुप गुपचुप]] या चित्रपटासाठी मिळाला. सुशीला, गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार, जखमी वाघीण, भुजंग, एक डाव भुताचा हे तिचे आणखी काही उल्लेखनीय चित्रपट होत.
 
[[इ.स. १९८७]]साली तिला झालेल्या अपघातामुळे तिची चित्रपट कारकीर्द अकाली संपुष्टात आली. 'फक्त एकदाच' या मराठी नाटकातून तिने मराठी रंगभूमीवर पदार्पण केले. [[इ.स. २०००]]साली, [[मुंबई]] येथे तिचा मृत्यू झाला.