"जुन्नर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१२,६७५ बाइट्स वगळले ,  ११ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छोNo edit summary
'''जुन्नर''' हे [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यातील]] [[जुन्नर तालुका|जुन्नर तालुक्याचे]] प्रशासकीय मुख्यालय आहे.[[शिवाजी महाराज|शिवाजी महाराजांचे]] जन्मस्थान म्हणजे [[शिवनेरी]] किल्ला या गावापासून जवळच आहे.
==विशेष माहिती==
जुन्नरजवळ खोडद या गावी जगात दुसर्‍या क्रमांकाने शक्तिशाली समजली जाणारी एक महाकाय रेडिओ दुर्बीण आहे. ही दुर्बीण खगोलशास्त्राच्या निरीक्षणासाठी वापरली जाते.
डोळ्यांनी निरीक्षण करायच्या ऑप्टिकल दुर्बिणीने केलेल्या निरीक्षणांना मर्यादा असल्याने हल्ली खगोलशास्त्राच्या अभ्यासाठी रेडिओ दुर्बिणीचा वापर होतो. प्रत्येक ग्रह, तारा स्वतःमधून विविध तरंगलांबीच्या चुंबकीय लहरी सर्वत्र सोडतो. या लहरींच्या अभ्यासावरून त्या ग्रहाचे वा तार्‍याचे चांगल्या प्रकारे निरीक्षण करता येते. या लहरी पकडण्यासाठी रेडिओ दुर्बिणीचा वापर होतो. अशा दुर्बिणीमुळे इतर तरंगलांबींपेक्षा आखुड असलेल्या रेडिओ तरंगलांबीच्या(१ मीटर) लहरींचे संकलन व अभ्यास करणे सोईस्कर झाले.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा यांनी भारतातील डॉ. विक्रम साराभाई यांना अंतराळ संशोधनासाठी, डॉ. सिद्दिकींना मूलभूत संशोधनासाठी तर डॉ. गोविंद स्वरूप यांना रेडिओ अ‍ॅस्ट्रॉनॉमीसाठी योगदान देण्याविषयी आवाहन केले. डॉ. गोविंद स्वरूपांनी या शक्तिशाली दुर्बिणीची संकल्पना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींसमोर मांडली व तिला मान्यता मिळविली.
 
खोडदच्या परिसरात रेडिओ लहरींना प्रभावित करू शकतील अशा इतर चुंबकीय लहरींचे प्रमाण अतिशय नगण्य असल्याने चुंबकीय लहरींचे संकलन सोपे व अचूक होऊ शकणार होते. हा भाग भूकंपप्रवण क्षेत्राच्या बाहेर होता. तसेच पुण्यापासून दळणवळणासाठी सुलभ होता. त्यामुळे रेडिओ दुर्बिणींसाठी खोडदची निवड केली गेली. प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम १९८२-८३च्या सुमारास सुरू झाले व १९९४ च्या सुमारास पूर्ण झाले. या प्रकल्पात अवकाशातून येणार्‍या रेडिओ लहरी पकडण्यासाठी ४५ मीटर व्यासाच्या एकूण ३० अँटेना उभारल्या गेल्या. एकूण ३० पैकी चौदा अँटेना खोडदमध्ये तर इतर वाय आकाराच्या १६ अँटेना आजूबाजूच्या २५ किलोमीटरच्या परिसरात उभारल्या आहेत. ज्या आकाशस्थ वस्तूपासून येणार्‍या लहरींच्या स्त्रोताचे निरीक्षण करायचे आहे त्या स्थानाकडे सर्व अँटेनांच्या तबकड्या वळविल्या जातात. या तबकड्या अवकाशातून येणार्‍या चुंबकीय लहरी परावर्तित करून जोडलेल्या रिसीव्हरकडे पाठवतात. व तिथून त्या पुढील संशोधनासाठी, ऑप्टिकल फायबर केबलद्वारे मुख्य प्रयोगशाळेतील संगणकाकडे पाठवल्या जातात. याचा अर्थ असा की या सर्व डिश वेगवेगळ्या नव्हे तर एकच अँटेना म्हणून अप्रत्यक्षरीत्या वापरल्या जातात.
 
या प्रकल्पात अँटेनाच्या डिशसाठी मेश (जाळी) तंत्रज्ञान प्रथमच वापरले गेले. यापूर्वी अशा प्रकारचे अँटेना उभारताना डिशमध्ये लहरी परावर्तित व्हाव्यात म्हणून सलग धातूचा पत्रा वापरला जाई. डॉ. स्वरूपांनी इथे त्याऐवजी धातूची जाळी वापरली आहे. या जाळीच्या मोकळ्या भागातून रेडिओ तरंगलांबीच्या लहरी आरपार जाऊ शकत नाहीत व पर्यायाने त्या परावर्तित होतात. या तंत्रज्ञानाने डिशचे वजन कमी झाले, ती फिरवण्यासाठी कमी शक्ती लागून वार्‍याचा अवरोध कमी झाला, आणि एकंदरीतच उभारणीचा खर्चही कमी झाला. या तंत्रज्ञानाचे पेटंट सध्या भारताकडे आहे. या रेडिओ दुर्बिणीमुळे भारताला खगोलशास्त्रीय संशोधनामध्ये महत्त्वाची प्रगती करता आली.. डॉ. स्वरूप(वय ८०) यांच्याबरोबर आज(सन २०११) डॉ.कपाही, प्रो. अनंतकृष्णन असे इतर काही शास्त्रज्ञही काम करतात.
 
==कसे पोहचाल==
 
[[कल्याण]]वरुन राज्य महामार्ग २२२ वरून बसने [[ओतुर]] येथे उतरून तेथूनच [[ओतुर]]-जुन्नर बसने जुन्नरला जाता येते. तसेच राष्टीय महामार्ग क्र. ५० वरून बसने [[नारायणगाव]] येथे उतरून तेथूनच [[नारायणगाव]]-जुन्नर बसने जुन्नरला जाता येते.
 
==इतिहास==
 
जुन्नर येथे पुरातन लेणी आहेत. ही लेणी [[सातवाहन]] काळातील असावीत असा अंदाज आहे.
 
== अन्य वैशिष्ट्ये ==
==सामाजिक माहिती==
जुन्नरजवळ [[खोडद]] या गावी [[खगोलशास्त्र|खगोलशास्त्रीय]] संशोधनासाठी वापरला जाणारा [[जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप]] नावाचा रेडिओ दुर्बिणींचा प्रकल्प आहे. या प्रकल्पातील रेडिओ दुर्बीण वर्णपट ग्रहणक्षमतेत जगात दुसर्‍या क्रमांकाच्या शक्तिशाली दुर्बिणी आहेत {{संदर्भ हवा}}.
 
== हेही पाहा ==
==बेल्हे==
* [[खोडद (पुणे जिल्हा)]]
 
जुन्नर तालुक्यातल्या बेल्हे या गावाला राजकीय ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. या गावामध्ये बेल्हेश्वर नावाचे मंदिर आहे. बेल्हे गावचा "बैलांचा बाजार" सबंध पुणे जिल्ह्यत प्रसिद्ध आहे. गावात बेल्हेश्वर विद्यामंदिर नावाची एक चांगली शाळा आहे. नावाजलेले [[तमासगीर]] कै. दत्ता महाडीक पुणेकर याच गावचे. तसेच ज्ञानेश्वर महाराजांनी वेद वदवलेल्या रेड्याची समाधी बेल्हे गावाजवळील "आळे" या ठिकाणी आहे.
 
==खोडद==
खोडद हे पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातील ४५०० ते ५००० लोकवस्तीचे गाव पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगावाच्या पूर्वेला वसलेले आहे.
गावठाणाभोवतीची मीना नदी गावाच्या सौंदर्यात भर घालते. आई मुक्ताई हे गावाचे ग्रामदैवत आहे. गावकर्‍यां श्रद्धास्थान असणार्‍या देवीच्या या मंदिरासमोरील दर्गा गावातील हिंदु-मुस्लिम ऐक्याची साक्ष देतो. गावाच्या उत्तरेला आणि दक्षिणेला एक अशी २ हनुमान मंदिरे आणि नदीतीरावर एक महादेवाचे व एक विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर आहे. पंढरपूरच्या विठोबास जसा चंद्रभागेचा वळसा आहे तसाच इथेही विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिराला मीना नदीचा. सध्या गावठाणामधे एक भव्य राम मंदिर उभे रहात आहे. एकंदरीतच गावकरी भाविक आणि श्रद्धाळू आहेत.
 
गावाच्या पूर्वेला एक पिरॅमिडच्या आकाराचा सुळका असणारा डोंगर आहे. पश्चिमेला विशेष भौगोलिक असे काही नाही. फक्त ५ कि.मी. अंतरावर एक मांजरवाडी नावाचे गाव आहे. खोडद-मांजरवाडी नेहमी हातात हात घालून चालनारी जुने ऋणानुबंध असणारा गावे आहेत. दक्षिणेला नदीपलीकडे महानुभव पंथाचा एक मोठा आश्रम आहे. तेथून संपुर्ण खोडदचे विहंगमय दर्शन होते. उत्तरेला नारायणगड आहे. .त्याच्या कुशीत गडाची वाडी वसलेली आहे.
 
खोडदला असलेली महाकाय रेडिओ दुर्बीण! ही जागतीक पातळीवर दुसर्या क्रमांकाची शक्तीशाली रेडिओ दुर्बीण मानली जाते.खगोलशास्त्रात भारताने जी काही आपली ओळख निर्माण केली आहे त्यामध्ये या शक्तीशाली रेडिओ दुर्बीणीचे महत्वपुर्ण योगदान आहे.
एकूण ३० पैकी चौदा अँटेना खोडदमध्ये तर इतर १६ अँटेना इंग्रजी वाय शेपमध्ये आजूबाजूच्या २५ किमी च्या परिसरात उभारल्या आहेत. या सर्व डिश एकाच वेळी लहरी ग्रहण करण्यासाठी एकाच दिशेने वळविण्यात येतात. होते काय की त्यामुळे सुमारे २५ किमी. व्यासामध्ये त्या स्त्रोताकडून येणार्या लहरी एकाच वेळी पकडता येतात. म्हणजे अशा वेळी या सर्व डिश वेगवेगळ्या नव्हे तर एकच अँटेना म्हणून अप्रत्यक्षरित्या वापरल्या जातात. लहरी पकडण्यासाठीची डिश जेवढी मोठी तेवढ्या जास्त लहरी पकडता येणार व संशोधनातली अचुकता वाढणार हे ओघाने आलेच. व त्यामुळे ही दुर्बीण जागतीक पातळीवर दुसर्या क्रमांकाची शक्तीशाली ठरली आहे. [[सदस्य:Dashrath Panmand|Dashrath Panmand]] ०७:३०, ९ जुलै २०११ (UTC)दशरथ पानमंद
 
 
{{साचा:महाराष्ट्रातील प्राचीन लेणी}}
 
[[वर्ग:जुन्नर तालुका]]
 
२३,४६०

संपादने