"जुन्नर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ ३५:
 
खोडदच्या परिसरात रेडिओ लहरींना प्रभावित करू शकतील अशा इतर चुंबकीय लहरींचे प्रमाण अतिशय नगण्य असल्याने चुंबकीय लहरींचे संकलन सोपे व अचूक होऊ शकणार होते. हा भाग भूकंपप्रवण क्षेत्राच्या बाहेर होता. तसेच पुण्यापासून दळणवळणासाठी सुलभ होता. त्यामुळे रेडिओ दुर्बिणींसाठी खोडदची निवड केली गेली. प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम १९८२-८३च्या सुमारास सुरू झाले व १९९४ च्या सुमारास पूर्ण झाले. या प्रकल्पात अवकाशातून येणार्‍या रेडिओ लहरी पकडण्यासाठी ४५ मीटर व्यासाच्या एकूण ३० अँटेना उभारल्या गेल्या. एकूण ३० पैकी चौदा अँटेना खोडदमध्ये तर इतर वाय आकाराच्या १६ अँटेना आजूबाजूच्या २५ किलोमीटरच्या परिसरात उभारल्या आहेत. ज्या आकाशस्थ वस्तूपासून येणार्‍या लहरींच्या स्त्रोताचे निरीक्षण करायचे आहे त्या स्थानाकडे सर्व अँटेनांच्या तबकड्या वळविल्या जातात. या तबकड्या अवकाशातून येणार्‍या चुंबकीय लहरी परावर्तित करून जोडलेल्या रिसीव्हरकडे पाठवतात. व तिथून त्या पुढील संशोधनासाठी, ऑप्टिकल फायबर केबलद्वारे मुख्य प्रयोगशाळेतील संगणकाकडे पाठवल्या जातात. याचा अर्थ असा की या सर्व डिश वेगवेगळ्या नव्हे तर एकच अँटेना म्हणून अप्रत्यक्षरीत्या वापरल्या जातात.
 
या प्रकल्पात अँटेनाच्या डिशसाठी मेश (जाळी) तंत्रज्ञान प्रथमच वापरले गेले. यापूर्वी अशा प्रकारचे अँटेना उभारताना डिशमध्ये लहरी परावर्तित व्हाव्यात म्हणून सलग धातूचा पत्रा वापरला जाई. डॉ. स्वरूपांनी इथे त्याऐवजी धातूची जाळी वापरली आहे. या जाळीच्या मोकळ्या भागातून रेडिओ तरंगलांबीच्या लहरी आरपार जाऊ शकत नाहीत व पर्यायाने त्या परावर्तित होतात. या तंत्रज्ञानाने डिशचे वजन कमी झाले, ती फिरवण्यासाठी कमी शक्ती लागून वार्‍याचा अवरोध कमी झाला, आणि एकंदरीतच उभारणीचा खर्चही कमी झाला. या तंत्रज्ञानाचे पेटंट सध्या भारताकडे आहे. या रेडिओ दुर्बिणीमुळे भारताला खगोलशास्त्रीय संशोधनामध्ये महत्त्वाची प्रगती करता आली.. डॉ. स्वरूप(वय ८०) यांच्याबरोबर आज(सन २०११) डॉ.कपाही, प्रो. अनंतकृष्णन असे इतर काही शास्त्रज्ञही काम करतात.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/जुन्नर" पासून हुडकले