"उल्हास नागेश कशाळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १:
'''उल्हास कशाळकर''' ([[१४ जानेवारी]], [[इ.स. १९५५]] - हयात) हे नामवंत हिंदुस्तानी संगीत गायक असून हे [[ग्वाल्हेर घराणे|ग्वाल्हेर]], [[आग्रा घराणे|आग्रा]] आणि [[जयपूर घराणे|जयपूर]] या घराण्यांवर हुकुमत असणारा गवई आहेत.
 
यांना [[राम मराठे|पं राम मराठ्यांकडून]] [[आग्रा घराणे|आग्रा घराण्याची]] आणि [[गजाननबुवा जोशी|पं गजाननबुवा जोशींकडून]] [[ग्वाल्हेर घराणे|ग्वाल्हेर घराण्याची]] तालीम मिळाली आहे. [[जयपूर घराणे|जयपूर गायकीतील]] निष्णात गवई [[निवृत्तीबुवा सरनाईक|पं निवृत्तीबुवा सरनाईक]], [[दत्तात्रेय विष्णू पलुसकर]] तथा बापुराव पलुसकर, [[कृष्णराव फुलंब्रीकर|मास्तर कृष्णराव]], [[कुमार गंधर्व|पं कुमार गंधर्व]] या मंडळींचा उल्हास कशाळकरांच्या गायकीवर प्रभाव आहे.
 
==पूर्वजीवन==
ते [[संगीत रिसर्च अकादमी]], कोलकाता येथे [[ग्वाल्हेर घराणे|ग्वाल्हेर घराण्याच्या]] गुरू पदावर कार्यरत आहेत.
 
उल्हास कशाळकरांचा जन्म [[नागपूर]] येथे पांढरकवडा गावी झाला. त्यांना संगीताचे सुरुवातीचे शिक्षण व्यवसायाने वकील असलेल्या व ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचा वारसा लाभलेल्या आपल्या वडिलांकडून, नागेश दत्तात्रेय कशाळकर यांचेकडून मिळाले.
कशाळकरांनी [[नागपूर विद्यापीठ|नागपूर विद्यापीठातून]] सर्वोच्च गुण मिळवून संगीताच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात सुवर्ण पदक मिळवले. त्याच दरम्यान त्यांनी राजाभाऊ कोगजे आणि पी. एन. खर्डेनवीस यांचेकडे संगीताभ्यासास सुरुवात केली. पुढील काळात यांना [[राम मराठे|पं राम मराठ्यांकडून]] [[आग्रा घराणे|आग्रा घराण्याची]] आणि [[गजाननबुवा जोशी|पं गजाननबुवा जोशींकडून]] [[ग्वाल्हेर घराणे|ग्वाल्हेर घराण्याची]] तालीम मिळाली आहे. [[जयपूर घराणे|जयपूर गायकीतील]] निष्णात गवई [[निवृत्तीबुवा सरनाईक|पं निवृत्तीबुवा सरनाईक]], [[दत्तात्रेय विष्णू पलुसकर]] तथा बापुराव पलुसकर, [[कृष्णराव फुलंब्रीकर|मास्तर कृष्णराव]], [[कुमार गंधर्व|पं कुमार गंधर्व]] या मंडळींचा उल्हास कशाळकरांच्या गायकीवर प्रभाव आहे.
 
 
==सांगीतिक कारकीर्द==
 
उल्हास कशाळकरांनी [[दूरदर्शन]] व [[आकाशवाणी]]वर अनेक कार्यक्रम केले असून आकाशवाणीच्या [[ठाणे]] येथील केंद्रात त्यांनी इ.स. १९८३ ते १९९० चे दरम्यान काम केले. इ.स. १९९३ मध्ये त्यांनी कोलकाता येथील आय टी सी संगीत संशोधन अकादमीत आचार्य पद स्वीकारले व आजवर ते तिथे [[ग्वाल्हेर घराणे|ग्वाल्हेर घराण्याच्या]] गुरू पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शिष्य झाले आहेत व तयार होत आहेत.
 
त्यांनी आजपर्यंत भारतात व परदेशांतील अनेक मोठ्या संगीत महोत्सवांत भाग घेतला असून [[ऑस्ट्रेलिया]]मधील बहुसांस्कृतिक महोत्सवात इ.स. २००६ मध्ये, तर अ‍ॅमस्टरडॅम - भारत महोत्सवात इ.स. २००८ मध्ये ते सहभागी झाले होते. त्यांच्या गायनाच्या अनेक ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाल्या आहेत.
 
==सन्मान व पुरस्कार==
 
[[संगीत नाटक अकादमी पुरस्कार]], इ.स. २००८
भारत सरकार कडून [[पद्मश्री पुरस्कार]], इ.स. २०१०.
 
==बाह्य दुवे==
 
[http://www.itcsra.org/sra_story/sra_story_guru/sra_story_guru_links/sra_story_guru_shiyshyaguru/popup/ulhas_kashalkar.htm आय टी सी संगीत संशोधन अकादमी संस्थळ ](इंग्लिश मजकूर)
 
 
 
 
 
{{DEFAULTSORT:कशाळकर,उल्हास}}
{{हिंदुस्तानी संगीत}}
[[वर्ग:आग्रा घराण्यातील गायक]]
Line १२ ⟶ ३६:
[[वर्ग:हिंदुस्थानी संगीत]]
[[वर्ग:संगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेते]]
[[en:Ulhas Kashalkar]]