"सहाय्य:वर्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो "सहाय्य:वर्ग" सुरक्षित केला: High traffic page ([edit=autoconfirmed] (अनंत) [move=autoconfirmed] (अनंत))
छोNo edit summary
ओळ ५:
== लेखांचे वर्गीकरण कसे करावे ==
एखाद्या लेखाच्या विकिमजकुरात एखाद्या वर्गाचा विकिलेखनानुसार जाहीर-उल्लेख, अर्थात डिक्लरेशन, केल्यास त्या विवक्षित वर्गात लेखाचे वर्गीकरण होते. ''<nowiki>[[वर्ग:वर्गाचे नाव]]</nowiki>'' अथवा ''<nowiki>[[वर्ग:वर्गाचे नाव|सॉर्ट की]]</nowiki>'' अश्या पद्धतीने विकिलेखन करून लेखामध्ये वर्गाचा जाहीर-उल्लेख करून लेख 'वर्ग:वर्गाचे नाव' नामक वर्गात समाविष्ट होतो.
 
=== वर्गीकरणाचे संकेत ===
# सहसा वर्गीकरणात अनेक लेखांचा समावेश होत असल्यामुळे वर्गांची नावे समुच्चयदर्शक स्वरूपाची - आणि म्हणूनच अनेकवचनी - असतात. उदा., तार्‍यांवरील लेखांच्या वर्गीकरणासाठी ''<nowiki>[[वर्ग:तारा]]</nowiki>'' अश्या नावाचा वर्ग बनवू नये; त्याऐवजी ''<nowiki>[[वर्ग:तारे]]</nowiki>'' असे अनेकवचनी रूप वापरून समुच्चय दर्शवणार्‍या नावाचा वर्ग बनवावा.
# लेखाच्या मुख्य विषयाला अनुसरून चपखल वर्गीकरण करावे. उदा.: [[विष्णु वामन शिरवाडकर]] या लेखाचे वर्गीकरण नुसतेच ''<nowiki>[[वर्ग:व्यक्ती]]</nowiki>'' असे न करता ''<nowiki>[[वर्ग:मराठी कवी]]</nowiki>'' असे करणे माहितीच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने नेमके व उपयुक्त ठरते.
# लेखासाठी चपखल वर्ग अगोदरच उपलब्ध आहे का, याचा शोध घ्यावा. यासाठी लेखाच्या मुख्य विषयाच्या जातकुळीतले अन्य लेख संदर्भासाठी हुडकून त्यांचे वर्गीकरण कसे केले आहे, ते जाणून घ्यावे. सध्या उपलब्ध असलेल्या वर्ग-उपवर्गांच्या विस्ताराचा अंदाज घेण्यासाठी [[:वर्ग:आशय]] येथून शाखा-उपशाखांमध्ये विस्तारलेला वर्गवृक्ष चाळावा.