"फ्लोरिडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ ५९:
'''फ्लोरिडा''' ({{lang-en|Florida}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] एक राज्य आहे. अमेरिकेच्या आग्नेय टोकापाशी वसलेले फ्लोरिडा क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील २२वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने चौथ्या ([[कॅलिफोर्निया]], [[टेक्सास]] व [[न्यू यॉर्क]] राज्यांच्या खालोखाल) क्रमांकाचे राज्य आहे.
 
फ्लोरिडाच्या पश्चिमेला [[मेक्सिकोचे आखात]], पूर्वेला [[अटलांटिक महासागर]] तर उत्तरेला [[जॉर्जिया (अमेरिका)|जॉर्जिया]] व [[अलाबामा]] ही राज्ये आहेत. फ्लोरिडाचा राज्याचा बराचसा भूभाग मेक्सिकोचे आखात व अटलांटिक महासागर ह्यंमधील [[द्वीपकल्प]]ावर वसला आहे ज्यामुळे फ्लोरिडाला २,१७० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. फ्लोरिडाच्या वायव्य भागात पूर्व-पश्चिम धावणारा एक चिंचोळा पट्टा आहे ज्याला स्थानिक भाषेमध्ये फ्लोरिडा पॅनहँडल असे संबोधतात. फ्लोरिडाच्या दक्षिणेला सुमारे ४,५०० लहान-मोठ्या बेटांचा (कीज) एक द्वीपसमूह असून [[की वेस्ट]] हे सर्वात पश्चिमेकडील बेट आहे. [[टॅलाहासी]] ही फ्लोरिडाची राजधानी, [[जॅक्सनव्हिल]] हे सर्वात मोठे शहर तर [[मायामी]]-[[फोर्ट लॉडरडेल]], [[टँपा]], [[सेंट पीटर्सबर्ग, फ्लोरिडा|सेंट पीटर्सबर्ग]], [[ओरलँडो]] ही येथील इतर मोठी शहरे आहेत.
 
फ्लोरिडा हे अमेरिकेमधील अतिप्रगत राज्यांपैकी एक आहे. वर्षातील बाराही महिने सूर्यप्रकाशाचे दिवस, सौम्य हवामान, रम्य समुद्रकिनारे इत्यादी कारणांमुळे फ्लोरिडा हे अमेरिकेतील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. तसेच येथे अमेरिकेमधील व जगभरातील अनेक धनाढ्य उद्योगपती, सिनेकलाकार व खेळाडूंचे वास्तव्य आहे. येथील अंदाजे २ कोटी लोकसंख्येच्या २२ टक्के लोक [[लॅटिन अमेरिका|लॅटिन अमेरिकन]] वंशाचे आहेत व १८ टक्के लोक केवळ [[स्पॅनिश भाषा]] बोलतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/फ्लोरिडा" पासून हुडकले