"हेमंत कुमार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३५:
गायनात गती असणाऱ्या हेमंतदांना साहित्यक्षेत्रातदेखिल रस होता. १९३७ साली त्यांनी लिहिलेली एक लघुकथा आणि गायलेले एक गाणे ह्या दोन्ही गोष्टी प्रसिद्ध झाल्या आणि हेमंतदांमधील कलाकार जन्मास आला. वर्षभर विद्युत अभियांत्रिकी शिकल्यावर त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकला आणि पूर्णवेळ संगीतकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
 
==गायक आणि संगीतकार==
१९४० साली 'निमोई संन्यासी' ह्या बंगाली चित्रपटासाठी तर १९४४ साठी 'ईरादा' ह्या हिंदी चित्रपटांसाठी गाणी गाऊन हेमंतदांचा चित्रपटातील पार्श्वगायकाच्या कारकिर्दीस सुरुवात केली. पैकी बंगाली चित्रपटासाठी संगीतकार हरि प्रसन्नो दास ह्यांच्या हाताखाली सहाय्यक संगीत दिग्दर्शक म्हणूनही हेमंतदांनी काम केले. स्वतंत्र संगीतकार म्हणून त्यांनी १९४५ सालच्या पूर्बोरंग ह्या बंगाली तर १९५२ सालच्या आनंदमठ ह्या हिंदी चित्रपटाला संगीत दिले.
 
१९५४ सालच्या नागिन चित्रपटासाठी संगीतदिग्दर्शित केलेले त्यांची गाणी खूप गाजली. ह्याच चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून पुरस्कारदेखिल मिळाला. गायक म्हणून हेमंतदांनी हिंदी चित्रपटसंगीत क्षेत्रातील जवळपास सर्व आघाडीच्या संगीतकारांकडे गाणी गाईली.
 
==निर्माता==
१९५९ साली हेमंतदांनी [[मृणाल सेन]] दिग्दर्शित नील आकाशेर नीचे ह्या चित्रपटाद्वारे चित्रपटनिर्मीती क्षेत्रात प्रवेश केला. त्यांच्या गीतांजली प्रॉडक्शन्स ह्या चित्रपटकंपनीने निर्माण केलेले बीस साल बाद (१९६२), कोहरा (१९६४), खामोशी (१९६९) ह्यांसारखे हिंदी चित्रपट त्यांतील गाण्य़ांसकट लोकप्रिय झाले. ह्या सर्व चित्रपटांसाठी संगीतदिग्दर्शनाची जबाबदारीदेखिल हेमंतदांनी यशस्वीपणे संभाळली होती.
 
 
Line ४८ ⟶ ५४:
[[वर्ग:इ.स. १९८९ मधील मृत्यू]]
[[वर्ग:संगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेते]]
 
== बाह्य दुवे ==
* [http://www.aathavanitli-gani.com/Lists/Singer%20Details/Hemant%20Kumar.htm 'आठवणीतली-गाणी.कॉम' या संकेतस्थळावर हेमंतकुमार यांनी गायलेली गाणी]