"वटवाघूळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: mdf:Веньдряв
छोNo edit summary
ओळ १५:
 
उडण्याची क्षमता असलेला एकमेव [[सस्तन प्राणी]].
== शिकारीची पध्दत ==
 
आपल्या नाकातून हळूवार लहरींचे आवाज सोडतात. जे उडत्या कीटकांना आपटून परत त्यांना जाणवतात. याचा अचूक अंदाज घेत ते त्या किटकावर विलक्षण झडप घालतात. [[रडार]]च्या तंत्रज्ञानात असते त्याप्रकारे वटवाघळं अतिशय उच्च वारंवारिताचे ध्वनी निर्माण करतात आणि त्यांचा प्रतिध्वनी ऐकून आपल्या भक्ष्याचा वेध घेतात. काही पतंग आहेत ज्यांना वाघळांची ही पद्धत माहीत आहे. ते काय करतात तर अशा वेळी तेही विचित्र आवाज काढून वाघळांना चकवतात आणि स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करतात.
== देशोदेशीचे शुभ-अशुभ ==
वटवाघळांना काही देशांमध्ये शुभ; तर काही देशांमध्ये अशुभ मानलं जातं. काही ठिकाणी वटवाघळांना भूत, मृत्यू आणि रोग यांचं प्रतीक मानतात.
* [[चीन]]मध्ये वटवाघळांना दीर्घायुष्य आणि आनंदाचं प्रतीक समजतात.
* [[पोलंड]]मध्ये वटवाघळांना शुभ मानलं जातं. एका पुराणकथेनुसार वटवाघळांना माणसाच्या केसांमध्ये घुसायला आवडतं; पण त्यामागचं खरं कारण म्हणजे डास आणि इतर कीटक माणसाच्या डोक्‍याभोवती घोंघावत असताना, त्यांना खाण्यासाठी वटवाघळं येतात आणि ती चुकून माणसांच्या केसांमध्ये घुसतात.
* [[इंग्लंड]]मध्ये वटवाघळांची खूप काळजी घेतली जाते, आणि त्यांना किंवा त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी कसली इजा होईल अशी कृती केली, तर त्या माणसाला मोठा दंड केला जातो.
* [[अमेरिका|अमेरिकेतल्या]] [[टेक्‍सास]] राज्यातल्या ओस्टिनमध्ये तर सुमारे १५ लाख वटवाघळांचं एक अभयारण्यच आहे! सूर्यास्ताच्या सुमाराला ही वटवाघळं आपल्या घरट्यांमधून बाहेर पडतात. ते पाहण्यासाठी लाखभर पर्यटक तिथं गोळा होतात.
== संदर्भ ==
[http://www.esakal.com/esakal/20101125/5118541417079057507.htm निशाचर कीटकभक्षक अच्युत गोडबोले, अतुल कहाते - सकाळ...]
[[वर्ग:सस्तन प्राणी]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/वटवाघूळ" पासून हुडकले