"मदर इंडिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६:
=कथा=
 
कथानक राधा या स्त्रीभोवती फिरते. मेहबूब खान यांच्या मते ती स्वातंत्र्योत्तर काळातील आदर्श भारतीय स्त्रीचे प्रतिनिधित्व करते. म्हणून त्यांनी चित्रपटाचे नावही मदर इंडिया असे ठेवले. नवीन बांधून झालेल्या कालव्याचे उद्‌घाटन बुजुर्ग राधाच्या हस्ते होते हा चित्रपटाच्या सुरुवातीला प्रसंग. याचवेळी राधाला आपल्या आयुष्याचा प्रवास आठवतो. आणि तिची गोष्ट पडद्यावर साकारते. शामूशी लग्न झालेली नववधु राधा गावात येते. या लग्नासाठी राधाच्या सासुने सुखिलाला या सावकाराकडुन कर्ज घेतले असते. हे कर्ज कधी संपतच नाही. केवळ कर्जाच्या व्याजापोटी शामुच्या पिकाचा मोठा हिस्सा सुखिलाला घेऊन जातो. पंचायतीचा निर्णयही सावकाराच्याच बाजुने जातो. तेव्हा शामु शेतात जास्त राबायचे व जास्त उत्पन्न काढायचे ठरवतो. पण त्यामुळे त्याला एक अपघात होतो व त्याचे हात निकामी होतात. आपण आता आपल्याच कुटुंबावर ओझे आहोत या विचाराने तो ग्रासतो व निराशेतच घर सोडुन कायमचा चालला जातो. राधाला यावेळी २ मुले असतात तसेच ती गर्भार असते. काहीच दिवसात तीची सासु ही वारते. राधा बाळंत होते व पुन्हा शेतात राबते. सुखिलाला तिचा विनयभंग करायचा प्रयत्न करतो पण ती झगडुन स्वतःची सुटका करुन घेते. यानंतर पुर येतो व सर्व गावाची वाताहात होते यात राधाचे लहानगे बाळ दगावते. गावकरी हार मानुन गाव सोडुन निघतात पण राधा खंबीर पणे थांबुन गावकर्‍यांचेही मन वळविते. स्वतः बैलाऐवजी नांगर ओढते. हेच दृश्य सिनेमाच्या जाहीरातीत , पोस्टरवर वापरले गेले. पुढे तिची मुले मोठी होतात व आईऐवजी ती नांगर ओढतात. काहीशी परिस्थिती स्थिर होत असते. पण सुखिलाला अजुनही त्याचा कर्जाचा हप्ता वसुल करत असतो. लहान मुलगा बिरजू काहीसा उग्र स्वभावाचा असुन सुखिलाला वर त्याचा खार असतो. सुखिलालाच्या मुलीला त्रास देणे त्याचा नित्याच्या टवाळकीचा भाग असतो. तर मोठा रामु स्वभावाने शांत असतो. रामुचे लग्न गावातच राहणार्‍या मुली सोबत होते. तर बिरजू मात्र शस्त्र उगारतो आणि दरोडेखोर बनतो. सुखिलालाच्या घरावर दरोडा टाकुन तो त्याच्या कधीही न संपणार्‍या कर्जाच्या चोपड्याच जाळतो. पुढे सुखिलालाच्या मुलीला तिच्या लग्नाच्या मांडवातुन सुखिलाला ला ठार मारुन पळवतो. ही बातमी राधाला कळताच ती बंदुक घेउन बिरजुला शोधत त्याला गाठते. घोड्यावरुन सुखिलालाच्या मुलीला घेउन पळणार्‍या बिरजुला ती मुलीला सोडुन देण्यास फर्मावते पण बिरजू तिची टर उडवत तु तर माझी आई आहे म्हणत तिच्या पाठ फिरवतो. अखेर राधा आपल्याच मुलाला बिरजुला गोळी घालुन सुखिलालाच्या मुलीला सोडवते व बिरजू राधाच्याच मांडीवर प्राण सोडतो.
कथानक राधा या स्त्रीभोवती फिरते. मेहबूब खान यांच्या मते ती स्वातंत्र्योत्तर काळातील आदर्श भारतीय स्त्रीचे प्रतिनिधित्व करते. म्हणून त्यांनी चित्रपटाचे नावही मदर इंडिया असे ठेवले. नवीन बांधून झालेल्या कालव्याचे उद्‌घाटन बुजुर्ग राधाच्या हस्ते होते हा चित्रपटाच्या सुरुवातीला प्रसंग. याचवेळी राधाला आपल्या आयुष्याचा प्रवास आठवतो. आणि तिची गोष्ट पडद्यावर साकारते. शामूशी नवीन लग्न झालेली राधा गावात येते, आणि गोष्ट पुढे सरकते.
 
==कलावंत व त्यांच्या भूमिका==