"कान्होजी आंग्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Cybertraker (चर्चा) यांनी केलेले बदल Mahitgar यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास ने�
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ १८:
==उगम==
 
कान्होजी आंग्रे यांचा जन्म १६६९ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या हर्णे या गावी एका संकपाळ कुटूंबात (सध्याचे भिलारे) झाला. त्यांचे मुळ आडनाव कडू होते. संकपाळ हे “वीर राणा संक” या संप्रदायाचे पालक{{क्लिष्ट भाषा))क्लिष्टभाषा}} होत. त्यांच्या वडीलांचे नाव तुकोजी आणि आईचे नाव अंबाबाई होते. बराच काळ त्यांना मुलबाळ न झाल्याने अंबाबाईने कानिफनाथाचा नवस केला की तुझ्या अंगाऱ्याच्या आशिर्वादाने आम्हाला मुल झाले तर आम्ही त्याला तुझे नाव देऊ आणि आमचे आडनाव अंगारे (जे पुढे आंग्रे झाले) असे ठेऊ.{{संदर्भ हवा}} त्यांच्या बालपणाबद्दल फार कमी माहिती उपलब्ध आहे. त्यांचे बरेच बालपण सुवर्णदुर्ग या सागरी किल्ल्याच्या परिसरात गेले. हा किल्लाच पुढे त्यांनी काबीज केला. त्यांचे वडीलही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरी सरदार होते. कान्होजींना लहानपणा पासूनच समुद्र सफरींची आणि साहसी मोहीमांची आवड होती.
 
१६९८ मध्ये साताराच्या भोसल्यांनी त्यांना दर्यासारंग अशी पदवी देऊन, मुंबई पासून विंगोरीया (आताचे वेंगुर्ला) पर्यंतच्या किनारपट्टीची जबाबदारी सोपवली. सिद्दी जोहर च्या ताब्यातले जंजीरा मात्र मुघलांच्या अधिपत्याखाली राहिले. कान्होजींनी आपल्या कारकीर्दिची सुरुवात ब्रिटीश ईस्ट इंडीया कंपनींच्या व्यापारी जहाजांवर हल्ला चढवून केला. अनेक प्रयत्नांनंतरही कान्होजींच्या आरमाराचा पराभव करण्यात अपयश आल्याने ब्रिटीशांनी कोकण किनारपट्टीवर त्यांचे वर्चस्व मान्य करत शांततेचा तह केला.