"विल्यम हेन्री हॅरिसन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:William Henry Harrison daguerreotype edit.jpg|thumb|right|250px|{{लेखनाव}}]]
'''विल्यम हेन्री हॅरिसन''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''William Henry Harrison'' ;) (९ फेब्रुवारी, इ.स. १७७३ - ४ एप्रिल, इ.स. १८४१) हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] नववा राष्ट्राध्यक्ष, राजकारणी व सैनिकी अधिकारी होता. तो अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या स्वातंत्र्यपूर्वकाळात जन्मलेला अंतिम, तर अध्यक्षपदावर असताना मरण पावलेला पहिला राष्ट्राध्यक्ष ठरला. ४ मार्च, इ.स. १८४१ साली अध्यक्षपदी बसलेल्या हॅरिसनाचा कार्यकाळ ४ एप्रिल, इ.स. १८४१ रोजी [[न्युमोनिया|न्युमोनियामुळे]] मृत्यू ओढवल्यामुळे केवळ ३२ दिवस टिकला.
 
अध्यक्षीय कारकिर्दीआधी त्याने [[वायव्य प्रदेश (अमेरिका)|वायव्य प्रदेशाचे]] प्रादेशिक काँग्रेशीत प्रतिनिधित्व केले होते. तसेच [[इंडियाना प्रदेश|इंडियाना प्रदेशाचा]] राज्यपाल व पुढे [[ओहायो]] संस्थानाचा काँग्रेस-प्रतिनिधी व सिनेटर या पदांवरही त्याने काम केले. त्याआधी अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात इ.स. १८११ साली अमेरिकन इंडियनांविरुद्ध लढलेल्या टिपेकनूच्या लढाईत व इ.स. १८१२ साली अमेरिकन इंडियन व ब्रिटिश फौजांच्या आघाडीविरुद्ध लढलेल्या थेम्स नदीकाठच्या मॉरेव्हियनाच्या लढाईत त्याने अमेरिकन फौजांचे यशस्वी नेतृत्व केले.
 
== बाह्य दुवे ==