"वामनराव सडोलीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: पं.''' वामनराव सडोलीकर''' (१६ सप्टेंबर, इ. स. १९०७ - इ. स. १९९१) हे [[हिंदुस्त...
(काही फरक नाही)

२०:०२, १९ मे २०११ ची आवृत्ती

पं. वामनराव सडोलीकर (१६ सप्टेंबर, इ. स. १९०७ - इ. स. १९९१) हे हिंदुस्तानी संगीत गायक होते. ते आपले गुरू उस्ताद अल्लादिया खान यांनी स्थापन केलेल्या जयपूर-अत्रौली घराण्याच्या शैलीने गायन करत असत.


पूर्वायुष्य

पं. वामनराव सडोलीकरांचा जन्म कोल्हापूर येथे एका संगीतप्रेमी परिवारात झाला. किशोर वयात त्यांनी ग्वाल्हेर घराण्याचे पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले.


सांगीतिक कारकीर्द

त्यांनी मराठी संगीत नाटकाच्या रंगभूमीवर गायक-अभिनेता, संगीत दिग्दर्शक व दिग्दर्शक अशा अनेक पदरी भूमिका निभावल्या. त्यांनी अनेक चित्रपटांतही काम केले. त्यांनी हिंदुस्तानी संगीताचे शिक्षण जयपूर-अत्रौली घराण्याच्या उस्ताद भुर्जी खान व उस्ताद अल्लादिया खान यांचेकडे घेतले.


शिष्य

त्यांच्या शिष्यांत बंधू मधुकर सडोलीकर, कन्या श्रीमती श्रुती सडोलीकर - काटकर आणि श्रीमती मंजिरी आलेगांवकर यांचा प्रामुख्याने समावेश होतो.


पुरस्कार व सन्मान

  • इ. स. १९३८ मध्ये गंधर्व महाविद्यालय, लाहोर यांकडून 'संगीत प्रवीण' सन्मान
  • आय टी सी संगीत संशोधन संस्थेची फेलोशिप


बाह्य दुवे

वामनराव सडोलीकरांविषयी इंग्लिश मजकूर