"युनिकोड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४:
'कॅरॅक्टर एनकोडिंग' ह्या संज्ञेची अगदी सोपी व्याख्या म्हणजे कोठल्याही 'कोणत्याही एका मानवी भाषेतील सर्व अक्षरे, चिन्हे यांना काही विशिष्ट क्रमाने ठरवून दिलेले गणितीय आकडे'.
 
:उदाहरणार्थ, कल्पना करा की एका भाषेत ('क', 'ख, 'ग', 'घ, 'ञ') ही फक्त पाच अक्षरे आहेत. समजा आपण ठरवले की ही पाच अक्षरे (२१,२२,२३,२४,२५) ह्या पाच आकड्यांनी ओळखायची. असे केल्यास ह्या काल्पनिक भाषेतील कोणताही शब्द किंवा वाक्य आपल्याला हे पाच आकडे वापरून लिहिता येईल. उदा. 'कखग' हा शब्द '२१२२२३' असा लिहिता येईल व 'खघकञ' हा शब्द '२२२४२१२५' असा लिहिता येईल.
येथे (२१,२२,२३,२४,२५) ह्या आकड्यांच्या समूहाचे ('क', 'ख, 'ग', 'घ, 'ञ') ह्या पाच अक्षरांच्या समूहाशी आपण जे नाते ठरवले त्यास एक कॅरॅक्टर संच म्हटले जाते.
 
ओळ ११:
==== पण असे आकडे ठरवण्याची गरज काय ? ====
असे करण्याचे एकच कारण आहे व ते म्हणजे संगणकास कोणत्याही भाषेचे ज्ञान नसते. संगणकावर साठवलेली सर्व माहिती ही केवळ आकड्यांच्या स्वरूपात साठवलेली असते. त्याचप्रमाणे संगणकास समजणारी सर्व [[आज्ञावली]] हीदेखील आकड्यांच्याच स्वरूपात साठवली जाते.
:संगणकाची ही रचना लक्षात घेतली की कॅरॅक्टर संचाचे महत्व लक्षात येईल. संगणकास भाषा वा अक्षरे समजत नसल्यामुळे, सर्व अक्षरे, चिन्हे (उदा प्रश्नचिन्ह, अल्पविराम इत्यादी) हीदेखील केवळ आकड्यांच्याच स्वरूपात साठवावी लागतात. त्यामुळे कोणताही मजकूर साठवताना कोणत्यातरी एका कॅरॅक्टर एनकोडिंगच्या सहाय्याने तो आकड्यांच्या स्वरूपात साठवला जातो. तो मजकूर पुन्हा दाखवताना (उदा. काँप्युटर मॉनिटरवर दाखविताना ), त्याच आकड्यांवरून अक्षरे ठरवून दाखवली जातात. अशा प्रकारचा एक कॅरॅक्टर संच आहे, जो जगातल्या सध्याच्या बहुतांश संगणकांतील बहुतेक सर्व सॉफ्टवेअरस् मध्ये वापरला जातो - तो म्हणजे आस्की (इंग्लिश: ''ASCII'' - ''American Standard Code for Information Interchange''. आस्की ह्या सेटमध्ये रोमन लिपीतील सर्व अक्षरे, अंक, व्याकरण चिन्हे (पूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारचिन्ह इत्यादी) , तसेच इतर काही चिन्हे ह्यांच्यासाठी एकूण १२८ आकड्यांचा क्रम ठरवला गेला आहे. A ते Z ही अक्षरे ६५ ते ९० ह्या आकड्यांनी तर a ते z ही अक्षरे ९७ ते १२२ ह्या आकड्यांनी ओळखली जातात. अक्षरेच नव्हे तर अंकदेखील काही विशिष्ट आकड्यांनी दर्शविले जातात. 0 ते 9 हे अंक [[आस्की]] मध्ये ४८ ते ५७ असे साठवले जातात. दोन शब्दांमधली रिकामी जागा दर्शविण्यासाठी ३२ हा आकडा आहे.
<br />
 
"https://mr.wikipedia.org/wiki/युनिकोड" पासून हुडकले