"राघोजी भांगरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

भारतीय क्रांतिकारक
Content deleted Content added
नवीन पान: आदिवासी क्रांतिकारक राघोजी भांगरे परकीय सत्तेशी प्राणपणाने लढ़...
(काही फरक नाही)

२१:५४, १० मे २०११ ची आवृत्ती

आदिवासी क्रांतिकारक राघोजी भांगरे परकीय सत्तेशी प्राणपणाने लढ़नारया आदिवासी महादेव कोळी जमातीच्या बंडखोरांनी आणि त्यांच्या नायकांनी स्वातंत्र्य चलवलित मोठे योगदान दिले आहे. राघोजी भांगरे हा या परंपरेतील एक भक्कम, ताकतवान, धाडसी, रुबाबदार आणि बंडखोर नेता होता. तुघलग आणि बहामनी सुलतानाच्या कालापासून इंग्रजी राजवतीच्या अखेर पर्यंत च्या कालातील बंडाच्या प्रदीर्घ परंपरेतील महादेव कोळी या आदिवासी जामातीतील राघोजी भांगरे( भांगरा ) हा सर्वात प्रभावी, पराक्रमी, शूरवीर आणि क्रांतिकारक होता. पेशवाई बुडाल्यानंतर( १८१८ ) इंग्रजांनी महादेव कोल्यांचे सह्याद्रीतील किल्ले, घाट माथे राखान्याचे आधिकार काढून घेतले. किल्ल्यांच्या शिलेदारया काढल्या. बुरुज नस्ता केले. वतनदारया काढल्या. पगार कमी केले. परंपरागत आधिकार काढून घेतल्याने महादेव कोल्यान मध्ये मोठा असंतोष निर्माण जाला. सन १८२८ मध्ये शेतसारा वाढविन्यात आला. सारावसुलीमुले गोरगरीबांना आदिवासींना रोख पैश्याची गरज भासू लागली. ते सावकार , वान्यांकडून भरमसाठ दराने कर्जे घेऊ लागले. कर्जाच्या मोबदल्यात सावकार जमिनी बालकाऊ लागले. लोक भयंकर चिढले. सावकार आणि इंग्रजांविरुद्ध बंडाला त्यांनी सुरुवात केली. बंडखोर नेत्यांनी या बंडाचे नेतृत्व केले. अकोले तालुक्यातील रामा किरवा याला पकडून नगर येथील तुरुंगात फाशी देण्यात आली ( १८३० ). यातून महादेव कोळी जमातीच्या बंडखोरांत दहशत पसरेल, असे इंग्रजांना वाटत होते. रामाचा जोड़ीदार राघोजी भांगरे याने सरकारविरोधी बंडात सामील होऊ नए यासाठी त्याला मोठ्या नोकरीवर घेतले. परंतू नोकरीत पदोपदी होणारा अपमान आणि काटछाट यामुले राघोजी चिढ्ला. नोकरीला लाथ मारुन बंडात उडी घेतली. उत्तर पुणे व नगर जिल्ह्यात राघोजी आणि बापू भांगरे यांच्या नेतृत्वाखाली उठाव सुरु जाला. १८३८ मध्ये रतनगड आणि सनगर किल्ल्यांच्या परिसरात त्याने बंड उभारले. कैप्टेन मकिन्तोशने हे बंड मोडन्यसाठी सर्व अवघड खिंडी, दरया, घाट, रस्ते, जंगले याची बारीकसारीक माहिती मिल्विली. बंडखोरांची गुपिते बाहेर काढली. परंतू बंडखोर वरमले नाहीत . उलट बन्ड़ाने व्यापक रूप धारण केले.इंग्रजांनी कुमक वाढवली. गावे लुटली. मार्ग रोखून धरले. ८० लोकांना कैद दहशतीमुले काही लोक उलटले. फंदफितुरीमुले रघोजीचा उजवा हात समजला जाणारा बापूजी मारला गेला. रघोजीला पकडण्यासाठी इंग्रज सरकारने ५ हाजारांचे बक्षीस जाहीर केले. ठाणे गाजेटियर्स जून्या आवृतित "ओक्टोम्बर१८४३ मध्ये राघोजी मोठी टोली घेऊन घाटावरुन खाली उतरला आणि त्याने अनेक दरोडे घातले" असा उल्लेख आहे. राघोजीने मार्वाद्यानवर छापे घातले. त्यांनी पोलिसांत तक्रार केली. ठावठिकाना विचारायला आलेल्या पोलिसांना माहिती न दिल्याने चिडलेल्या पोलिसांनी आईचे निर्दयपणे हाल केले. त्यामुले चिडलेल्या रघोजीने टोली उभारून नगर ओ नाशिक मध्ये इंग्रजांना सालो की पालो करून सोडले. हाती लागलेल्या प्रत्येक मारवाड्याचे नाक कापले.राघोजीच्या भयाने मारवाड़ी गाव सोडून पलाले" असा उल्लेख अहमदनगरच्या गाजे टियर्स मध्ये सापडतो. सातारयाच्या पदच्यूत छत्रपतीनना पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी इंग्रजां विरुद्ध उठावाचे व्यापक प्रयत्न चालले होते त्यांच्याशी राघोजीचा संबंध असावा, असे अभ्यासकांचे मत आहे.बंडासाठी पैसा उभारने, समाजावर पकड़ ठेवणे व छल करणार्या सावाकरान्ना धडा शिकविने या हेतूने राघोजी खानदानी वसूल करीत असे. राघोजीच्या बंडा नंतर सुमारे पंचवीस वर्षांनी वासुदेव बलवंत फडके यांचे बंड सुरु जाले.नोव्हेंबर१८४४ ते मार्च १८४५ या कालात राघोजीचे बंड शिगेला पोहचले होते. बंड उभारल्या नंतेर रघोजीने 'आपण शेतकरी, गरीबांचे कैवारी असून सावकार व इंग्रज सरकारचे वैरी आहोत ' अशी भूमिका जाहिर केली होती. कुटूमबातील समाजातील स्रियाँ बद्दल राघोजीला अत्यन्त आदर होता. टोली तील कुणाचेही गैरवर्तन तो खपवून घेत नसे. शौर्य व प्रमाणिक नीतीमत्ता याला धार्मिकपणाची जोड़ त्याने दिली. महादेवावर त्याची श्रद्धा व भक्ति होती. भीमाशंकर, वज्रेश्वरी, त्रिंबकेश्वर,नाशिक, पंढरपूर येथे बंडा च्या कालात तो देव दर्शनाला गेला होता.तेथे त्याला पकडले.ठाण्याला नेले.राघोजी अत्यंत स्वाभिमानी होता.त्यांला इंग्रजी अधिकाऱ्यांनी वकील मिळू दिला नाही.त्याने स्वताच बाजू मांडली.पुढे त्याला फाशी देण्यात आली.