"जगदीश खेबुडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ३३:
 
 
त्यांनी आपल्या कारकीर्दीत तीन हजार पाचशे कविता आणि अडीच हजारांपेक्षा अधिक गीते लिहिली. [[सुधीर फडके]], [[पं. भीमसेन जोशी]], [[वसंतराव देशपांडे]], [[प्रभाकर कारेकर]] यांच्यापासून ते अलीकडच्या [[सोनू निगम]]पर्यंत सर्वच नामांकित गायकांनी त्यांची गीते गायली आहेत. संत एकनाथांच्या रचनांचा त्यांच्यावर प्रभाव होता. [[भा. रा. तांबे]], [[कुसुमाग्रज]], [[बा. भ. बोरकर]], [[बा. सी. मढेर्कर]] या थोर कवींचा प्रभाव आपल्यावर असल्याचे खेबूडकर मानत असत. साधे सोपे परंतु अर्थगर्भ व नादमयी शब्द हे त्यांच्या गाण्याचे वैशिष्ट्य आहे. जेव्हा त्यांच्या शेवटच्या काळात त्यांना आधार रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते त्यावेळी उपचार घेतानाही त्यांचे गीत-लेखनाचे कार्य सुरूच होते.
==कार्य==