"दोरजी खांडू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दोरजी खांडू यांचा अपघाती मृत्यू
ओळ ६:
 
१९९० मध्ये अरूणाचल प्रदेशच्या पहिल्यावहिल्या विधानसभा निवडणुकीत थिंगबू-मुक्तो मतदारसंघातून त्यांची बिनविरोध निवड झाली. १९९५ साली झालेल्या दुस-या निवडणुकीतही ते बिनविरोध निवडून आले व मंत्रिमंडळामध्ये २१ मार्च , १९९५ रोजी सहकार खात्याचे मंत्री झाले. १९९६ साली पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय तसंच डेअरी विकास खात्याच्या कॅबिनट मंत्री झाले. १९९८ साली ते ऊर्जा मंत्री झाले. १९९९ साली अरूणाचल प्रदेशच्या विधानसभेवर निवडून गेले व २००२ ते २००३ या कालावधीत दोरजी खांडू खाण , मदतकार्य आणि पुर्नवसन खात्याचे मंत्री होते.
२००३ मध्ये ते मदतकार्य आणि पुनर्वसन तसंच आपत्ती व्यवस्थापन खात्याचे मंत्री झाले. २००४ मध्ये मुक्तो मतदारसंघातून त्यांची अरूणाचल प्रदेश विधानसभेवर बिनविरोध निवड झाली व ते ऊर्जा , एनसीईआर , पुर्नवसन खात्याचे मंत्री झाले.<ref>[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8159003.cms मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचा परिचय]</ref> ९ एप्रिल २००७ला दोरजी यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतली. जीआँग अपांग यांच्याकडून त्यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारलं.
 
९ एप्रिल २००७ला दोरजी यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतली. जीआँग अपांग यांच्याकडून त्यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारलं.
 
१ मे २०११ ला दोरजी खांडू आणि अन्य चौघे पवनहंस हेलिकॉप्टरनं इटानगरकडे रवाना झाले होते. परंतु, या हेलिकॉप्टरचा संपर्क भूतानमधील सेला पासजवळ तुटला. हेलिकॉप्टर भरकटलं की कोसळलं हे कळायला मार्ग नव्हता. हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्री असल्यानं लष्कराचे हजारो जवान, सीमा रस्ते संघटना, आयटीबीपी, एसएसबी आणि अरुणाचल प्रदेश पोलिस तात्काळ कामाला लागले होते. परंतु, खराब हवामानामुळे ही शोधमोहीम अत्यंत धिम्या गतीनं सुरू होती. हवाई शोधमोहीम तर मागे घण्यात आली. कामेंग जिल्ह्याच्या सीमेजवळ काही हेलिकॉप्टरसदृश अवशेष विखुरल्याचं दोन सुखॉय विमानं आणि इस्रोच्या उपग्रहानं टिपलं. तसंच, काही स्थानिकांनी विमानसदृश आकृती पाहिल्याची माहिती दिल्यानंतर शोधपथकाची वाटचाल त्या दिशेनं सुरू झाली. नागाजिजी या डोंगराळ भागात ६६ किमीच्या परिघातच शोधकार्य केंद्रीत केलं गेलं. ४ मे २०११ ला तवांग जिल्ह्यात लोबोथांगजवळ त्यांच्या पवनहंस विमानाचे अवशेष आणि तीन मृतदेह सापडले,त्यापैकी एक मृतदेह खांडू यांचा असल्याचं परराष्ट्र व्यवहार खात्यानं स्पष्ट केलं.<ref>[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8158898.cms दोरजी खांडू यांचा अपघाती मृत्यू]मटा ऑनलाइन वृत्त ४ मे २०११</ref>
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}