४,९७६
संपादने
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव =
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव = जगदीश खेबूडकर
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = १० मे [[इ.स. १९३२]]
| जन्म_स्थान = [[खेबवडे, हळदी]], [[कोल्हापूर जिल्हा]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| मृत्यू_दिनांक = [[मे ३]], [[इ.स. २०११|२०११]]
| मृत्यू_स्थान = [[कोल्हापूर]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| कार्यक्षेत्र = [[गीतकार]], [[कविता]], [[साहित्य]], [[चित्रपट]]
| राष्ट्रीयत्व = [[भारत|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]]
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार = [[गीतरचना]],
| विषय =
| चळवळ =
| प्रसिद्ध_साहित्यकृती = [[पिंजरा या चित्रपटातील गीते]]
| प्रभाव =
| प्रभावित =
| पुरस्कार = महाराष्ट्र राज्य शासनाच्यावतीने ११ वेळा सन्मानित
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| अपत्ये = अभंग, मुक्तछंद ही मुले, कविता पडळकर, अंगाई महाजनी या मुली
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा = [http://www.gadima.com ग. दि. माडगूळकर संकेतस्थळ]
}}
'''जगदीश खेबूडकर''' (जन्म १० मे [[इ.स. १९३२]] - मृत्यू ७९व्या वर्षी, ३ मे २०११ रोजी). जगदीश खेबूडकर यांना नाना असेही संबोधले जात असे. त्यांचा जन्म [[कोल्हापूर]] - [[राधानगरी]] रस्त्यावरील खेबवडे, हळदी या गावी झाला. वडिलांच्या नोकरीमुळे सतत बदली होत असल्यामुळे प्राथमिक शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी झाले. हे [[मराठी]] ज्येष्ठ गीतकार होते. त्यांच्या शेवटच्या काळात आधार रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार घेतानाही त्यांचे गीत-लेखनाचे कार्य सुरूच होते.
त्यांनी आपल्या कारकीर्दीत तीन हजार पाचशे कविता, अडीच हजारांपेक्षा अधिक गीते लिहिली. सुधीर फडके , पं. भीमसेन जोशी , वसंतराव देशपांडे , प्रभाकर कारेकर यांच्यापासून ते अलीकडच्या सोनू निगमपर्यंत सर्वच नामांकित गायकांनी त्यांची गीते गायली आहेत. [[भा. रा. तांबे]], [[कुसुमाग्रज]], [[बा. भ. बोरकर]], [[बा. सी. मढेर्कर]] या थोर कवींचा प्रभाव आपल्यावर असल्याचे खेबुडकर मानत असत.
==जीवन==
वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी मानवते तू विधवा झालीस’.. खेबुडकरांचे हे पहिले दीर्घकाव्य लिहले असे मानले जाते. त्या नंतर त्यांचा कवी आणि गीतकार म्हणून प्रवास सुरू झाला. लोकसंगीत, पोवाडा, अभंग, ओव्या अशा विविध काव्य प्रकारांमध्ये त्यांनी रचना केल्या. हे पेशाने शिक्षक होते.
==कार्य==
त्यांचे पहिले गीत [[इ.स. १९५६]] रोजी [[आकाशवाणी]]वर प्रसारित झाले. [[इ.स. १९६०]] मध्ये त्यांचे पहिले चित्रगीत ([[लावणी]]) ' मला हो म्हणत्यात लवंगी मिरची' प्रदर्शित झाले. रंगल्या रात्री अशा’ या चित्रपटाची गीते लिहिण्याची ही संधी त्यांना ज्येष्ठ संगीतकार [[वसंत पवार]] यांनी दिली होती. ‘साधी माणसं’, ‘आम्ही जातो आमच्या गावा’,‘कुंकवाचा करंडा’ आदी चित्रपटांसाठी गीते अतिशय गाजली.
त्यांनी सुमारे ३२५ मराठी चित्रपटांसाठी गीते लिहिली. २५ पटकथा , संवाद , ५० लघुकथा , पाच नाटके , चार दूरदर्शन मालिका , चार टेलिफिल्म , पाच मालिका गीते इअत्की साहित्य संपदा त्यांनी निर्माण केली आहे. त्यांची सांगीतिक कारकीर्द पाच दशकांइतकी मोठी होती. ग.दि.माडगुळकरांनंतर इतका मोठा गीतकार झालेला नव्हता.
त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी [[भालजीं पेंढारकर]] ते [[यशवंत भालकर]] असे विविध ३६ [[दिग्दर्शक]], वसंत पवार ते [[शशांक पोवार]] असे ४४ [[संगीतकार]] आणि [[सुधीर फडके]] ते [[अजित कडकडे]] अश्या ३४ गायकांसमवेत खेबूडकर यांनी काम केले.
==पुरस्कार==
जगदीश खेबूडकर यांना ६० हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
* राज्य शासनाच्यावतीने ११ वेळा सन्मानित (सवाल माझा ऐका १९६४)
* गदिमा पुरस्कार
* कोल्हापूर भूषण पुरस्कार
* फाय-फौंडेशन पुरस्कार
* साहित्य सम्राट पुरस्कार
* रसरंग फाळके पुरस्कार
* व्ही. शांताराम स्मृती जीवनगौरव पुरस्कार
* शिवाजी सावंत पुरस्कार
* बालगंधर्व स्मारक समितीचा बालगंधर्व पुरस्कार
* जीवनगौरव पुरस्कार
* शाहू पुरस्कार
* करवीर भूषण
* दूरदर्शन जीवनगौरव
* कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार
==गाजलेली गीते==
* ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे
* कसं काय पाटील बरं हाय का?, मला हो म्हनत्यात लवंगी मिरची, सोळावं वरिस धोक्याचं गं
* दिसला गं बाई दिसला, छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, मला लागली कुणाची उचकी, तुम्हावर केली मी मर्जी बहाल
* कशी नशिबानं थट्टा आज मांडली, चंद्र आहे साक्षीला, सत्य शिवाहूनी सुंदर हे, आकाशी झेप घे रे पाखरा, देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा
* सावधान होई वेडय़ा
* मला हे दत्तगुरू दिसले, मी आज फूल झाले, हवास मज तू हवास तू, स्वप्नात रंगले मी.
* एकतारी संगे एकरुप झालो,
* धागा जुळला, जीव भुलला,
* धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना
* कल्पनेचा कुंचला हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा
* विठु माऊली तू माऊली जगाची
* कधी तू हसावी, कधी तू रुसावी
* सत्यम शिवम सुंदरा, कुण्या गावाचं आलं पाखरू,
* आज प्रीतीला पंख हे लाभले रे,
* सख्या रे घायाळ मी हरिणी,
* रुणझुणत्या पाखरा,
* तुझे रुप राणी कुणासारखे गं?
* मोरया..मोरया..
== बाह्य दुवे ==
* [http://www.aathavanitli-gani.com/Lists/Lyrics%20Details/Jagdish%20Khebudkar.htm 'आठवणीतली-गाणी.कॉम' या संकेतस्थळावर जगदीश खेबूडकर यांची गीते]
|
संपादने