"कार्बन १४ किरणोत्सर्ग कालमापन पद्धती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: पुरातन वस्तूंचा काळ ठरविण्यासाठी कार्बन १४ किरणोत्सर्ग [[कालमापन...
 
छोNo edit summary
ओळ १:
पुरातन वस्तूंचा काळ ठरविण्यासाठी '''कार्बन १४ किरणोत्सर्ग [[कालमापन पध्दती''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Radiocarbon dating'', ''रेडिओकार्बन डेटिंग'' ;) उपयोगात आणली जाते. प्रत्येक [[सजीव]] गोष्ट वनस्पती,प्राणी,मानव जिवंत असताना हवेतील [[कार्बन डाय ऑक्साईड]] घेत असते. या कार्बन डाय ऑक्साईडच्या घटकांमध्ये कार्बन १४ नावाचा घटक असतो. हा कार्बन १४ [[किरणोत्सर्ग|किरणोत्सर्गी]] आहे. प्राणी जिवंत असताना या कार्बन १४ ची किरणोत्सर्जनाची क्रिया सतत चालू असते. सर्व प्राण्यांमध्ये कार्बन १४ चे प्रमाण एकच असते आणि म्रृत्यूनंतर सर्व प्राण्यांच्या अवशेषातून कार्बन १४ एकाच प्रमाणात बाहेर पडते. जिवंतपणी असलेल्या कार्बन १४ चा अर्धा भाग म्रृत्यूनंतर ५५६८ वर्षांनंतर नाहिसा होतो. या कालावधीला कार्बन १४ चे अर्धे आयुष्य म्हणतात. अशाचप्रकारे नंतरच्या १११३६ वर्षांनी त्याच्याही निम्मा कार्बन १४ शिल्लक राहतो आणि ७०००० वर्षांनी या कार्बन १४ ची किरणोत्सर्जनाची क्रिया पूर्णपणे थांबते. आधुनिक काळातील कार्बनच्या किरणोत्सर्जनाशी मृत प्राण्याच्या किरणोत्सर्जनाची तुलना केली असता प्राण्याचा मृत्यू केव्हा झाला हे ठरविता येते. अलीकडच्या काळातील [[उत्खनन|उत्खननातून]] निघालेल्या वस्तूंचे काळ या पध्दतीने ठरविण्यात आले आहेत. सौराष्ट्रातील [[लोथल]] या [[सिंधू संस्कृती|सिंधू संस्कृतीच्या]] प्रसिध्द शहराचा काळ ४०३० म्हणजे इ.स.पूर्व २१८० हा याच पध्दतीने ठरविण्यात आला.
 
{{[[वर्ग}}:कालमापन]]
[[वर्ग:किरणोत्सर्ग]]
 
[[en:Radiocarbon dating]]