Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३९:
 
लेख मुळात चांगला आहे. काही किरकोळ दोष आहेत ते दुरुस्त करता येतील. -- [[सदस्य:J|J]] १६:५१, २३ मार्च २०११ (UTC)
 
==पक्षी लेखातील छोटा बदल==
नमस्कार, तुम्ही पक्षी विषयात योगदान दिलेत याबद्दल आनंद झाला. मला बरेचदा काम अर्धवट सोडून अन्यत्र जावे लागत असल्याने लेखात काही चुका राहून जाऊ शकतात. तुम्ही केलेले बदल, विशेषतः व्याकरणातील, आवडले. फक्त एक सांगावेसे वाटते की, पक्ष्यांबद्दल सांगतांना त्यांची लांबी (length) किती असे नसून एखादा पक्षी इतर पक्ष्यांच्या तुलनेत आकाराने केवढा आहे असे त्यांच्या आकाराबद्दल (size) बोलले जाते. यासाठी मी मराठीसह इतर काही भाषेतील पुस्तके पुनः पुन्हा तपासली आहेत (उदा. मारुती चितमपल्ली यांचा पक्षिकोश) आणि माझी खात्री झाल्यावरच मी याबद्दल लिहीत आहे. तुम्ही पक्षी लेखात आकार ऐवजी लांबी असे केलेले बदल पुन्हा पूर्वीसारखे कराल का? फारतर आकार इतके सें. मी. किंवा इंच असे करा. त्या शब्दाला प्रत्यय लावण्याची गरज नाही. [[सदस्य:Gypsypkd|gypsypkd]] ([[User talk:Gypsypkd|चर्चा]]) ०३:५९, २६ एप्रिल २०११ (UTC)