"एमिली शेंकल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
{{बदल}}
'''एमिली शेंकल]''' ही [[सुभाषचंद्र बोस]] यांची पत्नी होती. [[सुभाषचंद्र बोस]] यांनी २६ डिसेंबर १९३७ रोजी [[ऑस्ट्रिया]]तील बागास्ताइन येथे एमिली शेंकल या युवतीशी गुप्तपणे विवाह केला होता. ज्यावेळी विवाह झाला त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे १९३८ मध्ये [[हरीपुरा]] येथे होणा-या [[अखिल भारतीय कॉंग्रेस]] अधिवेशनाचे अध्यक्ष होणार हे निश्चित झाले होते. तेव्हा लग्नाची ही खाजगी बाब, त्यात ते ही एका ऑष्ट्रियन रोमन कॅथॉलिक युवतीशी, उघडपणे जाहीर करणे अकारण वादंग माजविणारे ठरण्याची भीती होती. म्हणूनही सुभाषचंद्रांनी हे लग्न गुप्तपणे केले असावे. <br />
प्रकृती स्वास्थ्यासाठी आणि ब्रिटीश सरकारने हद्दपार केले म्हणून सुभाषचंद्र १९३३ मध्ये युरोपात गेले. तिथे व्हिएन्नात जून १९३४ मध्ये एमिलीची व त्यांची पहिली भेट झाली. सरकारी अवकृपा आणि हवापालट म्हणून सुभाषचंद्र व्हिएन्नात आले असले तरी ते केवळ पर्यटक नव्हते. भारताची यथास्थिती युरोपातील देशांना कळावी म्हणून सुभाषचंद्रंनी व्हिएन्नात एक ऑफिस उघडले. त्याठीकाणी त्यांची सेक्रेटरी म्हणून एमिली शेंकल कामाला आली. तिची [[मातृभाषा]] जर्मन असली तरी तिला इंग्रजी ब-यापैकी येत होते. एमिलीचे कुटुंब सामान्य मध्यमवर्गीय होते. वडिलांना घरखर्चास हातभार लावता यावा म्हणून तिने सुभाषचंद्रांच्या सेक्रेटरीची ही नोकरी स्विकारली. <br />
सुभाषचंद्रांनी एमिलीबरोबर डिसेंबर १९३७ मध्ये लग्न केले होते ते गुप्तपणे. युध्दकाळात एका जर्मन स्त्रीने भारतीयाबरोबर लग्न लावणे शक्यच नव्हते. एमिलीने हा संबंध तोडावा असा सल्ला तिला वकीलांनी दिला होता असे तिने नंतर एका दूरचित्रवाणीस दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. परंतु तिने हा सल्ला झुगारुन लावला व व [[हिंदू]] पध्दतीने फेब्रुवारी १९४२ मध्ये लग्न केले.<ref>The Sign of the Tiger by Rudolf Hartog, page 108</ref> त्यानंतर त्यांना एक मुलगी झालेली आहे तिचे नाव अनिता. जन्म २१ नोव्हेंबर १९४२ व्हिएन्ना.<br />