"तेजोमेघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Czeror (चर्चा | योगदान)
No edit summary
Czeror (चर्चा | योगदान)
ओळ ७:
 
==इतिहास==
असे मानण्यास जागा आहे की [[दुर्बीण{{!}}दुर्बीणीच्या]] शोधापूर्वीही [[माया संस्कृती{{!}}माया लोकांना]] तेजोमेघांविषयी माहिती होती. मृगनक्षत्राच्या आसपास असलेल्या आकाशाच्या क्षेत्रासंबंधित असलेली एक लोककथा सिद्धांताचे समर्थन करते. कथेत असा उल्लेख आहे की धगधगत्या आगीच्या आसपास एक डाग आहे.
 
ख्रिस्ताब्द १५० च्या दरम्यानच्या काळात [[क्लॉडियस टॉलेमियस]] (टॉलेमी) याने त्याच्या [[अल्मागेस्ट]] या पुस्तकाच्या सातव्या व आठव्या खंडात पाच तेजोमय दिसणार्‍या तार्‍यांची नोंद करून ठेवली आहे. त्याने [[सप्तर्षी]] व [[सिंह रास{{!}}सिंहराशी]] यांच्यादरम्यान एकही तारा नसलेल्या भागात असलेला तेजोमय प्रदेशही नोंदवला आहे. पहिल्या खर्‍या तेजोमेघाचा उल्लेख हा फारसी खगोलशास्त्रज्ञ [[अब्द अल्-रेहमान अल्-सुफी]] याच्या ''निश्चित तार्‍यांचे पुस्तक'' (९६४) या ग्रंथात सापडतो. [[अँड्रोमेडा दीर्घिका]] असलेल्या ठिकाणी त्याने "लहानसा ढग" असल्याचे नोंदवले आहे. त्याने [[ओम्रिकॉर्न व्हेलोरम]] हा तारकापुंज "तेजोमय तारका" म्हणून व ब्रॉकीच्या पुंजासारखे इतर तेजोमय खगोल सूचिबद्ध केले. ज्या [[अतिनवतारा{{!}}अतिनवतार्‍यामुळे]] [[क्रॅब तेजोमेघ{{!}}क्रॅब तेजोमेघाची]] निर्मिती झाली तो अतिनवतारा [[एसएन १०५४]]चे अरबी व चिनी खगोलशास्त्रज्ञांनी १०५४ मध्ये निरीक्षणे केली आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/तेजोमेघ" पासून हुडकले