"शिल्प स्थापत्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
मराठवाडा परिसर प्राचीन शिल्प स्थापत्य अवशेषांनी समृध्द आहे. प्राचीन ऐतिहासिक पुराव्यांचा विचार करत असताना मराठवाड्याला वगळून चालतच नाही. आजही अशा अनेक ऐतिहासिक खाणाखुणा जागोजागी सर्व मराठवाडाभर उभ्या आहेत. [[सातवाहनां]]पासून [[यादव]] काळापर्यंत येथे अनेक शिल्पस्थापत्य रचना उदयास आल्या.
मराठवाड्यावर सर्वप्रथम राज्य सातवाहनांनी केले.[[प्रतिष्ठान]]नगरी ही त्यांची राजधानी होती. [[वेरुळ]]च्या कातळातून अखंड काव्य निर्माण करणारा सर्वश्रेष्ठ कलाकार कोकस हा या प्रतिष्ठानचाच. तर या प्रतिष्ठानवर इ.स.पूर्व २३५ पासून ते इ.स. २२५ असे सुमारे साडेचारशे वर्ष सातवाहनोनी राज्य केले. त्यानंतर या मराठवाड्यात इ.स. २२५ ते ५५० असे सुमारे तीनशे वर्ष [[वाकाटकां]]नी राज्य केले. त्यानंतर इथे [[बदामीच्या चालुक्यां]]ची सत्ता निर्माण झाली. ती सुमारे दोनशे वर्ष म्हणजे इ.स. ५५० ते ७५० अशी टिकली. [[ह्यू एन त्संग]] याच काळात मराठवाड्यात आला होता. त्यानंतर इथे [[राष्ट्रकुटां]]ची सत्ता निर्माण झाली. राष्ट्रकुटांच्या प्रभावी राजवटीनंतर इथे आले कल्याणीचे [[चालुक्य]] कल्याणी. हे सरधारणत: १० वे ११ वे शतक नंतर इथे अल्पकाळ सत्ता टिकली ती [[कलचुरीं]]ची. संतोष दहिवळ १५:१०, १९ एप्रिल २०११ (UTC)
सर्व राजवंशात सातवाहनांपासून ते यादवांपर्यंत मराठवाड्यात धार्मिक,सामाजिक,सांस्कृतिक असंख्य घडामोडी घडल्या. प्राचीन कलावैभवाची साक्ष देणारी अनेक देवालये व गुहाशिल्पे निर्माण झाली. या सर्व देवालयात धर्मापुरीचे केदारेश्वर देवालय वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना आहे. संतोष दहिवळ १५:१०, १९ एप्रिल २०११ (UTC)