"ओवा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.याच्या बिया घरघुती वापरात असतात. {{विस्तार}}
== औषधी मुल्य ==
पाचक औषधांमध्ये महत्त्वाचे स्थान असणारा ओवा एक उत्तम मसाल्याचा पदार्थ आहे.
:यवानी पाचनी रुच्या तीक्ष्णोष्णा कटुका लघुः ।
:दीपनी च तथा तिक्‍ता पित्तला शुक्रशूलहृत्‌ ।।
:वातश्‍लेष्मोदरानाह गुल्मप्लीहकृमिप्रणुत्‌ ।... भावप्रकाश
 
ओवा पाचक असतो, रुचकर असतो, चवीला तिखट, आंबट, कडवट, वीर्याने उष्ण व तीक्ष्ण, तसेच लघू गुणांचा असतो. अग्नीला प्रदीप्त करतो, वात, तसेच कफदोषाचे शमन करतो, पोटात वायू धरणे, उदररोग, गुल्म, प्लीहावृद्धी, तसेच जंत होणे वगैरे तक्रारींत हितकर असतो. मात्र अतिप्रमाणात सेवन केल्यास पित्त वाढवतो, शुक्रधातूला कमी करतो.
== लागवड ==
*ओवा ह्या पिकाची लागवड ऑक्टोंबरच्या शेवटच्या आठवड्यापासुन नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये करतात. २ ते २.५ किलो प्रती हेक्टरी बियाणे वापरावे.
*दोन ओळीतील अंतर ३० सेमी तर दोन झाडातील अंतर ४५ सेमी ठेवावे.
== पिक कापणी ==
*ओवा ही पीक दोन महिन्यांमध्ये फुलधारणा करते आणी फळाचे तोंड विटकरी रंगाचे झाल्यानंतर तोडणीस योग्य आहे असे समजावे. अशी फळे तोडुन चटई किंवा चादरी वर वाळवावीत व हाताने किंवा पायाने घासुन बी वेगळे करावे.
=== उत्पादन क्षेत्र ===
*ओवा हे पीक प्रामुख्याने उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश व काही प्रमाणात महाराष्ट्रामध्ये घेतले जाते.
[[वर्ग:छायाचित्रांची आवश्यकता असलेले वनस्पती लेख]]
[[वर्ग:औषधी वनस्पती]]
"https://mr.wikipedia.org/wiki/ओवा" पासून हुडकले