"ग्लोबल सिस्टम फॉर मोबाइल कम्युनिकेशन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: =जीएसएम= जीएसएम (Global System for Mobile Communication किंवा GSM) मूळ (Groupe Spécial Mobile) : मोबाइल तंत्र...
(काही फरक नाही)

१४:३९, ११ एप्रिल २०११ ची आवृत्ती

जीएसएम

जीएसएम (Global System for Mobile Communication किंवा GSM) मूळ (Groupe Spécial Mobile) : मोबाइल तंत्रज्ञानातील GSM हे सर्वात प्रसिद्ध आणि महत्वाचे मानक आहे. मोबाइल तंत्रज्ञानात जागतिक पातळीवर जवळ जवळ ८०% हिस्सा या तंत्रज्ञानाचा आहे. या मानकाचा उगम हा मुख्यत: युरोपमधील आहे. आजच्या घडीला जगातील २१२ देश या तंत्राचा वापर करतात. या तंत्रज्ञानामुळे कुठलाही जीएसएम वापरकर्ता कुठल्याही देशात रोमिंग करू शकतो. हे तंत्रज्ञान पूर्णपणे अंकीय संदेशवहन पद्धतीवर आधारित आहे. SMS या सेवेचे श्रेय जीएसएम या तंत्रज्ञानालाच जाते.

 
GSM

संक्षिप्त इतिहास

युरोपातील CEPT या संस्थेने १९८२ साली 'Groupe Spécial Mobile' या संकल्पनेची निर्मिती केली. पुढे १९८७ साली तेरा युरोपीय देशांनी एका कराराद्वारे ही पद्धती स्वीकारली आणि त्याच्या विकासाची जबाबदारी ETSI या संस्थेकडे सोपवली. या मानकाचा पहिला मसुदा १९९० साली तयार झाला. याच मसुद्याप्रमाणे १९९१ साली पहिले जीएसएम नेटवर्क फिनलंड या देशात नोकिया आणि सिमेन्स या दोन कंपन्यांनी विकसित केले.