"सारंग हरीण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.3) (सांगकाम्याने वाढविले: ltg:Aļņu saime
No edit summary
ओळ ६:
 
सारंग हरीणांची शिंगे ही त्यांचे वैशिठ्य आहे. शिंगे ही फक्त नरांना असतात. त्यांची शिंगे ही भरीव असतात व अनेक टोक असतात. पुढे एक टोक असते व मागील बाजुस अनेक टोक असतात. मागील बाजूस दोन किंवा अधिक टोकांची संख्या असते. सांबर व चितळांमध्ये पुढे एक व मागे दोन अशी तीन टोके असतात. बाराशिंगाला मागील बाजूस सहा ते आठ टोके असतात. ही शिंगे वर्षातून एकदा गळून पडतात व पुन्हा उगवतात. शिंगाची वाढ होत असताना त्यावर मखमलीचे आवरण असते. त्यामध्ये रक्तवाहिन्याचे जाळे असते. या काळात हरीणे इतर नरांशी संघर्ष टाळतात. शिंगाची पुर्ण वाढ झाल्यावर मखमलीचे आवरण वाळून जाते व पोपडे पडतात. या काळात नर हरीणे झाडांवर व दगडांवर आपली शिंगे घासून ही पोपडे काढून टाकतात व वीणीच्या हंगामासाठी तयार होतात. वीणीच्या हंगामात नर हरीणे इतर हरीणांशी संघर्ष करण्यात उत्सुक असतात. एकमेकांशी शिंगे अडकवून नर एकमेकांवर मात करण्याचा प्रयत्न करतात. अंतिम विजयी नर मादीचा अधिपती होतो. असे नाही की सर्वच नरांना शिंगे असतात. काहिंना नसतात अशी हरीणे साहजिकच मादीच्या कळपावर हक्क सांगण्यास असमर्थ असतात. परंतु काही शिंगरहीत नरही वेगळे डावपेच वापरून इतर नरांना आवाहन करत असतात.
[[चित्र:हरीण.JPG | शिंगे नसलेली हरीण मादी पिलू | thumb ]]
 
'''वावर'''