"विकिपीडिया:चावडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४७८:
 
:--[[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड]] ([[सदस्य चर्चा:Sankalpdravid|चर्चा]] | [[विशेष:योगदान/Sankalpdravid|योगदान]]) १६:३९, ४ एप्रिल २०११ (UTC)
 
==संगणकप्रणाली आणि त्यातील घटकांचे लेख==
नमस्कार,
 
आपण मॅक ओएस, विंडोझ, इ. संगणकप्रणालीघटकांबद्दल अनेक लेख तयार केलेले आहेत. याबद्दल काही निरीक्षणे आणि सूचना -
 
१. बव्हंश लेख बिन माहितीचे आहेत. यात चार-पाच ओळींची तरी भर घालावी म्हणजे हे घटक काय आहेत, काय करतात, इ.ची जुजबी का होईना माहिती मिळेल.
 
२. अनेक लेखांची शीर्षके मिंग्लिशमध्ये आहेत, उदा. डिव्हाइस व्यवस्थापक, सिस्टिम पॉलिसी संपादक, इ.
:यांची शीर्षके पूर्ण इंग्लिशमध्ये तरी असावीत किंवा पूर्ण मराठीत.
:जेथे विशेषनाम असते तेथे मराठीकरण करू नये. विंडोझ एक्स.पी. --> खिडक्या क्ष.प.; मॅक ओएस स्नोलेपर्ड --> मॅक ओएस हिमबिबट्या, इ.
:विशेषनाम नसलेल्या शब्दांचे मराठीकरण चालेल. फाइल मॅनेजर --> संचिका व्यवस्थापक, प्रॉब्लेम रिपोर्टिंग अँड आन्सर्स --> समस्या अहवाल व उत्तरे, इ.
:मराठीकरण करताना अतिकिचकट शब्द वापरू नये. जर दुसरा शब्द नसेल तर इंग्लिश शब्दच ठेवावा.
 
३.लेखाचे शीर्षक बदलले की संबंधित साच्यातही बदल करावे.
 
[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] १२:२३, ६ एप्रिल २०११ (UTC)