"गोगलगाय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१०१ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
[[चित्र:Grapevinesnail 01.jpg | जमीनीवरील गोगलगाय | thumb]]गोगलगाय हा मृदुकाय आणि उदरपाद वर्गात येणारा [[प्राणी]] आहे. गोगलगायींच्या शरीरावर कवच असते. यालाच [[शंख]] असेही म्हणतात. नात्र बिना शंखांच्या कवच नसलेल्या गोगलगायी आढळतात. गोगलगायींच्या अंदाजे ३५,००० जाती आहेत. या प्राण्यांमध्ये राहण्याची ठिकाणे आकार, वर्तन, बाह्यरचना आणि आंतररचना यांमध्ये विविधता आढळते. श्वसन संस्थेतील प्रकारानुसारदेखील दोन प्रकार आहेत. जमिनीवर राहणार्‍या गोगलगायी फुप्फुसाद्वारे श्वास घेतात, तर गोड्या पाण्यात अथवा समुद्रात राहणार्‍या गोगलगायी कल्ल्यांद्वारे श्वास घेतात. शंखातली गोगलगाय आपले शरीर शंखात आक्रसून घेऊ शकते. गोगलगायी [[उभयलिंगी]] असतात परंतु स्वफलन होत नसल्याने त्यांना प्रजननासाठी दुसर्‍यांशी गोगलगायींशी [[संभोग]] करावा लागतो. जमिनीवर किंवा गोड्या पाण्यात राहणार्‍या बहुतेक गोगलगायी अंडी घालतात व त्यातून प्रौढ प्राणी [[डिंभ अवस्था|डिंभ अवस्थेतून]] न जाता निर्माण होतात. पाण्यातील गोगलगायी जल-वनस्पती आणि काही वेळा मृत प्राण्यांवर जगतात. शंकूसारख्या दिसणार्‍या गोगलगायी विषारी असतात. आपल्या विषारी दंशाने ते मासे वा इतर लहान जिवांना मारतात व भक्ष्य बनवतात.
== उपयोग ==
काही ठिकाणी गोगलगायींचा खाद्य म्हणून उपयोग केला जातो. युरोपात अनेक समुद्री गोगलगायींच्या जातींपासून पदार्थ तयार करतात. '''गोगलगायींच्या काही जाती विषारी असतात.'''
५,०७६

संपादने