"ताराबाई मोडक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ८:
| जन्मदिनांक =
| जन्मस्थान = [[इंदूर]], [[भारत]]
| मृत्युदिनांक = [[३१ ऑगस्ट]] [[इ.स. १९७३]]
| मृत्युस्थान =
| चळवळ =
ओळ ६३:
ताराबाईंच्या आयुष्याची चित्तरकथा जितकी विलक्षण आहे, तितकीच ती त्यांच्याविषयीचा आदर दुणावणारी आहे. पावलोपावली भिडणारी प्रतिकूल परिस्थिती त्यांनी संकट म्हणून न स्वीकारता संधी म्हणून स्वीकारली आणि निव्वळ मार्गच काढला नाही, तर त्यातून सुंदर संकल्पना घडवल्या. वैयक्तिक होरपळीचे प्रतिबिंब ना कधी त्यांच्या स्वभावावर, ना व्यक्तिमत्त्वावर आणि ना कधी त्यांच्या कार्यावर पडलं.
 
ताराबाईंची कर्मभूमी ठाणे जिल्ह्यातली असली, तरी त्यांच्या कार्याने फक्त तेवढ्याच भागाला फायदा झाला नाही, तर त्यांचे कार्य खेड्यातील आणि आदिवासी भागातील बालशिक्षण तंत्राचे एक देशव्यापी ‘मॉडेल’ बनले. पद्मभूषण ताराबाई मोडक यांचे [[३१ ऑगस्ट]] [[इ.स. १९७३]] ला मुंबईत निधन झाले.
 
== शिशू विहार==
सन १९३६ मध्ये पद्मभूषण ताराबाई मोडक यांनी शिशू विहार ही संस्था स्थापन केली. महाराष्ट्रातील हे पहिले आदर्श बालमंदिर! आज या संस्थेत मराठी व गुजराती या दोन माध्यमांमधून अध्यापक विद्यालय, अभिनव प्राथमिक ( विभाग) शाळा, माध्यमिक विद्यामंदिर , सरलाताई देवधर पूर्व प्राथमिक शिक्षक प्रशिक्षण केंद असे विभाग चालतात.
 
' बाल देवो भव ' हे शाळेच ब्रीदवाक्यच आहे. प्रवेशाच्या वेळेस मुलांची मुलाखत घेतली जात नाही. मुले शाळेत रुळेपर्यंत , शाळेचा व शिक्षकांचा परिचय होईपर्यंत पालकांना आठवडाभर मुलांबरोबर बसण्यास देण्यात येते. मुलांना डबा , पाटीदप्तर , वॉटर बॅग यांचे ओझे आणावे लागत नाही.
 
शाळेच्या इमारतीची रचनाही मुलांचा विचार करूनच केली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला मोकळेपणाने फिरता येईल असे मोठे वर्ग आहेत. प्रत्येक वर्गात ३० मुलांसाठी एक प्रशिक्षित , प्रेमळ व मुलांचे मन जाणणारी शिक्षिका आहे. त्यामुळे प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक लक्ष देता येते. आनंदायी वातावरणात खेळाद्वारे मुले येथे हसत खेळत शिक्षण घेत असतात. त्यांना शाळेचीही गोडी वाटू लागते. ती चटकन् रमतात.
 
शरीर तंदुरुस्त तर मन तंदुरस्त हे लक्षात घेऊन मुलांची शारीरिक वाढ योग्य संतुलित होण्यासाठी वातावरणात मुलांच्या वयानुसार योग्य उंचीची झोपाळा , घसरगुंडी , जंगलजीम , डबलबार , सिसॉ इत्यादी साधने आहेत. मुलांना रोज निराळा सकस पौष्टिक आहार दिला जातो.
 
लहान मुलांचा आवडीचा खेळ म्हणजे भातुकली. मुलांच्या भावनिक विकासात त्याचे असलेले महत्त्व लक्षात घेऊन बाहुलीघराची योजना आहे. त्यासाठी मुलांच्या उंचीचेच खास कपाट बनवले आहे. वाळूच्या हौदात खेळताना [[लाडू]] , [[डोंगर]] , [[बोगदा]] , [[किल्ला]] करतात. येथे वाळू स्वच्छ राहील याची काळजी घेतली जाते.
 
मुले अनुकरणप्रिय असतात. त्यांना भाजी चिरणे , किसणे , निवडणे , कुटणे , पीठ चाळणे , दळणे अशी कामे करायला हवी असतात. त्यांच्या वयाचा , शारीरिक कुवतीचा विचार करून लहानसे जाते , खलबत्ता , चाळण , कमी धारेची सुरी असे देऊन ती कामे करायला देता येतात. आजपर्यंत एकाही मुलाला अशी कामे करताना इजा झालेली नाही. या साधनांवर खेळत असताना स्वच्छता , नाीटनेटकेपणा , टापटीपपणा शिकवता येतो. मुले स्वावलंबी व्हावी म्हणून नाडी घालणे , बटणे लावणे , वेणी घालणे , पावडर लावणे इ. व्यवसाय दिले जातात.
 
कोणतेही ज्ञान ग्रहण करायचे तर त्यासाठी पंचज्ञानेंदियांचा विकास होणे आवश्यक आहे. त्यासाठी रंग , वास , चव , आकार , स्पर्श , आवाज या संवेदनांसाठी निरनिराळी साधने आहेत. कै. ताराबाई मोडक व शिक्षणतज्ज्ञ कै. शेष नामले यांनी मॅडम माँटेसरींच्या साधनावर आधारित भारतातील सामाजिक व आर्थिक परिस्थितीला अनुसरून साधनांची निमिर्ती केली. प्रत्यक्ष फळं , फुलं , धान्य , कागद , कापड , विविध रंगांच्या बाटल्या , खोकी इ.चा उपयोग करून रंग , आकार , वास , चव यासाठी वेळोवेळी नावीन्यपूर्ण साधने बनवून आजचे शिक्षकही त्यात भर घालीत आहेत. बालमंदिरातल्या विविध साधनांवरील खेळांमधून बालकांचा बौद्धिक विकास योजनापूर्वक विकसित केला जातो.
 
आजच्या आधुनिक काळाशी सुसंगत अशी साधने देऊन मुलांच्या जिज्ञासावृत्तीला खतपाणी घातले जाते. भिंगातून किड्याचे निरीक्षण करणे , लोहचुंबक विविध वस्तूंना लावून पहाणे , साबणाचे फुगे उडवणे इ. खेळून प्रत्यक्ष अनुभव घेतात. वर्गात कोणत्या साधनांवर खेळायचे याचे मुलांना स्वातंत्र्य असते. जोडीबरोबर सहकाराने खेळणे , इतर मुले खेळत असताना पहाणे इ. क्रिया करताना मुलांमध्ये स्वयंशिस्त येते , संयमाची जाणीव येते व सामाजिकतेची जबाबदारी समजते.
 
मुलांना श्रवण , भाषण-संभाषण ही कौशल्ये येण्यासाठी आमच्या शिशू विहारमध्ये रोजच बडबडगीते , बालगीते , समरगीते , भजन इ. गाण्याचे प्रकार ऐकवले जातात. मनोरंजन , भावनिक विकास , मानसिक आरोग्य तंदुरुस्त रहाण्यासाठी याची नितांत आवश्यकता आहे. अनौपचारिक गप्पा , सण व भोवती घडणा-या घटनांवर गप्पागोष्टी करणे , सहल , नाट्य , बाहुलीनाट्य असे अपक्रम घेतले जातात. गप्पा मारणं हे तर मुलांच्या आवडीचेच. त्यातूनच आपले विचार योग्य शब्दात मांडणे , सुसंगत बोलणे मुले शिकतात.
 
मुलांबरोबर गप्पागोष्टी करणं ही बालशिक्षणाने प्राथमिक शिक्षणाला दिलेली देणगी आहे. प्राथमिक शिक्षणातील परिपाठात याचा उपयोग करून घेतला जातो. प्राणी , पक्षी , वाहने , फळे , फुले , भाज्या , वनस्पतींचे अवयव , फळांचे भाग , ब्रश , पुजेचे सामान , वाद्ये इ.चा परिचय-पाठ देताना प्रत्येक वस्तू दाखवून ओळख दिल्यामुळे ते ज्ञान कायम टिकते. तसेच शब्दांचे अर्थ समजतात , शब्दसंग्रह वाढतो. वर्णन करून गोष्ट सांगणे , चित्रांच्या मदतीने गोष्ट सांगणे , चित्रावरून गोष्ट तयार करणे असे विविध उपक्रम घेतले जातात. पाच वर्षांची मुले चित्रावरून गोष्ट तयार करू शकतात. मुलांना व्याकरणशुद्ध बोलता यावं म्हणून व्याकरणावरील मौखिक खेळ घेतले जातात. एकवचन-अनेकवचन , विशेषण , क्रियाविशेषण , शब्दयोगी अव्यय , उभयान्वयी अव्यय वगैरे मौखिक खेळ खेळाच्या स्वरूपात घेतले जातात. या खेळांसाठी मुलांच्या दैनंदिन परिचयाच्या वस्तूंचा उपयोग केला जातो.
 
अक्षर ओळख देण्यापूर्वी चित्र किंवा वस्तूमधील साम्य ओळखणे , भेद ओळखणे , काय कमी आहे , काय चूक आहे यासारखे खेळ दिले जातात. त्यामुळे अक्षरे शिकताना अक्षरांमधील सूक्ष्म फरक मुले ओळखतात. अक्षरे शिकता शिकता ती केव्हा वाचायला लागतात हे कळतही नाही. लेखनासाठी बोटाच्या स्नायंूचा विकास व्हावा म्हणून मातीकाम , चित्र रंगवणे , ठसेकाम , चित्रे काढणे इ. खेळ दिले जातात. वाचनासाठी , लेखनासाठी आवश्यक पूर्वतयारी झाली , तर लिहायला वाचायला कितीसा वेळ लागेल ? ही तयारीच तर बालमंदिरात या प्रत्येक खेळातून , व्यवहारातून , उपक्रमातून केली जाते.
 
भारतीय संस्कृती जपण्यासाठी सर्वधर्मसमभावाने मुलांच्या सहभागाने निरनिराळे सण साजरे केले जातात. मुलांमध्ये राष्ट्रीय भावना जोपासणे फार महत्त्वाचे! त्यासाठी राष्ट्रीय सण , उत्सव , पुढाऱ्यांचे स्मृतीदिन , राष्ट्रध्वजाचे महत्त्व इत्यादी उपक्रम घेतले जातात.
 
दिवाळीपूर्वी मुलांकडून भेटकार्ड तयार करून घेऊन पोस्टऑफिस हे ठिकाण प्रसारासाठी निवडले जाते. प्रत्येकाला आपले कार्ड पोस्टात टाकण्यास मिळते. त्याच वेळेस पोस्टाचाही परिचय दिला जातो. तिथे चाललेली कामे दाखवली जातात. तसेच पेट्रोल पंप , भाजी बाजार , धोबी , इस्त्रीवाला वगैरे ठिकाणी प्रत्यक्ष मुलांना नेऊन ती कामे दाखवली जातात. वर्षअखेरीस साडेचार वर्षांवरील मुलांचे एक दिवसीय निवासी शिबीर घेतले जाते. आकाशदर्शन , शेकोटी , शेकोटीची प्रतिज्ञा , त्याच्याभोवती फेर धरून गाणी म्हणणे , दुसऱ्या दिवशी सकाळी सहल अशी कार्यक्रमांची आखणी केली जाते.
 
या शिबिरात संघवृत्ती , खिलाडूवृत्ती , स्वयंशिस्त , स्वावलंबन , जबाबदारीची जाणीव आदि गुणांचा विकास होतो. शारीरिक स्वच्छता , परिसर स्वच्छता यासंबंधी नेहमी गप्पा करत असतो , परंतु त्या दिवशी त्याचे प्रात्यक्षिक पहायला मिळते. गेल्या वषीर्च्या सहलीत मुलांना गवतावर पडलेले दव पहायला मिळाले. दवाचा आकार , ओलावा , त्याची चमचम असा चित्तथरारक अनुभव मुलांनी घेतला. मित्रांच्या सहवासात अधिक काळ राहायला मिळाल्यामुळे मुले खुश असतात. ताई परत कधी राहायचे ? असा प्रश्न काही मुले विचारतात.
 
शिशु विहार म्हणजे एक घर आहे. येथे शिक्षक , शिपाई व मुले यांच्यात प्रेमाचे , आपुलकीचे नाते निर्माण झालेले असते. एकदा एक मुलगा रडत असताना त्याने शांत राहावे म्हणून ' तू सारखा रडत असल्याने माझा कान दुखतो ,' असे ताईंनी सांगितले. त्यांच्या अवतीभोवती असणाऱ्या एका विद्याथिर्नीने ते ऐकले. दुसऱ्या दिवशी शाळेला निघताना तिने आईजवळ तेलाची बाटली दे , असा हट्ट धरला. आईलाही काही कळेना. मुलीच्या आग्रहाखातर त्या तेलाची बाटली घेऊन आल्या.
 
शिशु विहारामध्ये दोन नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. मुलांना लहानपणापासून बचतीची सवय लागावी , यासाठी शिशु बँकेची योजना आहं. ही ऐच्छिक असते. मुलांचे बचत खाते असते. त्यांना पासबुक दिले जाते. मुले आपल्याला मिळणारे बक्षिसाचे पैसे , खाऊचे पैसे त्यात जमा करतात. मुलांनी जमा केलेल्या पैशांवर रीतसर व्याच दिले जाते. हे खाते केव्हाही बंद करण्याची मुभा मुलांना असते. पण जी मुले 10 वीपर्यंत यात पैसे साठवतात , त्यांना शाळा सोडून जाताना कॉलेजला जाण्यासाठी आवश्यक असलेल्या फीसाठी एकरकमी हे पैसे मिळू शकतात. कित्येक मुलांनी आजपर्यंत या आमच्या सोयीचा फायदा करून घेतला आहे.
 
दुसरा उपक्रम म्हणजे पालकांसाठी. आमच्या बालमंदिरात तळागाळातील मुलेही प्रवेश घेतात. त्यातल्या कित्येक मुलांचे पालक निरक्षर असतात. त्यांच्यासाठी बालमंदिरातील आमच्या शिक्षकांनी साक्षरतेचा वर्ग सुरू करून आपली पालकांची आणि समाजाची असलेली बांधिलकी सिद्ध केली आहे.
 
 
==बाह्य दुवे==