"सेल्युलर नेटवर्क" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३:
==पेशीय दूरध्वनी तंत्राचा इतिहास ==
[[चित्र:Frequency reuse.png|right|200 px|thumb|काल्पनिक षटकोनी आकाराच्या भौगोलिक रचना]]
[[इ.स. १९४७]] साली [[बेल लॅब्स]]च्या [[डग्लस रिंग]] आणि [[रे यंग]] यांनी [[मोबाईल फोन]]साठी काल्पनिक षटकोनी आकाराच्या ( Hexagonal Cell) भौगोलिक रचनेची कल्पना मांडली होती. प्रत्यक्षात या संकल्पनेसाठी लागणार्‍या तंत्रज्ञानाचा पाया बेल लॅबच्याच [[रिचर्ड फ्रेंकिल]] आणि [[जोल एंजेल]] यांनी [[इ.स. १९६०]] मध्ये रचला. या संकल्पने अंतर्गत, एक मोठा भौगोलिक परिसर छोट्या छोट्या षटकोनी आकारात विभागण्यात येतो. अश्या रचनेची कल्पना आपण मधमाशीच्या पोळ्यावरुन करू शकतो. या प्रत्येक भागासाठी एक-एक विद्युत चुंबकीय नियंत्रक असतो. जेंव्हा एखादा फिरता ग्राहक एका षटकोनी भागातून दुसर्‍या षटकोनी भागात शिरतो तेंव्हा त्याच्यावरील नियंत्रणाचे हस्तांतरण होते. अश्या प्रकारे कुठल्याही क्षणी ग्राहक कुठल्या न कुठल्यातरी नियंत्रकाखाली असतो. या हस्तांतरणाच्या तंत्रज्ञानाचे श्रेय बेल लॅबच्या अमोस जोएल यांना जाते. पुढे [[इ.स. १९७१]] मध्ये AT&T ने AMPS (Advanced Mobile Phone System) या तंत्राचा विकास केला. हे तंत्र पूर्णपणे [[अ‍ॅनालॉगअनुरूप]](Analog) पद्धतीचे होते. काही वर्षानी म्हणजे [[इ.स. १९९१]] मध्ये या तंत्रज्ञानात सुधारणा करून त्याचे D-AMPS (Digital Advanced Mobile Phone System) असे नामकरण केले. या तंत्राचा मुख्य फरक म्हणजे हे तंत्र [[डिजिटलअंकिक]] (Digital) या संकल्पनेवर आधारित होते.
 
==अल्प परिचय==
ओळ १५:
 
===पहिली पिढी===
मोबाइल उत्क्रांतीची ही पिढी पुर्णपणे अ‍ॅनालॉग[[अनुरूप]] (Analog) तंत्रज्ञानावर आधारित होती. ह्या तंत्रज्ञानाचा व्यापारी दृष्टीने वापर होण्यास [[इ.स. १९८०]] चे मध्यदशक उजाडावे लागले. पहिल्या पिढीचे मुख्यतः दोन तोटे होते. पहिला तोटा प्रमाणीकरणाशी संबंधित होता. प्रत्येक विकासक आपआपल्या पद्धतीने तंत्रज्ञानाचा विकास करत होता. त्यामुळे एका तंत्रज्ञानावर काम करणारे मोबाइल दुसर्‍या तंत्रज्ञानावर काम करत नव्हते. दुसरा तोटा अ‍ॅनालॉग[[अनुरूप]](Analog) तंत्रज्ञानाशी निगडित होता. हे तंत्रज्ञान विद्युत-चुंबकीय लहरींच्या प्रदूषणासाठी अत्यंत संवेदनशील असल्यामुळे ध्वनी लहरी वाहून नेण्याचा दर्जा खालावत असे.
 
===दुसरी पिढी===
 
दुसर्‍या पिढीची सुरुवात पहिल्या पिढीच्या अनुत्तरित प्रश्नांमुळे झाली. एकंदरीत दुसर्‍या पिढीचे बदल हे अ‍ॅनालॉग[[अनुरूप]] (Analog) तंत्रज्ञानपासून डिजिटल[[अंकिक]] (Digital) तंत्रज्ञानाकडे आणि मुक्तविकासाकडून प्रमाणीकरणाकडे झाले.
 
कुठल्याही रेडियो तंत्रातील अतिमहत्वाचा घटक हा [[विद्युत-चुंबकीय लहरी]] असतात. या चुंबकीय लहरींचे उपयोग विविध क्षेत्रात (सैन्य, [[अवकाश तंत्रज्ञान]], [[दूरसंचार]] इत्यादी) होत असल्यामुळे त्यांचा पुरवठाही खूप मर्यादित आहे. या कारणाकरता या लहरींचा वापर फार काळजीपूर्वक आणि पूर्ण क्षमतेने करावा लागतो. या विद्युत-चुंबकीय लहरींचे काही महत्त्वपूर्ण गुणधर्म असतात, जसे तरंगलांबी, वारंवारता इत्यादी. यावरूनच ह्या वापराची वेगवेगळी तंत्रे विकसित झाली. ती सर्वसाधारणपणे खालीलप्रमाणे आहेत.