"वासोटा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २७:
अर्धा अधीक किल्ला चढल्यावर एक वाट उजवीकडे जाते. ही वाट केतकीच्या गाद्याजवळून पुढे नागेश्वराकडे जाते. सरळ वाटेने वर चढल्यावर जंगल विरळ होवून कारवीचे रान लागते. कारवीच्या रानातून वर चढल्यावर किल्ल्याच्या पायर्‍या लागतात. त्या चढून भग्न प्रवेशद्वारातून आपण गडामध्ये प्रवेश करतो.
 
या प्रवेशद्वाराजवळून डावीकडील तटबंदीच्या कडेने गेल्यावर आपण पुर्वेकडील बाजूस पाहोचतो या बाजूने आपल्याला शिवसागर जलाशयाचा आणि अथांग पसरलेल्या जंगलाचा देखावा मुग्ध करतो. याच बाजूला पाण्याचे टाके आहे. हे टाके भिंतीमुळे दोन भागात विभागले गेले आहे. पिण्यायोग्य पाणी गडावर येथेच आहे. येथून झाडीतून दक्षिण टोकावर गेल्यावर समोरच जुना वासोट्याचा डोंगर दिसतो. जुन्या वासोट्याच्या बाबू कड्याचे तसेच पाताळवेरी गेलेल्या दरीचे दृष्य आपल्याला खिळवून ठेवते. येथून परत पाण्याच्या टाक्यांकडे येवून उत्तर टोकाकडे निघायचे. गडावरही सर्वत्र झाडीझाडोरा वाढला असल्यामुळे गडावरच्या वास्तू त्यात लुप्त झाल्या आहेत. वाटेवर मारुती मंदिर, मोठ्या वाड्याचे अवशेष तसेच महादेव मंदिर आहे. तेथून पुढे उत्तरेकडील माची आहे. या माचीवर बांधकाम नाही. पण येथून दूरपर्यंतचा परिसर दिसतो. नागेश्वर सुळक्याचे दर्शन उत्तम होते. कोकणातील विस्तृत प्रदेशही येथून न्याहाळता येतो. हा वासोटा गिरीदुर्गाबरोबरच वनदुर्गसुद्धा आहे; यालाच 'मिश्रदुतर्ग्मिश्रदुर्ग' म्हटले जाते.
या किल्ल्याला ऐतिहासिकद्रुष्ट्या अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. या किल्ल्याची मूळ बान्धणी ही शिलाहार वन्शीयवंशीय दुसर्या भोजराजाने केली असल्याचा उल्लेख आधळतो. १६५६ मध्ये शिवाजीराजानीशिवाजीराजांनी जावळी प्रान्ताबरोबरचप्रांताबरोबरच या वासोटा किल्ल्याचाही स्वराज्यात समवेश केला. वासोट्याचे नाव महाराजांनी व्याघ्रगड असे ठेवले. याच्या दुर्गमतेबद्दल पेशवाईत सुद्धा नोन्दनोंद आहे. त्यासंबंधी एका जुन्या आर्येमध्ये वासोट्याच्या गंमतीचा उल्लेख आहे. तो असा --
श्रीमंत प्रतिनिधींचा हा अजिंक्य किल्ला वासोटा
ताई तेलीण मारील सोटा, बापू गोखल्या सांभाळ कासोटा
"https://mr.wikipedia.org/wiki/वासोटा" पासून हुडकले