"वासोटा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२१० बाइट्स वगळले ,  १० वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
सह्याद्रीची मुख्य रांग आणि शिवसागराचे पाणी यामधील भागात घनदाट अरण्य आहे. पुर्वेला घनदाट अरण्य आणि पश्चिमेला कोकणात कोसळणारे बेलाग कडे यामुळे वासोट्याची दुर्गमता खूप वाढली आहे.
 
वासोट्याला जाण्यासाठी प्रामुख्याने दोन मार्ग आहेत. एक कोकणामधून आणि दुसरा घाटमाथ्यावरुन. कोकणातील 'चिपळूण' कडून वासोट्याच्या पश्चिम पायथ्याच्या चोरवणे या गावापर्यंत गाडीमार्ग असून या मार्गावर राज्य परिवहन मंडळाच्या (एस.टी.बस) गाड्या आहेत. चोरवणेपासून नागेश्वराच्या सुळक्याकडून वासोट्याकडे येता येते. दुसरा मार्ग हा जास्त सोयीचा आहे. सातारा-कास-बामणोली असा गाडीरस्ता असून यावर रा.प. च्या बसेस आहेत. बामणोली हे गाव शिवसागर जलाशयाच्या पुर्व काठावर आहे. येथून वासोट्याकडे जाण्यासाठी शिवसागर ओलांडावा लागतो. त्यासाठी बामणोलीमध्ये लॉचेस उपलब्ध होतात. येथून वनखात्याची परवानगी घेवून आपण वासोट्याकडे जावू शकतो. गडावर मुक्काम करायचा असल्यास सातारा वनविभागाकडून परवानगीचे पत्र घ्यावे लागते.
 
लॉच मधून साधारण ४० ते ५० मिनिटांच्या प्रवासानंतर आपण वासोट्याच्या जवळ पोहोचतो. पाण्याच्या फुगवट्यावर हे अंतर कमी जास्त होते. पायथ्याजवळ मेट इंदवाली नावाचे गाव होते. ते फार पुर्वीच उठून गेलेले आहे. त्याचे अवशेष अजूनही दिसतात.
अनामिक सदस्य