"स्वामी विवेकानंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: lt:Vivekananda काढले: tr:Vivekananda
ओळ ४०:
 
=== शिकागो, अमेरिका येथील सर्वधर्मपरिषद ===
[[सप्टेंबर ११]], [[इ.स. १८९३|१८९३]] साली [[अमेरिका|अमेरिकेतील]] [[शिकागो]] शहरात सर्वधर्मीय परिषद भरली होती.सुरुवातीस थोडे नर्वस असूनदेखील त्यांनी "अमेरिकेतील माझ्या बंधु आणि भगिनींनो" अशी भाषणास सुरुवात केली आणि सात सहस्त्र जमावाने टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला जो दोन मिनिटे अखंड चालू होता."सर्वात प्राचीन असणार्‍या सान्याशांच्या वेदिक परंपरेच्या वतीने, जीने जगाला सहिष्णुता आणि वैश्विकतेचा स्वीकार करण्याची शिकवण दिली आहे, मी जगातील नवनिर्मित राष्ट्रांचे स्वागत करतो" या शब्दात त्यांनी आपले व्याख्यान पुढे चालू केले. ह्या परिषदेत विवेकानंदांनी सनातन धर्माचे प्रतिनिधित्व करताना, वेदान्तावर व [[भारत|भारतीय]] संस्कृतीवर व्याख्यान दिले.जगातील सर्व धर्मांचे सारतत्व एकच आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यांनी फारच सुंदर वक्तृत्व करून अमेरिकन नागरिकांची मने जिंकली.आपल्या अल्पशा वक्तृत्वात जनु त्यांनी विश्वाधर्म परिषदेचे प्राणतत्वच विशद केले. आपल्या विचारांनी त्यांनी लवकरच अमेरिकेतील वृत्तपत्रांचे लाक्षा वेधून घेतले. या वृत्तपत्रांनी स्वामींचे वर्णन 'भारतातून आलेला एक वादळी व्यक्तिमत्वाचा संन्यासी' असे केले. 'न्यू यॉर्क क्रिटीक'ने त्यांच्याबद्दललिहिले आहे की "ते दैवी वक्तृत्वाचे धनी तर आहेतच परंतु त्यांचे धीरगंभीर उदगार देखील त्यांच्या काषाय वस्त्रात शोभून दिसणार्‍या तेजस्वी मुखमंडलाहून काही कमी आकर्षक नाहीत." वेदान्त आणि योग या विषयावर त्यांनी अमेरिका, इंग्लंड आणि इतर काही युरोपीय देशांमध्ये जाहीर तसेच खाजगी व्याख्याने दिली. अमेरिका आणि इंग्लंड देशांमध्ये त्यांनी वेदान्त सोसायटी स्थापली.
 
=== समाधी ===