"दत्तात्रेय शंकर डावजेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो `
छोNo edit summary
ओळ १:
'''दत्तात्रेय शंकर डावजेकर''' ऊर्फ '''दत्ता डावजेकर''' ([[नोव्हेंबर १५]], [[इ.स. १९१७|१९१७]] - [[सप्टेंबर १९]], [[इ.स. २००७|२००७]]) हे [[मराठी]] चित्रपटसृष्टीतील संगीतकार, गीतकार होते. 'डीडी' या टोपणनावानेही त्यांना ओळखले जाई. [[इ.स. १९४१]] सालापासून त्यांनी चित्रपटांना व मराठी भावगीतांना संगीत दिले होते.
 
== जीवन ==
[[इ.स. १९४१|१९४१]] सालापासून त्यांनी चित्रपटांना व मराठी भावगीतांना संगीत दिले होते.
दत्ता डावजेकर, सिनेमा क्षेत्रात ते डीडी ह्या नावाने ओळखले जातात. हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीत पार्श्वगायिका म्हणून सर्वात प्रथम गानकोकिळा लता मंगेशकरांना पदार्पणाची संधी देणारा संगीतकार! हिंदी चित्रपट होता आपकी सेवामें आणि गाणे होते पा लागुं कर जोरी रे. तसेच मराठी चित्रपट होता माझं बाळ . डीडींनी त्यानंतर आशा मंगेशकर(भोसले), उषा मंगेशकर आणि सुधा मल्होत्रा ह्यांनाही पार्श्वगायिका म्हणून सर्वप्रथम संधी दिली.
डीडींचे वडील बाबुराव, तमाशात आणि उर्दु नाटकात तबला वाजवत असत. वडिलांबरोबर सदैव असणार्‍या डीडींनी तबला तर शिकून घेतलाच पण पेटी वादनही आत्मसात करून घेतले. तबला-पेटी वादना बरोबरच त्यांनी गाण्यांना चाली द्यायलाही सुरुवात केली. त्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका शांता आपटे ह्यांनी स्वतःच्या गायनाच्या मैफिलींसाठी डीडींना आपल्याबरोबर साथीला घेऊन सगळा उत्तर हिंदुस्थान हिंडवून आणले. इथे डीडींना मासिक २०रूपये पगार मिळत असे.
त्यानंतर डीडींनी काही वर्षे सी.रामचंद्र आणि चित्रगुप्त ह्यांचे सहाय्यक म्हणून काम केले. त्यानंतर १९४१ साली त्यांना स्वतंत्रपणे म्युनिसिपालिटी ह्या मराठी चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची संधी मिळाली. लगेच १९४२ साली त्यांना सरकारी पाहुणे हा चित्रपट मिळाला. ह्यातले नाचे संगीत नटवर हे गीत खूप गाजले. त्यानंतर १९४३ साली माझं बाळ हा चित्रपट मिळाला. ह्यात लता मंगेशकरांनी पहिल्यांदाच पार्श्वगायन केले. त्यापाठोपाठ डीडींचा १९४७ साली आलेला हिंदी चित्रपट म्हणजे आप की सेवामें ज्यात लता दीदींनी पहिल्यांदाच पार्श्वगायन केले. म्हणजेच मराठी आणि हिंदी चित्रपटातले लताजींचे पहिले पार्श्वगायन पदार्पण हे डीडींच्या संगीत दिग्दर्शनात झाले.
ओळ ७६:
| १९६३ || [[पाहू रे किती वाट, चित्रपट|पाहू रे किती वाट]] || मराठी || संगीत
|}
 
 
==बाह्य दुवे==
Line ८२ ⟶ ८१:
* [http://www.aathavanitli-gani.com/Lists/Lyrics%20Details/Datta%20Davjekar.htm 'आठवणीतली गाणी.कॉम' वर दत्ता डावजेकरांनी लिहिलेली गाणी]
* [http://magevalunpahtana.wordpress.com/2009/08/13/मराठी-सुगम-संगीतातील-नरर-3/]
 
{{DEFAULTSORT:डावजेकर,दत्तात्रेय शंकर}}
[[वर्ग:मराठी संगीतकार]]