"कार्ले लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: कार्ले ही प्राचीन काळी ‘वलुरक’ नावाने ओळखली जाणारी ही लेणी आहेत. इ...
 
ओळ १८:
==लेख==
कार्ल्यांच्या या लेण्यांमध्ये [[ब्राह्मी लिपी]]तले ३५ लेख दिसून आले आहेत. यातील बहुतेक दानधर्म विषयक आहेत.
या लेखातून तत्कालीन समाज, त्यांचे नातेसंबंध, रुढी-परंपरा, व्यापार-व्यवसाय, चलन असे अनेक विषय समजू शकतात. धेनुकाकट म्हणजे आजचे [[डहाणू]], सोपारक (आजचे सोपारा), करिजक (कार्ल्याच्या उत्तरेला असलेले करंजगाव) प्रभास म्हणजे आजच्या [[काठेवाड]] भागातील [[प्रभासतीर्थ]] वैजयंती म्हणजे आजचे [[कर्नाटक]]मधील [[उत्तर कन्नड]] जिल्ह्य़ातील बनवासी अशा अनेक गावांचे उल्लेख या लेखांतून दिसून येतात. चैत्यगृहाच्या व्हरांडय़ाच्या भिंतीवरील एका लेखात ‘मामालाहारे’ हा शब्द आलेला आहे. तत्कालीन समाजव्यवस्थेत एखाद्या ठरावीक गावांच्या प्रदेशास - प्रशासकीय भागास ‘आहार’ असे म्हणत. तर ‘मामल’ म्हणजे आजचे मावळ! मावळ तालुक्याचा हा सर्वात प्राचीन उल्लेख असावा. या लेखांमधून वढकी (सुतारकाम), गंधक (सुगंधी द्रव्याचा व्यापार) अशा काही व्यवसायांचीही ओळख होते.<ref>http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=137217:2011-02-18-12-23-27&catid=195:2009-08-14-03-11-12&Itemid=206</ref>
 
==हे ही पाहा==