|longd = 93 |longm = 15 |longs = 50.76 |longEW = W
}}
'''मिनीयापोलिस''' [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[मिनेसोटा]] राज्यातील सर्वांत मोठे शहर व राज्याची राजधानी [[सेंट पॉल, मिनेसोटा|सेंट पॉल]]चे जुळे शहर आहे. मिनियापोलीस हे मिनिसोटा राज्यातील सर्वांत मोठे शहर आहे. शहरामधून [[मिसिसिपी नदी]] आणि शहराच्या बाजूने मिनिसोटा नदी वाहते. मिनियापोलिस शहरात जवळपास २० मोठी तळी असून ''तळ्यांचे शहर'' असा याचा लौकिक आहे. मिनियापोलिस हे नावदेखील मिनिया म्हणजे पाणी आणि पोलिस म्हणजे शहर किंवा गाव, या शब्दांवरून पडले आहे.
[[चित्र:Minneapolis-Mississippi-20070704.jpg|thumb |right|250px|मिनीयापोलिसमधील [[मिसिसिपी नदी]]काठ]] ▼
[[मिसिसिपी नदी]]च्या काठी असलेल्या या शहरास ''तळ्यांचे शहर''ही म्हणले जाते.
{{कॉमन्स|Minneapolis|मिनीयापोलिस}} ▼
मिनियापोलीस हे मिनिसोटा राज्यातील सर्वांत मोठे शहर आहे. या शहरामधून [[मिसिसिपी नदी]] आणि शहराच्या बाजूने मिनिसोटा नदी वाहते. सेंट पॉल ह्या मिनिसोटा राज्याच्या राजधानीच्या शेजारीच हे गाव वसलेले आहे. त्यामुळे या गावांना 'जुळी शहरे' अर्थात Twin Cities असे म्हणतात. मिनियापोलीस शहरात जवळपास २० मोठ्ठी पाण्याची तळी आहेत. पाण्याचा तुटवडा हा शब्द या गावाला माहिती नाही. मिनिसोटा राज्यात १०००० पेक्षा जास्त तळी आहेत! ही गोष्ट ते त्यांच्या गाडीच्या नंबर प्लेटवर अभिमानाने मिरवतात. मिनियापोलीस मध्ये पूर्वीच्या काळी टिंबरच्या खूप मिल्स होत्या. म्हणूनच मिनियापोलीस ला "मिल्सचे शहर" किंवा "तळयांचे शहर" असे म्हणतात. मिनियापोलीस चे नाव हे मिनी म्हणजे पाणी आणि पोलिस म्हणजे शहर किंवा गाव, पाण्याचे शहर अर्थात मिनियापोलीस.
* [{{संकेतस्थळ|http://www.minneapolismn.gov/ |अधिकृत संकेतस्थळ ]|इंग्लिश}}▼
* [{{संकेतस्थळ|http://www.minneapolis.org/ |पर्यटन दालन ]|इंग्लिश}}▼
* {{ Wikitravelविकिट्रॅव्हल|Minneapolis|मिनीयापोलिस}} ▼
{{बदल}}
==मिनियापोलीस -शहर ==
[[चित्र:Wells Fargo Center from Foshay.jpg|thumb|left|मिनीयापोलिस डाउनटाउनमधील वेल्स फार्गो सेंटरची इमारत]]
[[मिनियापोलीस-सेंट पॉल आंतरराष्ट्रीय विमानतळ]] हे साधारण शहरापासून २० मैल अंतरावर येते आणि [[मॉल ऑफ अमेरिका]] त्याच्या अगदी जवळ येते. शहराचे मुख्य २ भाग Downtown आणि Uptown. सगळ्या मुख्य इमारती आणि ऑफिस या परिसरात आणि सर्वांत उंच इमारती ही याच परिसरात. बाकी सगळीकडे इमारतींची उंची ही बरीच कमी असते. खूप म्हणजे खूपच पसरलेले असे हे गाव आहे. किंबहुना अमेरिकाच मुळी खूप पसरलेली आहे. जवळ पास अथवा जवळ जवळ काही नाही. मिनियापोलीस चा बेसबॉल क्लब खूपच नामांकित आहे. गावात मोठ्ठी मैदाने आहेत. लोकांना बेसबॉल म्हणजे जीव की प्राण. आपल्याकडे जसे क्रिकेट तसे इथे बेसबॉल. इथल्या बेसबॉलच्या टीम ला "मिनियापोलीस - सेंट पॉल" असे न म्हणता "Twins (जुळे)" असे नाव आहे ! इथे क्रिकेट बाबत अजिबात प्रेम आणि ज्ञान नाही. पण बेसबॉल बाबत नुसता विचारा, पोपटा सारखे बोलायला लागतील. कोण खेळाडू कुठल्या क्लबचा, कोणाला किती पैसे मिळतात? कोण कसा महत्त्वाचा खेळाडू आहे, सगळी माहिती अगदी तोंडपाठ !!!
या शहरात एक मोठ्ठी बाग आहे. त्याचे नाव Spoon and the Stobery असे आहे. त्या बागेत मध्यभागी एक मोठ्ठा Spoon आहे आणि त्याच्यावरती एक Stobery ठेवेलेतिथे वेगवेगाळी मेटल मधून बनवलेली ठेवेलेली आहेत. पाहायला फार ती मजेशीर आहेत. या शिवाय, मिनियपोलिसमध्ये अनेक बागा, तलाव आहेत. ती पाहाताना मला भोपाळ आणि नैनितालची आठवण आली. लांब लांब अंतरापर्यंत पाणीच पाणी. बाकी काहीच नाही. भोपाळचे बडा झिल आणि छोटा झिल हे या सारखेच. अनेक तलावांच्या बाजूने चालायचे रस्ते आणि सायकल चालवायचे रस्ते केलेले आहेत. त्यामुळे खूप जण सकाळी किंवा संध्याकाळी या तलावावर व्यायाम करण्यासाठी यात असतात. तेथील बंगले पहाल तर तोंडात बोटे जातील. एकेका बंगल्याची किंमत फक्त १५ ते २० लाख USD !!!
तसा पहिला गेला तर मिनियापोलीसच नव्हे तर अख्खी अमेरिका फारफार पसरलेली आहे. जवळ जवळ, चालत पटकन जाता येईल असे काहीच नाही. कुठेही जायचे म्हणले तर आधी गाडी काढावी लागते. नुसता नाश्ता करायचा म्हणाला तरी ५ ते १० मैल लांब गाडी चालवत जावे लागते. सगळे गाव कसं लांब लांब पसरलेले असते. फार गजबजाट नाही. कामाकरता चालणे या लोकांना फारसे मान्य नाही. व्यायाम म्हणून खूप चालतील पण सहज म्हणून लांब कुठे गेले असे प्रकार अंमळ कमीच. सगळीकडे समृद्धता असल्याने सहजासहजी अंग हलवले आणि तेही पटकन हे त्यांना जमत नाही.
==तापमान==
▲[[चित्र:Minneapolis-Mississippi-20070704.jpg|thumb|मिनीयापोलिसमधील [[मिसिसिपी नदी]]काठ]]
मिनियापोलीसला तापमान फार विचित्र असते. हिवाळ्यात फार थंडी तर उन्हाळा खूप सुसह्य असतो. हिवाळ्यात तापमान नेहमीच शून्याच्या खाली जाते आणि बर्फ ही खूप पडतो. 1888 मधे -41 डिग्री पर्यंत तापमान गेले होते. साधारण पणे -15 ते -20 डिग्री पर्यंत तर खाली जातेच. 1984 मधे येथे सर्वांत जास्ती हिमवर्षाव झाला होता. किती माहिती आहे? 100 इंच किंवा 2.5 मीटर !!! त्यामुळे हिवाळ्यात बाहेर पडणे म्हणजे 'नको रे बाबा' अशी परिस्थिती असते. सगळीकडे फक्त बर्फ आणि बर्फ. गाडीवर, रस्त्त्यावर जिथे पहावे तिथे बर्फच. हिवाळ्यातील पहिला Rainfall फार छान वाटतो पण नंतरचे 3 ते 4 महिने नको इतका बर्फ पडतो. अमेरिकेच्या उत्तरेस असल्याने आणि कॅनडाची सीमा लागूनच असल्याने येथे वर्षभराचे Average Temp 7 डिग्री सेल्सिअस असते. उन्हाळा वर सांगितल्याप्रमाणे बराच सुसह्य असतो. 25 ते 30 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान दुपारी जाते. रात्री 15 डिग्री सेल्सिअस पर्यंत. या काळात येथील लोक सुद्धा एकदम खुष असतात. उन्हाळ्यात दिवशी खूप मोठ्ठा असतो. सकाळी 5 वाजताच उजडते तर रात्री 9 वाजता सुयास्त होतो. जवळ जवळ रात्री 10 ते 10.30 पर्यंत उजेड असतो. अर्थात लोकांना जास्त वेळ दिवस मिळतो. सगळेजण आपल्याला पाहिजे ते कपडे (?) घालून संध्याकाळी मस्त फिरू शकतात. या काळात त्यांना घराबाहेर किंवा ऑफीस बाहेर जास्त काळ राहायला आवडते. छान पैकी गाडीच्या काचा उघड्या करून किंवा टप उघडे करून ते या काळातच Long Ride ला जाऊ शकतात. निसर्गाचे नवे रूप याच काळात पाहायला मिळते. याच्या अगदी विरुद्ध हिवाळयात. सकाळी 9 वाजता उजाडते आणि दुपारी 4 वाजता अंधार गुडूप! सकाळी अंधारातच ऑफीस ला जायचे आणि अंधारातच परत यायचे. आणि ते ही अंगावर आपल्या वजनाचे गरम कपडे घालून. शिवाय रोजच्या रोज गाडीवरचा बर्फ काढत बसायचा तो वेगळाच. सिमेंटचे रस्ते जिथे प्राण सोडतात तिथे माणसाचे काय? यावर उपाय म्हणून मिनियापोलीस च्या डाउन टाउन मधील सगळ्या इमारती या आतून जोडलेल्या आहेत. साधारण जमिनीपासून 2 मजले उंचीवर हे जोडणारे रस्ते आहेत. ऑफीस ला जाताना गाडी पार्क करायची आणि जवळच्या कुठल्यातरी एका इमारतीमध्ये शिरायचे. आणि मग या मार्गांनी आपल्या इच्छित स्थळी पोहोचायचे.
==नंबर प्लेट ==
अमेरिकेची संपूर्ण इकॉनॉमी ही कार उत्पादनावर अवलंबून असल्याने मुद्दामूनच कार संदर्भातील गोष्टी जसे पेट्रोल, रस्ते वगैरे पायाभूत सुविधा त्यांनी चांगल्या करून ठेवल्या आहेत. त्याचा विचार आणि अंमलबजावणी दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर झाली. सगळे रस्ते अगदी मोठ्ठे आणि चकाचक असतात ३ ते ४ लेन, Left Hand Drive, त्यामुळे उजवीकडून मोठ्या रस्त्यावर येणे सोपे तर डावीकडून येण्यासाठी २७० अंशाचे वळण. Flyover या साऱ्या गोष्टो त्यांनी फार पूर्वी करून ठेवल्या आहेत. आज आपल्याला भारतातीलही रस्ते आणि Flyover दिसतात आणि चांगले वाटतात पण हीच गोष्ट त्यांनी ६० ते ७० वर्षांपूर्वी केली आहे. स्वस्छ सुंदर मोठ्ठे Sign Board वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी आणि शिस्त ह्या गोष्टी तर सांगायला नकोतच. सगळ्या रस्त्यांवरील सगळे सिग्नल २४ X ७ चालू असतात आणि कोठेही पोलीस नसला तरी प्रत्येक जण पाळतात. येथील नंबर प्लेट मात्र जरा मजेशीर आहेत. आपल्यासारखे MH12 , DL01 असला प्रकार नाही. अक्षर आणि अंक कोणतेही आणि कितीही हेच त्याची विशेषता. त्यामुळे नंबर पाहून ही गाडी कुठल्या गावाची आहे ते काळात नाही पण कुठल्या राज्याची किंवा प्रांताची आहे ते मात्र लिहावे लागते शिवाय त्या प्रांताची विशेषता. जसे "मिनीसोटा - १०००० तळी" , "न्यूजर्सी - गार्डन स्टेट", "न्यूयॉर्क - एम्पायर स्टेट". शिवाय गाडीचे Registration स्त्रेपरत कधी करायचं आहे त्याची तारीख. गावाची विशेषता ही क्वचित पाटीवर पडलेली असते. जसे मिनीसोटा - "Save Trees".
==ट्राफिक जाम==
ट्राफिक जाम हा येथील जीवनाचा अविभाज्य भाग आहे. सकाळी उठलं आणि ऑफिस ला जाण्यापूर्वी प्रथम ट्राफिक जाम बद्दल TV वर पाहायचे आणि मगच बाहेर पडायचे. सकाळी TV वर याच बातम्या असतात. यावर उपाय म्हणून काही लोक भल्या पहाटेच ऑफिस ला जातात. सकाळी ट्राफिक जाम मध्ये २ तास घालवण्या पेक्षा पहाटे २०-२५ मिनिटात ऑफिस. तसेच बऱ्याच ऑफिस ना भारत आणि चीन बरोबर बोलायचे असते म्हणूनही ऑफिस मध्ये लवकर येण्याचे प्रमाण आता बरेच वाढले आहे. USA १०.३० तास मागे (मिनियापोलीस साठी) तर चीन,सिंगापूर त्यापेक्षा जास्त त्यामुळे या देशांशी सकाळीच बोलणे बरे पडते. चांगल्या सवई लागतात त्या अशा. ट्राफिक जाम आणि असे फोन या निमित्ताने लोक लवकर उठायला लागले आहेत. ऑफिस ला लवकर येत त्यामुळे घरी लवकर जायला मिळू शकते. आपल्या कुटुंबाबरोबर आणि आपल्या छंद आणि आवडी जोपासायला भरपूर वेळ त्यामुळे मिळतो. मी असे काही लोक पहिले आहेत की जे ऑफिसला पहाटे ४-५ वाजता किंवा ६ वाजता येतात. "लवकर झोपा आणि लवकर उठा" ही उक्ती त्यांना आता चांगली लागू पडली आहे. एक व्यवस्थित शिस्तशीर आणि नियोजन बद्ध आयुष्य जगायला त्यामुळे त्यांना आज मदत होते.
▲* [http://www.minneapolismn.gov/ अधिकृत संकेतस्थळ]
▲* [http://www.minneapolis.org/ पर्यटन दालन]
▲* {{Wikitravel|Minneapolis|मिनीयापोलिस}}
▲{{कॉमन्स|Minneapolis|मिनीयापोलिस}}
[[वर्ग:मिनेसोटामधील शहरे]]
[[वर्ग:मिनीयापोलिस| ]]
{{Link FA|en}}
|