"तारा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३,९५८ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: tt:Йолдыз)
==तार्‍यांचा अंत==
अणुकेंद्र संमीलनात हायड्रोजनचे रुपांतर होत असल्याने तो कमी होत जातो तर हेलियम वाढत जातो. यात ताऱ्याला बाहेरच्या बाजूने ढकलणारा उष्मीय दाब गुरुत्वाकर्षणाच्या तुलनेत कमी होत आणि गाभा आकुंचन पावू लागतो. या आकुंचनामुळे गाभ्याची घनता वाढते. परिणामी तापमान आणि ज्वलनप्रक्रियेचा वेगही वाढु लागतो. याचा परिणाम तारा अधिकाधिक तेजस्वी दिसू लागण्यात होतो. यालाच तारा सुजणे किंवा फुगणे असे म्हणतात. जेव्हा ताऱ्याच्या अंतर्भागातील हायड्रोजन पूर्णपणे संपुष्टात येतो व ऊर्जानिर्मिती थांबते तेव्हा गुरुत्वीय बल इतके प्रभावी बनते की, गाभ्यात फक्त हेलियम उरलेला असतो त्याचेही ज्वलन सुरु होते. ही क्रिया साधारण गाभ्याचे तापमान जेव्हा सुमारे १० कोटी केल्विन पर्यंत पोहोचते तेव्हा होते आणि ताऱ्याला ऊर्जानिर्मितीचा दुसरा स्रोत मिळतो. या क्रियेस ट्रिपल अल्फा प्रोसेस असे म्हणतात. यात कार्बन तयार होतो व गाभ्याचे आकुंचन चालूच राहते. काही वर्षांनी तापमान इतके उच्च होते की, हेलियमच्या गाभ्याचा प्रचंड स्फोट होतो. यालाच सुपर नोव्हा असे म्हणतात. हा स्फोट अतोशय प्रचंड असुन तरी तीव्र उर्जेचे गॅमा किरण त्यातुन बाहेर पडतात. पृथ्वीपासुन काही प्रकाशवर्षे अंतरावर जरी असा स्फोट झाला तरी पृथ्वी वरील जीवन पुर्णपणे नष्ट होईल. या स्फोटात तार्‍याचे वस्तुमान जरी विखुरले जात असले तरी असा प्रचंड स्फोटही ताऱ्याला पूर्णपणे संपवू शकत नाही. अखेर ' चंद्रशेखर मर्यादा ' नुसार हे ठरते की तारा श्वेतबटू, न्यूट्रॉन तारा व कृष्णविवर यापेकी काय बनेल.
 
===ग्रहानुवर्ती अभ्रिका===
विश्व जन्मास आले त्यावेळी अवकाशात [[हेलियम]] व [[हायड्रोजन]] ही दोनच मूलद्रव्ये विपुल प्रमाणात तयार झाली असे मानले जाते. इतर जड मूलद्रव्ये (उदा. [[प्राणवायू]], [[नत्र]], इ.) तार्‍यांमुळे निर्माण झाली. तारे हे अशी [[मूलद्रव्ये|मूलद्रव्ये]] बनविण्याची भट्टी आहे. ताऱ्यांना त्यांची [[ऊर्जा]] [[हायड्रोजन]] अणूंच्या केंद्रकांच्या संयोगातून [[हेलियम]] निर्माण करून मिळते असे मानले जाते. असा तारा कोट्यावधी वर्षे अशा रीतीने ऊर्जा मिळवतो. या प्रक्रियेअंती ताऱ्याच्या गाभ्यातील [[हायड्रोजन]] संपून जातो. अशा वेळी तारा आकुंचन पावतो आणि यामुळे वाढलेल्या तापमानात [[हेलियम]]चे रूपांतर [[कार्बन]]मध्ये होण्यास सुरुवात होते. पुढे अशाच प्रक्रियांमधून इतर मूलद्रव्येही निर्माण होतात असे मानले जाते. ही मूलद्रव्ये बाहेर अवकाशात विखुरली जातात. ताऱ्याच्या वार्धक्याच्या काळात एक वेळ अशी येते की, ताऱ्याचे बाहेरील कवच ताऱ्यातील अस्थिर स्थितीमुळे दोलायमान होते. याचे पर्यवसान अंतिमत: ताऱ्याचे बाहेरचे कवच अवकाशात उधळण्यात होते. या प्रक्रियेतच ताऱ्यात निर्माण झालेली मूलद्रव्ये अवकाशातच विलीन होतात. तारा व त्यातून भिरकावलेल्या [[वायू]] व मूलद्रव्यांचा ताऱ्याभोवती एक प्रकाशमान [[ढग]] तयार होतो. ज्यास ग्रहानुवर्ती अर्भिका (planetary nebulae) म्हणतात. या घटनेनंतर तारा मृत्युपंथाला लागतो. पण ताऱ्यातून अवकाशात विखुरलेली ही मूलद्रव्ये [[पृथ्वी]]सारखे [[ग्रह]] व त्यावरील मानवासारखे जीव बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. जुलै २०१० मध्ये स्पिट्झर या या अवकाशस्थित दुर्बिणीला बकीबॉल या बकीबॉल हा आजवर अवकाशात सापडलेला सर्वात वैशिष्ट्यपूर्ण आणि विशाल रेणूंचा साठा टीसी-१ या ग्रहानुवर्ती अभ्रिकेत आढळला होता.
 
==अंतानंतरची अवस्था: श्वेतबटू, न्यूट्रॉन तारा व कृष्णविवर==
 
==बाह्य दुवे==
* [ब्रीफ हिस्टरी ऑफ टाईम- स्टिफन हॉकिंग]
[[वर्ग:खगोलशास्त्र]]
[[वर्ग:तारे| ]]
[[वर्ग:विज्ञान]]
 
{{Link FA|tr}}
{{Link FA|ko}}
अनामिक सदस्य