"रामचंद्र कृष्णाजी फाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
'''रामचंद्र कृष्णाजी फाटक''' तथाऊर्फ '''राम फाटक''' (?जन्मदिनांक अज्ञात - [[सप्टेंबर २६]], [[इ.स. २००२|२००२]]) [[मराठी]] गायक, संगीतकार होते.
 
शिक्षणाने एम.ए., बी.टी. असलेल्या राम फाटकांनी काही वर्षे शिक्षकी पेशा पत्करला. पुढे १९५६ पासून पुढील १० वर्षे आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावर तर त्यापुढील १० वर्षे पुणे आकाशवाणीवर
त्यांनी नोकरी केली. इथेच भास्करराव गोडबोले आणि जे.एल.रानडे ह्यांसारख्यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. पुणे आकाशवाणी केंद्रावर असतानाच जेष्ठ गायक आणि संगीतकार [[सुधीर फडके]] ह्यांच्याशी त्यांचा स्नेह जुळला. सुधीर फडक्यांच्या ’गीत रामायण’ मधील काही गाणी ते गायले. आकाशवाणीच्या पुणे केंद्रासाठी त्यांनी शास्त्रीय संगीत गायिका बेगम [[परवीन सुलताना]] यांच्या कडून काही मराठी भावगीते गाऊन घेतली.
 
इ.स. १९७२ साली त्यावेळचे नवोदित गीतकार [[सुधीर मोघे]] ह्यांच्या ’सखी मंद झाल्या तारका’ ह्या गीताला रामभाऊंनी स्वरबद्ध करून [[पं. भीमसेन जोशी]] ह्यांच्याकडून हे गाणे गाऊन घेतले. पुढे हे गाणे ध्वनीफितीद्वारे सुधीर फडक्यांच्या स्वरात प्रकाशित करण्यात आले.
 
रामभाऊंनी ’संतवाणी’ मधील ’तीर्थ विठ्ठल’, ’माझे माहेर पंढरी’, ’पंढरी निवासा’, ’अणुरेणीया थोकडा’ हे पंडितजींकडून गाऊन घेतलेले अभंग खूपच लोकप्रिय झाले. ह्याबरोबरच ’दिसलीस तू’, ’डाव भांडून मांडून मोडू नको’ आणि ’सखी, मंद झाल्या तारका’ ही सुधीर फडक्यांनी गाईलेली भावगीते प्रचंड गाजली.
 
 
== बाह्य दुवे ==
* [http://www.loksatta.com/daily/20020928/evru.htm ’लोकसत्ता’च्या २९ सप्टेंबर इ.स. २००२ च्या आवृत्तीमधील वृत्तवेध हा लेख ]
* [http://www.aathavanitli-gani.com/Lists/Composer%20Details/Ram%20Phatak.htm 'आठवणीतली-गाणी.कॉम' या संकेतस्थळावर राम फाटक यांनी संगीत दिलेली गाणी]
* [http://www.aathavanitli-gani.com/Lists/Singer%20Details/Ram%20Phatak.htm 'आठवणीतली-गाणी.कॉम' या संकेतस्थळावर राम फाटक यांनी गायलेली गाणी]