"अगस्त्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो "अगस्ती ऋषी" हे पान "अगस्त्य" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:WLA_lacma_12th_century_Maharishi_Agastya.jpg|thumb|right|200px|अगस्त्याचे शिल्प]]
'''अगस्त्य''' (नामभेद: '''अगस्त्य मैत्रावरुणि''', '''अगस्ति''' ;) हा [[हिंदू]] पुराणांमध्ये उल्लेख असलेला एक सूक्तरचनाकार ऋषी होता. याने आर्यावर्ताच्या दक्षिणेकडील भूप्रदेशात आर्यांच्या वसाहतीकरणाची सुरुवात करणारा तो आद्य वसाहतकार होता, असे मानले जाते {<ref>{पुस्तक स्रोत| first = सिद्धेश्वरशास्त्री | last = चित्राव | title = भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश | language = मराठी | publisher = | year = इ.स. १९६८ | ref = चरित्रकोश }}</ref>. [[विदर्भ|विदर्भाचा]] राजा [[निमि]] याच्या [[लोपामुद्रा]] नामक कन्येशी अगस्त्याचा विवाह झाला. अगस्त्यापासून लोपामुद्रेला इघ्मवाह ऊर्फ दृढस्यु नावाचा पुत्र झाला.
पुराणकालीन एक ऋषी. यांनी [[नहुष]] राजाला शाप दिला.
 
अगस्त्याचा जन्माबद्दल ॠग्वेदात चमत्कृतिपूर्ण कथा सांगितली आहे. [[उर्वशी]]ला पाहून कामोत्तेजित झालेल्या [[मित्रावरुण|मित्रावरुणाचे]] रेत गळून कमळाच्या पानावर सांडले व पुढे कुंभात ठेवल्यावर त्यातून [[वसिष्ठ]] व अगस्त्याचा जन्म झाला.
 
अगस्त्याच्या उर्वरित आयुष्यातील प्रसंगांबद्दलही विस्मयकारक आख्यायिका आढळतात. [[महाभारत|महाभारतात]] अगस्त्याने केलेल्या समुद्रप्राशनाची कथा नोंदवली आहे. देवांशी वैर धरलेले कालकेय दानव समुद्राच्या तळाशी जाऊन लपल्यावर अगस्त्याने अख्खा समुद्र पिऊन कालकेयांना ठार मारले व देवांवरील संकट निवारले. याबरोबरच त्याने [[वातापि]] नावाच्या दैत्यास आपल्या जठराग्नीने पचवून त्याचा भाऊ [[इल्वल|इल्वलास]] शरण आणले.
 
महाभारतात अन्यत्र अगस्त्य [[विंध्य]] पर्वताचा गुरू असल्याचे उल्लेख आहे. प्राचीन काळी विंध्य उंचीने सतत वाढत असल्यामुळे त्याला गर्व झाला. अगस्त्य दक्षिणेस जात असताना विंध्य त्यास आडवा आला व गुरू असलेल्या अगस्त्यापुढे नमला. अगस्त्याने त्याला आपण दक्षिणेकडून परतेपर्यंत आहे त्या स्थितीच स्थिरावण्यास सांगितले. परंतु दक्षिणेकडे गेलेला अगस्त्य न परतल्यामुळे विंध्य कायमचा विनतावस्थेत राहिला व आर्यांवर्ताचा दक्षिणदेशाशी संपर्क स्थापन झाला.
 
त्रेता युगातही राम, सीता व लक्ष्मण वनवासात हिंडताना अगस्त्याश्रमात आले व अगस्त्याला भेटले अशी कथा आहे. त्यावेळी अगस्त्याने रामास [[रावण|रावणाचा]] अंत करू शकणारा बाण दिला.
 
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
 
== बाह्य दुवे ==
* {{संकेतस्थळ|http://agastiashram.org/imp.htm|अगस्ती आश्रम, जि. अहमदनगर यांचे संकेतस्थळ|मराठी}}
 
अगस्ती ऋषी हे सर्व विश्वाला{{1}} परिचित असे ऋषी असुन त्यांचा जन्म कुंभात झाला. अग्नि व वायु याचे ते अवतार. मित्रा-वरूणी त्यांचे वडील होत. जन्मतःच ते तप करण्यासाठी वनात निघून गेले. कठोर तपश्चर्या करून तपश्चर्येचा मुकूटमणी म्हणून ते प्रसिध्द झाले{{1}}.
ऋषी म्हणजे जप, तप, ध्यान हेच त्यांचे कार्य पण अगस्ती ने लोकहिताची अनेक कार्ये करून हक्क मिळवुन देण्यात ते अग्रेसर राहिले{{1}}.
समुद्र प्राशन, नहुषपतन व विंध्य विजय याबरोबरच त्यांनी वातापी नावाच्या दैत्यास आपल्या जठराग्नीत पचविले. व त्याचा भाऊ इलवल यास हुंकाराने भस्म केले. व त्याच्या मुलास राज्याभिषेक करून राज्य प्रदान केले.
 
अगस्ती ऋषी हे महान तपस्वी होते.त्रेता युगात अगस्ती ऋषीना महापुरूष प्रभुरामचंद्र लक्ष्मण व सीता वनवासात असत्यावेळी अगस्ती आश्रमात येऊन त्यांचे आशिर्वाद घेतले. त्यावेळी शस्त्रे, अस्त्रे व रावणाचा अंत करणारा बाण अगस्तीने श्रीरामास भेटी अंती दिला.
[सन्दर्भ्-1 http://agastiashram.org/imp.htm]
[[वर्ग:हिंदू पौराणिक व्यक्ती]]
[[वर्ग:रामायणातील व्यक्तिरेखा]]
"https://mr.wikipedia.org/wiki/अगस्त्य" पासून हुडकले