"जाहिरात" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
छो शुद्धलेखन दुरुस्त्या, replaced: सर्वात → सर्वांत (2) using AWB
ओळ १:
==वृत्तपत्रीय जाहिरातींचे स्वरूप==
{{विकिकरण}}
.<ref>http://www.maayboli.com/node/9144 ची कॅश आहे. 29 Sep 2009 00:22:46 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे. </ref>
 
ह्या तोट्यातल्या आवृत्त्या का चालवल्या जातात? तर उत्तर पुन्हा- जाहिराती..! एखाद्या क्लायंटला आपल्या उत्पादनासाठी पूर्ण देशभर कँपेन करायची असेल, तर सर्वत्र 'प्रेझेन्स' असलेलेच वृत्तपत्र तो निवडेल, हे सरळ आहे. अशा नॅशनल कँपेन्स म्हणजे अक्षरशः 'क्रीम' असते. एखाद्या मोठ्या ब्रँडची '''जाहिरात''' वृत्तपत्रात येण्यामुळे लोकांच्या मनातली त्या वृत्तपत्राची असलेली प्रतिमा झटक्यात बदलून टाकू शकते. १ कोटी रुपये मिळविण्यासाठी १०० छोट्या ग्राहकांशी डोकेफोड करण्यापेक्षा एकाच, प्रचंड इमेज असलेल्या क्लायंटची जाहिरात करणे हे कितीतरी सोपे. मग अशा नॅशनल कँपेन्स मिळविण्यासाठी काय वाटेल ते केले जाते. भरमसाठ डिस्काऊंट आणि सढळ हाताने 'एडिटोरियल सपोर्ट' या गोष्टी मग सहजच होतात. (या 'एडिटोरियल सपोर्ट' बद्दल खाली लिहिले आहेच.)
 
गेली अनेक वर्षे, दशके, एकाच गावात असलेले वृत्तपत्र दुसर्‍या गावात नेणे, त्याची दुसरी आवृत्ती सुरू करणे हे वाटते तेवढे सोपे नसते. तिथे आधीच कुणीतरी 'दादा' वृत्तपत्र असते. तेच वाचण्याची लोकांना सवय असते. तर या 'दादा'चा विरोध मोडून काढाच, शिवाय लोकांच्या सवयी बदला! बक्षीस योजना, नाचगाण्याच्या कार्यक्रमांद्वारे प्रसार, फुकट पेपर वाटणे हे आणि इतर अनंत उपद्व्याप करून मोठमोठे समूह अशा गोष्टी पार पाडतात. पेपरच्या लाखो प्रती फुकट वाटणे- यावर अनेकांच्या भुवया उंचावतात. परंतू पेपर विकून आलेले उत्पन्न हे एकूण उत्पन्नाच्या दहा टक्केही नसावे, यावरून काय ते समजावे.
ओळ ३९:
२) तीच गोष्ट 'एज्युमंत्र' ची. एखादी अ‍ॅनिमेशन शिकविणारी संस्था वर्षभर जाहिराती करते. अन त्याच संस्थेचा डायरेक्टर 'अ‍ॅनिमेशन फील्ड' मधले भविष्य / करिअर' या विषयावर लेख लिहून पाठवतो. जाहिरात असलेल्याच पानावर ते छापले जातात. यातून विद्यार्थ्यांना 'अधिक' माहिती मिळते, हे तर खरेच. अन त्या संस्थेत मग जास्त संख्येने अ‍ॅडमिशन्स होतात, हे त्याहूनही खरे!
 
रविवार पुरवण्यांमध्ये देश-परदेशातल्या सहलींची आणि प्रेक्षणीय स्थळाची वाचायला मिळते. ते 'लेख' असतात, अशी अजूनही अनेकांची कल्पना आहे. 'केसरी' (टूर्स) च्या वीणा पाटलांनी जाहिरातीचा हा अभिनव फॉर्म मराठी वृत्तपत्रांत चालू केला. त्याआधीही असे प्रकार होत होतेच. परंतू कमी प्रमाणात. वाचकांना माहिती देऊन 'गुडविल' कमवायचे, की धंदा, अन पैसे आपोआपच चालत येणार, हा सरळ हिशेब. हा लेख-कम-कॉलम-कम-जाहिरात वर्तमानपत्राच्या मुळ फाँटचाच प्रकार अन साईझ वापरून केला जातो. हे संपादकीय आर्टिकल आहे, असे भासविण्यासाठी. पण अशा लेखांच्या सर्वातसर्वांत खाली कोपर्‍यात advt असे बारीक अक्षरांत छापण्याचे बंधन आधी होते. जेणेकरून त्या लेखातली मते व विषयांशी वर्तमानपत्राचे धोरण जोडले जाऊ नये. आताही काही मराठी वृत्तपत्रांत असे advt दिसते कोपर्‍यात. पण एकूणच फारसे सोवळे-ओवळे पाळले जात नाही आजकाल त्याबद्दल.
 
पुण्यातल्या वेज रेस्टॉरंट्सना जाहिरातीची गरज नसते. संध्याकाळ झाली, की लोकच वाट बघत, नंबर यायची वाट बघत दाराशी उभे राहतात. त्यामुळे हा क्लास जाहिरातींमध्ये ओढण्यासाठी आक्रमक प्रकाशनांनी अनेक क्लृप्त्या शोधून काढल्या. जाहिरातींमध्ये भरमसाठ स्कीम्स अन डिस्काऊंट्स तर दिलेच, शिवाय, स्पेशल थाली व डिशेस, हॉटेलमधले नम्र व प्रसन्न वातावरण.. इ. ची माहिती लेखांमधून छापायला सुरूवात केली. आता, खवैय्याला काय घेणे आहे, ही माहिती कुठून अन कशी मिळाली ते? अमूक पेपरमध्ये तुमच्या या डिशबद्दल वाचले, असे जेव्हा तो हॉटेलमालकाला सांगायला जातो, तेव्हा तो मालकही, 'हा, हा. इतके पैसे खर्च केले होते बघा, त्या आर्टिकलसाठी!' अशी फुशारकी मारून सांगतो.
ओळ ५३:
'पेड एडिटोरियल' इतका नसला तरी जाहिरातींमध्ये होऊ घातलेली विविधांगी 'इनोव्हेशन्स' हाही एक विवादास्पद भाग. इनोव्हेटिव्ह जाहिरातींचा सुळसुळाट झालेला सध्या दिसत आहे. जाहिरात 'ओव्हरलुक' होण्याचे प्रमाण कमी कसे करता येईल, अन येनकेनप्रकारेण लोकांच्या नजरेस कसे पडता येईल यासाठी आघाडीच्या उत्पादनांची, ब्रॅड्सची कसरत नेहेमी चालू असते. डोके लढवून क्रिएटिव्ह अ‍ॅड्स करायच्या अन भुवया उंचावल्या जातील, अशी पोझिशन पटकावून लोकांपूढे जायचा हा सोस. नेहमीपेक्षा वेगळे काहीतरी केले की हमखास लक्ष वेधले जाणारच, हा मुळ मंत्र!
 
इनोव्हेटिव्ह अ‍ॅड्स साठी 'प्रिंट मीडिया' सर्वातसर्वांत उत्तम. जाहिराती सुरू झाल्या की रेडिओ / टीव्हीचे चॅनल्स आपण बदलतो. (यावर कडी करून कार्यक्रमात किंवा निवेदनातच जाहिराती करण्याची आयडिया आहेच!) पण वर्तमानपत्रात बातम्यांच्या नेहेमीच्या जागी जाहिरात असेल, तर तुम्ही काय करणार? नाईलाजाने का होईना लक्ष जाणारच. इथेच या जाहिरातीचा हेतू साध्य होतो. 'कॉलर पोझिशन' हा एक प्रकार. वर्तमानपत्राच्या नावाभोवती इंग्रजी 'यू' आकाराची जाहिरात. मग त्याखाली मथळे, बातम्या वगैरे. याजागी बातमी पाहायची सवय झालेला वाचक स्तिमित होतो. पण तसे का होईना, जाहिरात बघतोच! काहींना हे आवडते, काहींना नाही. कोणत्याही नियतकालिकाचे दर्शनी, पहिले पान हे त्यांचे धोरण, संस्कृती, इतिहास अन इतर बरेच काय काय दर्शविणारे असते. अन त्यामुळेच त्या त्या नियतकालिकाची विशिष्ट प्रतिमा वाचकांच्या मनात पक्की झालेली असते. जास्तीत जास्त पाव पानभर, तेही खाली, जाहिरातीसाठी जागा देणारे पहिले पान अशा अर्ध्याच्या वर जाहिरातीनेच भरून गेलेले पाहून जुने वाचक नाराज होतात. त्यामुळे तारतम्य बाळगून फ्रंट पेजवर जाहिरातीला जागा देणारी अजूनही अनेक वृत्तपत्रे आहेत. पण वरची २० ते २५% जाग व्यापणार्‍या कॉलर अ‍ॅड्सना आता वाचकही फारसा आक्षेप घेत नाहीत. उलट हे काय नवीन, म्हणून उत्सूकतेने पुन्हा पुन्हा बघणारेही आहेत. अशा अ‍ॅड्सच्या भरघोस रीडरशिपमुळे त्यांचा दरही नेहेमीपेक्षा दुप्पट, अडीचपट, किंवा तीनपट असतो. मोठे ब्रँड्स तो देतातही.
 
'जाहिरात पुरस्कृत' पुरवण्या काढणे हे तर नेहेमीचेच. म्हणजे वरती बारीक अक्षरांत 'टाईम्स स्पेस मार्केटिंग इनिशिएटिव्ह' असे लिहायचे अन नंतर चार सहा पाने भरभरून जाहिरात!
"https://mr.wikipedia.org/wiki/जाहिरात" पासून हुडकले