"व्हिन्सेंट व्हॅन घो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो clean up, replaced: बाह्यदुवे → बाह्य दुवे using AWB
छो Typo fixing, replaced: करुन → करून (2) using AWB
ओळ ६०:
त्याच्या कलेला बहर येत होता, पण त्या शहरी पॉलिश्ड वातावरणात व्हिन्सेंट मिसळून जाणं कठीण होतं. त्याचं मद्यपानाचं प्रमाण अति होतं अन् स्वभाव तापट. परिणामी त्या शहरी तलम वातावरणात हे भरड वाण साऱ्यांनाच खुपू लागलं. उत्तेजित होऊन आक्रस्तळेपणाने आरडाओरड करणं, विरोधी मत संयमितपणे मांडण्याऐवजी भडकपणे समारच्याचा अपमान करीत मांडणं, नावड-नाराजी झाकून न ठेवता बेमुर्वतखोरपणे लागट भाषेत ती जाहीर करणं या सामाजिक अवगुणांचा परिपोष त्याच्या जीवनात होत होता. आपपरभाव न ठेवता अगदी थिओशीही त्याचं कडाक्याचं भांडण झालं. इथे दोन वर्षं संपतासंपता त्यानं पॅरिस टाकून दक्षिणेकडे जाण्याचा निर्णय जाहीर केला. पॅरिसच्या वास्तव्यात तो जपानी चित्रकलेच्या संपर्कात आला आणि प्रभावित झाला. फ्रान्सचा दक्षिण भाग हा त्याच्या मते जपानसम होता. सार्सेल्स बंदराजवळच्. आर्ल्स गांवी आता हे वादळ येऊन स्थि व्हायचा विचार करु लागलं. 1888 च्या फेब्रुवारीतली हा गोष्ट.
 
इथं त्यानं एक दुमजली घर घेतलं. त्याच्या भिंतींना बाहेरून पिवळा रंग होता. जपानी संस्कृतीत हा रंग मैत्रीचं प्रतीक मानला जातो. या येलो हाउसमध्ये त्याला एकूणच दुर्मीळ असा नवोन्मेषाचा आनंद मिळू लागला. चित्रनिर्मितीत तो बेभान होऊन गेला. “नवनवीन कल्पनांच्या झुंडींच्या झुंडी माझ्यावर चाल करुनकरून येताहेत” असे त्याचे या कालखंडावरचे वाक्य आहे. त्याचे मैत्रीचे संबंध पोस्टमन रॉलिन, एका कॅफेचा चालक वगैरेंशी जमले, पण स्थानिक रहिवाश्यांना व्हिन्सेंटचं एकूण राहणं वागणं जरा विपरितच वाटू लागलं.
 
त्याचं आवेगानं काम करणं चालूच होतं. फक्त चांगला भाग असा, की इथं त्याच्या मनाला आशास्पद अन् स्थैर्याची बावना होत होती. या भावनेचा प्रत्यय इतर कलावंतांना यावा या हेतूने त्याने आपल्या “कलावंतांची वसाहत” या योजनेचा पाठपुरावा सुरू केला. त्याला पॉल गोगँ हवाहोता आणि यासाठी थिओनं मध्यस्थी करावी अशी त्यानं थिओला गळ घातली. अखेर थिओनं आपलं वजन वापरून गोगँला राजी केलं. मोकळेपणी कलाविष्कार करता येईल या विचारानं ब्रिटनीहून आपला बाडबिस्तरा गुंडाळून गोगँ आर्ल्सला येलो हाऊसमध्ये उतरता झाला.
ओळ ७२:
1890च्या वसंतात त्याची एक कलाकृती प्रथमच विकली गेली. त्याच्या हयातीत विकली गेलेली ही एकमेव कलाकृती. 400 फ्रँक्सची ही विक्री थिओनं आनंदानं व्हिन्सेंटला कळवली. आता व्हिन्सेंट परत पॅरिसला, थिओकडे आला. थिओ, त्याचा नवा संसार, व्हिन्सेंट याच नावाचा त्याचा मुलगा, यांसोबत तो कांही काळ राहिला. आणि मग दक्षिणेकडे ऑव्हर्स गांवी डॉ. गेशे यांच्या देखरेखीखाली राहू लागला. प्रकृती सुधारते आहे असं दिसू लागलं, परत चित्रनिर्मिती सुरू झाली. मग एका पॅरिसभेटीत त्यलाच जाणवलं, की आपण थिओवर भार होत आहोत. आपल्यावरचा त्याचा खर्च फारच होतो आहे आणि त्याला त्याचा स्वतःचा संसार आहेच की...
 
रविवार, 27 जुलै 1890. व्हिन्सेंट नेहमीसारखा भटकत शेतांवर गेला. संध्याकाळी उशीरा परतला. थेट त्याच्या खोलीवर जाऊन खाटेवर निजून राहिला. त्यानं स्वतःच्या छातीत गोळी झाडून घेतलेली होती. रात्रभर जखमेतून रक्त वहात राहिलं अन् हा पाईप ओढत राहिला. दुसऱ्या दिवशी थिओनं धावपळ करुनकरून डॉ. गॅशेला हाक मारली. व्हिन्सेंटचे उरलेसुरले मित्र गोळा झाले. त्या गोतावळ्यात तो उशीरापर्यंत होता. अखेर आपल्या जिवलग भावाच्या बाहूंत पहाटे एक वाजता त्यानं प्राण सोडला. तेव्हा त्याचं वय होतं अवघं 37 वर्षे.
 
== बाह्य दुवे ==