"एटीएम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो →‎वित्तीय महाजाल: Typo fixing, replaced: करुन → करून using AWB
ओळ २१:
=== वित्तीय महाजाल ===
 
धनपत्राचा पाया कोअर बँकिंग यंत्रणेवर उभारलेला आहे. कोअर बँकिंग यंत्रणेत ग्राहकाच्या खात्याची खातेवही आता शाखास्तरावर नव्हे, तर केंद्रीय मुख्यसंगणकावर सांभाळून ठेवलेली असते. धनयंत्रे ही त्या त्या बँकेच्या केंद्रीय महासंगणकाशी जोडलेली असतात. परिणामी, या बँकेच्या कोणत्याही शाखेत किंवा धनयंत्रावर आपल्या खात्याचा तपशील ग्राहकास उपलब्ध असतो. प्रत्येक बँकेला प्रत्येक शहरात धनयंत्र बसविणे या खंडप्राय देशात अशक्य आहे. त्यामुळे सहकार्याच्या भावनेतून व व्यावसायिक दृष्टिकोनातून बँकांनी आपापली धनयंत्रे एकमेकांस उपलब्ध करुनकरून देणे हे क्रमप्राप्त होते. पण त्याकरता प्रत्येक बँकांची नेटवर्क्स एकमेकांशी जोडली जायला हवीत. दोन वा अधिक बँकांचे जाळे जोडणारा दुवा म्हणजे स्विच. याच्या माध्यमातून एका बँकेच्या धनयंत्रामधून दुस-या बँकेतल्या आपल्या खात्यावर व्यवहार करणे शक्य होते. या व्यवहारात खातेदारास धनयंत्र वापराबद्दल कांही शुल्क मोजावे लागते. हे शुल्क स्विच आणि धनयंत्रबँक ठराविक प्रमाणात वाटून घेतात.
====स्विच====
1996 मध्ये भारतीय बँक महासंघाने पुढाकार घेत भारतात पहिला “ स्वधन ” नांवाचा स्विच उभा केला. सर्व सरकारी व कांही प्रमुख खाजगी बँका यांचा हा सहकारी व महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. याच्या पेमेंट अँड सेटलमेंटचे व्यवस्थापन बँक ऑफ इंडियाने सांभाळले होते. व्यावसायिकतेपेक्षाही सहकार्य या तत्वावर 67 शहरांतून 56 बँकांची अदमासे 1000 धनयंत्रे जोडली गेली होती. दैनंदिन 2500 व्यवहार या नेटवर्कवर होत होते. प्रति व्यवहार रु 55/- एवढे शुल्क पडत असे. धनपत्र ही प्रतिष्ठेची बाब म्हणूनच प्रदर्शित केली जाई. मौजेची गोष्ट अशी, की काढल्या रकमेची खात्यावर नोंद लगेच न होता तिस-या दिवशी होई. कारण सरकारी बँकातले तंत्रज्ञान अद्याप बाल्यावस्थेत होते, व्यवस्थापनाची इच्छाशक्ती दुर्बळ होती आणि कर्मचारी संघटनांचा एकूण पवित्रा पाहता त्याला बाळसे येणे दुर्घट दिसत होते. अशा काळात “स्वधन” उदयास आले आणि 6-7 वर्षे चाली राहिले हीच अजब गोष्ट मानावी लागेल. पुढे या स्विचच्या सेवाप्रदात्याचे संगणकप्रणाली विक्रेत्याशी घटके उडाल्याने 2003 च्या वर्षअखेरीस हा “स्वधन” स्विच बंद झाला.
"https://mr.wikipedia.org/wiki/एटीएम" पासून हुडकले