"नारायण मुरलीधर गुप्ते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
 
No edit summary
ओळ १:
'''चाफा'''
::चाफा बोलेना, चाफा चालेना,
::चाफा खंत करी काही केल्या फुलेना ॥
 
:::: गेले ’आंब्याच्या’ बनी
:::: म्हटली मॆनांसवे गाणी
:: आम्ही गळ्यांत गळे मिळ्वून.
 
:::: गेले केतकीच्या बनी
:::: गंध दर्वळला वनी
:: नागासवे गळाले देहभान.
 
:::: आले माळ सारा हिंडुन
:::: हुंबर पशूंसवे घालुन
:: कोलाहलाने गलबलले रान.
 
:::: कडा धिप्पाड वेढी
:::: घाली उड्यावर उडी
:: नदी गर्जुन करी विहरण.
 
:::: मेघ धरू धावे
:::: वीज चटकन लवे
:: गडगडाट करी दारुण.
 
:::: लागुन कळिकेच्या अंगा
:::: वायु घाली धांगडधिंगा
:: विसरुनी जगाचे जगपण.
 
:::: सृष्टि सांगे खुणा
:::: आम्हा मुखस्तंभ राणा
:: मुळी आवडेना ! रे आवडेना!!
 
:::: चल ये रे ये रे गड्या!
:::: नाचु उडू घालू फुगड्या
:: खेळू झिम्मा झिम-पोरी झिम!
 
:::: हे विश्वाचे आंगण
:::: आम्हा दिले आहे आंदण
:: उणे करू आपण दोघे जण.
 
:::: जन विषयाचे किडे
:::: यांची धाव बाह्याकडे
:: आपण करू शुद्ध रसपान.
 
:::: दिठी दीठ जाता मिळुन
:::: गात्रे गेली पांगळुन
:: अंगी रोमांच आले थरथरुन.
 
:::: चाफा फुली आला फुलून
:::: तेजी दिशा गेल्या आटुन
:: कोण मी-चाफा ? कोठे दोघे जण?
 
[[Category:मराठी कवी]]