"गजानन महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २५:
==भक्त गण==
हरी पाटील, बंकटलाल आगरवाल, पितांबर, बाळाभाऊ प्रभू, बापुना काळे, भाऊसाहेब कवर, पुंडलिक भोकरे, बायजाबाई, भास्कर पाटील हे महाराजांचे काही श्रेष्ठ भक्त होते. तेथून ते वेगाने निघून् गेल्याने, बंकटलालाचे मन गुरुमहाराजांच्या भेटीकरिता तळमळू लागल्याने महाराज त्याला पुन्हा शिवमंदिराजवळ भेटले.
* '''हरी पाटील''' - हरी पाटील हे महाराजांचे अत्यंत जिव्हाळ्याचे आणि अंतरंगातील भक्त होते असे म्हणणेच सार्थ ठरेल; कारण महाराजांची गूढ भाषा केवळ त्यांनाच समजत असे. हरी पाटलांची भक्ति रांगडी भक्ति होती, परिपूर्ण शुद्धता, पूर्ण समर्पण आणि अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रेमाने गाढ अशी ती भक्ति होती, तिथे दांभिकता आणि खोटेपणा ह्या गोष्टींना किंचितही थारा नव्हता. परंतु ह्या सर्व गोष्टी काही एका क्षणात घडल्या नाहीत. महाराज शेगावात प्रकट झाल्यावेळी सर्वच पाटील बंधु अत्यंत मग्रूर आणि शक्तिने बेधुंद झालेले होते, सर्व प्रकारचे वैभव, धन संपत्ती, गिरण्या पेढ्या दुकाने असल्याकारणाने ते कोणालाही हवे ते बोलत आणि लोकही त्यांच्याशी शक्तित तुल्यबळ नसल्याने सर्व गोष्टी शांतपणे सहन करीत. महाराजांचीही ते सर्वजण पुष्कळ चेष्टा मस्करी व निंदानालस्ती करीत, परंतु महाराज अत्यंत कृपाळु असल्याने ह्या गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत. एकदा हरी पाटलांनी जेव्हा महाराजांना तालमीत येऊन स्वतःसोबत कुस्ती खेळण्याचे आवाहन केले त्यावेळी महाराज तालमीत जाऊन बसले आणि त्यांनी हरी पाटलाला त्यांना उठविण्यास सांगितले. नानाप्रकारचे पेच आणि सर्व शक्ति वापरुनही जेव्हा हरी महाराजांना उठवू शकला नाही त्यावेळी त्याचा अहंकार नष्ट झाला आणि त्यादिवसापासून तो महाराजांना पूर्णपणे शरण गेला. जेव्हा महाराजांनी स्वतःच्या समाधिची जागा स्वतःच ठरविली त्यावेळी ते सर्व भक्तांना सोडून त्या जागी (ज्या जागेला त्यावेळी गाढवभुंकी असे म्हणत कारण त्या जागेवर कुंभारांची सर्व गाढवे चरण्यास जात असत) अचानक जाऊन बसले. भक्तांना काय करावे हे सुचेना व महाराज तर ती जागा सोडून येईनात. शेवटी त्यांनी हरी पाटलांना बोलावले. हरी पाटील जवळ जाऊन प्रेमळपणे महाराजांना म्हणाले, "महाराज, ही जागा अशुद्ध आहे, आपण मठात चलावे." त्यावर सदगुरु म्हणाले, "येथे राहील रे!" त्यावर हरी पाटलांना समजले की महाराजांनी स्वतःच्या समाधिकरीता ती जागा निवडली होती. महाराज समाधि घेण्यापूर्वी हरी पाटलांना घेऊन पंढरपुरास गेले असता, त्यांनी स्वत: त्यास स्वतःच्या समाधिदिनाबद्दल त्यास माहिती दिली.
* '''श्रीधर गोविंद काळे''' - श्रीधर गोविंद काळेला हे इंग्लिश शाळेत शिक्षण घ्यायला गेले पण मॅट्रिक नंतर इंटर नापास झाल्याने वर्तमानपत्रे वाचीत वेळ घालवित असताना त्यांनी टोगो आणि यामा ह्या जपानी व्यक्तिंच्या जीवनचरित्राविषयी वाचले आणि आपणही मायदेश सोडून विलायतेला जाऊन नाव आणि पैसा कमवावा असे त्यांना वाटू लागले. परंतु पैशाची व्यवस्था होईना त्यामुळे ते निराश झाले आणि कोल्हापूरला जाताना वाटेवर शेगावला थांबून ते महाराजांना भेटायला गेले असताना सर्वज्ञ असलेल्या महाराजांनी त्यांचे मनोगत जाणले आणि परदेशी जाण्यापासून त्यांना परावृत्त केले. सरतेशेवटी महाराज त्याला म्हणाले, "कोठे न आता जाईयेई|." त्यानंतर महाराजांच्या कृपेने त्याची उत्तम भौतिक प्रगति झाली. त्याचवेळी महाराजांनी त्यांना बहूमोल उपदेश दिला की अतिशय पुण्य केल्याखेरीज भारतात जन्म होत नाही आणि योगापेक्षा अध्यात्मविचार श्रेष्ठ आहे. महाराजांच्या आशिर्वादाने ते बी.ए.एम्.ए. झाले आणि त्यांना शिंद्यांच्या राज्यातील शिवपुरी कॉलेजमध्ये प्रिन्सिपालच्या जागी नेमले.
* '''त्र्यंबक उर्फ भाऊ कवर''' - त्र्यंबकला घरी भाऊ असे प्रेमाने म्हणत असत, परंतु ही गोष्ट फक्त जवळच्या माणसांव्यतिरिक्त अन्य कोणालाही माहिती नव्ह्ती. जेव्हा महाराजांची कीर्ति सर्वदूर पसरली, कवरला त्यांना भेटण्याची तीव्र तळमळ लागली. त्याप्रमाणे त्याने तीनवेळा शेगावला भेटी दिल्या परंतु तिन्ही भेटींमध्ये सदगुरुमहाराजांनी त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले; कवर मनोमनी दु:खी झाला. अखेरची एक भेट घ्यावी म्हणून कवर शेगावला गेला आणि भक्तांच्या गर्दीत जाऊन बसला. थोड्या वेळात महाराज सरळ त्याच्याकडेच आले आणि म्हणाले, "काय भाऊ, एकटाच चिकण सुपारी खातोस होय? तुझ्या खिशातली सुपारी दे बरं मला थोडी!" कवराला आश्चर्याचा धक्काच बसला. ह्यांना माझे नाव कसे कळले, ह्यांना कसे कळले की माझ्या खिशात चिकण सुपारी आहे? ह्या घटनेतूनच भाऊ कवराला महाराजांच्या दिव्यत्वाची प्रचिती आली आणि त्याची महाराजांवर असीम श्रध्दा जडली. त्याक्षणापासून् भाऊ कवर त्यांच्या श्रेष्ठ भक्तांपैकी एक झाला. तो त्यावेळी [[हैदराबाद|हैदराबादमध्ये]] डॉक्टरी शिकत होता. सुटीमध्ये घरी आला असता त्याला वाटले की महाराजांचे आवडीचे पदार्थ करुन घेऊन त्यांना जेवण नेऊन द्यावे. त्याप्रमाणे त्याने भाकरी, आंबाड्याची भाजी, हिरव्या मिरच्या, कांदे, लोणी असे पदार्थ बरोबर घेतले; पण तो स्टेशनवर येण्याअगोदर गाडी निघून गेली. कवराला अतोनात दु:ख झाले, गुरुमहाराज जेऊन घेतील आणि आपण आणलेली शिदोरी वाया जाईल या विचाराने तो व्यथित होऊन स्टेशनवर तसाच बसून राहिला. परंतु भक्तवत्सल महाराज त्या दिवशी आलेले सर्व नैवेद्य बाजूला सारून तसेच उपाशी बसले होते. शेवटी जेव्हा कवर चार वाजता शेगावच्या मठात आला, तेव्हा महाराज म्हणाले, "तुझ्या भाकेत गुंतलो | मी उपाशी राहिलो | आण तुझी शिदोरी||." त्यावेळी कवराला काय वाटले असेल ह्याची कल्पना एक् भक्तच करु शकेल. इतर भक्त म्हणाले, "भाकरीवर गुंतले चित्त कवराच्या स्वामींचे."