"लोकसंख्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४३,०६४ बाइट्स वगळले ,  १० वर्षांपूर्वी
छो
अविश्वकोशीय व मुंबईकेंद्रित मजकूर हटवला : 120.61.1.169 (चर्चा)या
छो (अविश्वकोशीय व मुंबईकेंद्रित मजकूर हटवला : 120.61.1.169 (चर्चा)या)
लोकसंख्या म्हणजे एखाद्या भौगोलिक प्रदेशात राहणार्‍या व्यक्तिंची संख्या.
 
लोकसंख्या मोजायचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक [[देश]] आपल्या लोकसंख्येची ठराविक कालखंडानंतर गणना करतो. सहसा हा कालखंड १० वर्षे असतो व दर वर्षी वाढीव संख्येचा अंदाज प्रकाशित केला जातो.
 
[[वर्ग:भौगोलिक माहिती]]
लोकसंख्येच्यादृष्टीने भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. लोकसंख्या ही देशाची संपत्ती मानली तरीही त्याचा पायाभूत सुविधांवर येणारा ताण आणि दुष्परिणामही नाकारता येणार नाही. लोकसंख्या वाढीलाही अनेक बाजू आणि कारणे आहेत. जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने लोकसंख्या वाढीच्या सर्वांगांचा घेतलेला हा आढावा...
 
लोकसंख्येची स्थिती
 
१९२१ साली मंुबईची लोकसंख्या १४ लाख होती. अशा वेळी रघुनाथ धोंडो कवेर् यांनी देशातील पहिले कुटुंबनियोजन चिकित्सालय सुरू केले. मातेचे आरोग्य जपायचे असेल तर कुटुंबनियोजनाचा प्रसार होणे गरजेचे आहे हे त्यांना जाणवले होते. त्यावेळच्या समाजाने त्यांच्या या उपक्रमाकडे तुच्छतेने बघितले. परंतु समाजाच्या विरोधाची तमा न बाळगता तेव्हाच्या बॉम्बे म्युनिसिपल कॉपोर्रेशनने दोन कुटुंबनियोजन दवाखाने उघडले. जननक्षम आरोग्य सुधारावे आणि लोकसंख्या वाढीला आळा बसावा. या घटनेचा विरोधाभास असा की, ज्या मंुबईने जननदर कमी असण्याचा फायदा घेतला होता, तीच मंुबई आज वाढत्या लोकसंख्येखाली दबली जात आहे. शहराच्या वाढीला मर्यादा असूनही २०३१ सालापर्यंत ती १.५ ते २.१ कोटीपर्यंत जाईल.
 
लोकसंख्या वाढीची कारणे
 
कोणत्याही भागाची लोकसंख्या वाढण्याची तीन कारणे असतात. यापैकी एक असते नैसगिर्क वाढीचे. जन्म आणि मृत्यूच्या दरातील समतोल किती आहे यावर ही वाढ अवलंबून असते. दशभरातून येणारे स्थलांतरीत हे दुसरे तर तिसरे कारण म्हणजे येथील लोकसंख्येसह शेजारील नवीन शहरास जोडणे. यापैकी तिसऱ्या कारणाचा विचार मंुबईसाठी करता येणार नाही. असा कोणताही नवा भाग मंुबईला जोडता येणे शक्य नाही. मंुबईच्या सीमेला लागून असलेल्या भागाला शहरी रूप प्राप्त झाले आणि नंतर हा सर्व भाग मंुबईच्या अर्थव्यवस्थेवर अवलंबून असलेला शहरी भाग बनला. लोकसंख्या वाढीच प्रमाण हे मुले जन्माला येण्याच्या प्रमाणावर ठरते. मंुबईचा सरासरी जननदर आजच्या घटकेला अंदाजे २ किंवा त्याहून कमी आहे. हा दर एकंदर जननदर २.१ पेक्षा कमी आहे. यातून एक बाब स्पष्ट होते ती म्हणजे मंुबईच्या लोकसंख्या वाढीत स्थलांतराचा मोठा वाटा आहे. जर गेल्या काही दशकांत जननदर कमी झाला नसता तर लोकसंख्या वाढीचे प्रमाण घातक ठरले असते.
 
बलस्थान आणि दुर्बलता
 
मंुबईची लोकसंख्या ही जशी मंुबईचे शक्तिस्थान आहेत. तशीच मंुबईची आजची अवस्था होण्यास कारणीभूतही आहे. १९५० आणि १९५७ साली मंुबईची सीमा उत्तरेच्या दिशेने वाढविण्यात आली. लोकसंख्या या निकषावर २००१ साली मंुबई देशात पहिल्या आणि जगात पाचव्या क्रमांकावर होती. दर चौरस किलोमीटर २७ हजार लोक ही सरासरी घनता होती. जन्म आणि मृत्यूच्या नोंदीवरून सतत घसरत चाललेले प्रमाण दिसून येते. १९९६ साली जन्मप्रमाण दर हजारी १९.२४ होते, ते १० वर्षांनंतर म्हणजे २००६ साली १३.७६ दर हजारी इतके घसरले. याच दशकात मृत्यूचे प्रमाण दर हजारी ७.३ वरून ६.८९ पर्यंत खाली आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणजे लोकसंख्या वाढीला लगाम घातला गेला.
 
नागरी विस्तार
 
१९०१ ते २००१ या काळात लोकसंख्या ९.२ लाखावरून १.१९ कोटीपर्यंत म्हणजे १३ पटींनी वाढली. पहिल्या ४० वर्षात वाढ दुप्पट होती. १९५१ पर्यंत ती तिप्पट झाली आणि नंतरच्या ३० वर्षांत म्हणजे १९८१ मध्ये पुन्हा तिप्पट होती. १९२१ ते ३१ या दशकात लोकसंख्या वाढीचा वेग अवघा ०.१ टक्के होता. कारण या काळात जीवघेण्या साथीचे रोग पसरले होते. १९४१ ते ५१ या दशकात वाढ सर्वाधिक म्हणजे ४.९८ टक्के होती. याचे कारण फाळणीमुळे पाकिस्तानातून आलेले लोकांचे लोंढे. १९११ साली लोकसंख्या १० लाख आणि १९९१ च्या जनगणनेनंतर हा आकडा एक कोटीवर गेला. १९७१-८१ ते १९९१-२००१ या काळात लोकसंख्येची एकत्रित वाढ ३.२८ वरून १.८४ टक्क्यांपर्यंत घसरली.
 
भविष्यकाळ
 
लोकसंख्यावाढीची ही अवस्था बघता भविष्यात म्हणजे २०३१ साली मंुबईची लोकसंख्या किती असेल...
 
१९९१ ते २००१ या काळात लोकसंख्येत जितकी भर पडली त्यापेक्षा जास्त म्हणजे दरवषीर् तीन लाखाची भर पडली, तर लोकसंख्या २.१ कोटीच्या आसापास असेल. हे सर्वाधिक लोकसंख्या वाढ गृहीत आह.
 
सध्याच्या लोकसंख्येत दरवषीर् दोन लाखाची भर पडली तर २०११ साली १.४ कोटी, २०१६ साली १.५ कोटी, २०२१ साली १.६ कोटी आणि २०३१ साली १.८ कोटी लोकसंख्या असेल. १९९१ ते २००१ या दशकात वाढलेल्या लोकसंख्येयच बरोबरीची ही आकडेवारी असेल दरवषीर् फक्त एक लाख लोकसंख्या वाढली तर २०३१ साली १.५ कोटी लोकसंख्या होईल. यापैकी २०३१ साली लोकसंख्या दुप्पट म्हणजे २.१ कोटी होईल हा अंदाज खरा ठरला तर मागोमाग सर्व संलग्न समस्या येतील. जागेची समस्या तर आणखी तीव्र होईल.
 
झोपडीत राहणारे व इतर
 
झोपडीत राहणाऱ्यांची टक्केवारी ५४.१ आहे तर झोपडीत न राहणाऱ्यांचे प्रमाण ४५.९ टक्के आहे. सर्वाधिक ८५.८ टक्के लोकसंख्या एस वॉर्डात आहे, तर सर्वात कमी प्रमाण डी वॉर्डात ९.९ टक्के आहे. झोपड्यांमध्ये ६४ लाख ७५ हजार ४४० लोक राहतात. तर बिगर झोपडपट्टीत राहणाऱ्यांची लोकसंख्या ५५ लाख ३ हजार १० आहे.
 
 
जास्त घनतेचे म्हणजे प्रति चौरस कि.मी.च्या परिघात एकवटलेल्या लोकसंख्येचे विभाग
 
भुलेश्वर नळबाजार : १,१४,०००
 
दादर ते माहीम : ६५ ८१२
 
भायखळा-माझगाव : ५९५०४
 
कुर्ला-साकिनाका : ५७,८१७
 
राज भवन-ऑपेरा हाऊस: ५७,७४३
 
मालाड-मढ-मनोरी : ४२,१९४
 
गोराई-बोरिवली : १०,२६१
 
मुलुंड-नाहुर : ७२७१
 
 
सर्वाधिक लोकसंख्या
 
असलेले चार वॉर्ड :
 
वॉर्डलोकसंख्या
 
के-पूर्व८१०००२
 
एल७७८२१८
 
पी-उत्तर७९८७७५
 
के-पश्चिम७००६८०
 
कमी लोकसंख्येचे चार वॉर्ड
 
बी१४०६३३
 
सी२०२९२२
 
ए२१०८४७
 
एच-पश्चिम३३७३९१
 
 
मुंबई व इतर शहरांची लोकसंख्येची घनता
 
मंुबई : २९,४३४कोलकाता : २४,०००
 
दिल्ली : ९०००न्यू यॉर्क : १०२९२
 
लंडन : ४६९९शांघाय : २७००
 
 
 
लोकसंख्या वाढ | दुखःचे कारण |
होईल तारण | सांगा कैसे ||
 
कोणा नाही जागा | कोणा नाही अन्न |
दशा त्या विभिन्न | काय वाणू ||
 
मोठ्या आशेपायी | उपजीली बाळे |
भिकेचे डोहाळे | लागले आता ||
 
भुकेपोटी आता | झाले कुपोषण |
पालण पोषण | जमेना तया ||
 
कोण मारु पाही | कन्या रत्न पोटी |
हत्या झाली मोठी | तया कारणे ||
 
केला आटापिटा | पुत्र जन्मासाठी |
आता जन्मगाठी | मारतील कुठे ||
 
काही लोका नसे | काही अर्थार्जन |
झाले ते दुर्जन | पोटासाठी ||
 
चोहीकडे चालू | चोरी आणि लूट |
सोसती निमूट | दीन बापूडी ||
 
नाही पुरी विज | नाही पुरे पाणी |
झाली आणीबाणी | आयुष्याची ||
 
रस्त्यामधे पहा | झाली किती दाटी |
होते रेटारेटी | पावलोपावली ||
 
लोकसंखेमधे | झालो महासत्ता |
प्रगतीचा पत्ता | नाही कुठे ||
 
लोकसंख्या वाढ | धरणीला भार |
जाहला निस्सार | पंचमहाभुतांचा ||
 
 
 
"सायबर सिटी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईचा लोकसंख्यावाढीचा दर झपाट्याने वाढत आहे. येत्या 20 वर्षांत नवी मुंबईची लोकसंख्या 50 लाखांचा आकडा गाठण्याची शक्‍यता आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करून मुंबईपाठोपाठ नवी मुंबईला पर्याय म्हणून आता "तिसरी मुंबई' वसविण्याच्या हालचाली सुरू होण्याची शक्‍यता आहे. अपेक्षेपेक्षा दीड पटीने नवी मुंबईच्या लोकसंख्येत भर पडणार असून, त्याच तुलनेत रोजगारनिर्मिती 17 लाखांच्या घरात जाणार आहे, असा अंदाज वर्तविला जात आहे. नवी मुंबईतील लोकसंख्या दर वर्षी साडेबारा टक्‍क्‍यांनी वाढण्याची चिन्हे आहेत.
 
1951 ते 1961 या 10 वर्षांत मुंबईच्या लोकसंख्यावाढीचा दर तब्बल 40 टक्‍क्‍यांवर गेला होता. ही वाढ कायम राहिल्यास अनेक समस्या निर्माण होण्याची चिन्हे दिसत होती. त्यामुळे मुंबई महानगरीला पर्याय म्हणून सरकारने ठाणे व मुंबईला लागूनच नवी मुंबईच्या निर्मितीचा विचार केला. लोकसंख्यावाढीचा दर लक्षात घेऊन सुमारे 21 लाख लोकसंख्येचा विचार करून नवी मुंबई वसविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी 1971 मध्ये "सिडको'ची स्थापना करण्यात आली. ठाणे, पनवेल व उरण या तालुक्‍यांतील तब्बल 95 गावांतील सिडकोच्या प्रकल्पासाठी सुमारे 17 हजार हेक्‍टर जमीन संपादित करण्यात आली. जुळी मुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईत सिडकोने 14 नोड विकसित केले. नवी मुंबईत अल्प उत्पन्न गटापासून उच्चभ्रूंपर्यंत सर्वांसाठी सिडकोने नवी मुंबईत घरे बांधली. पहिल्या टप्प्यात ऐरोली ते सीबीडीपर्यंतचा भाग विकसित केला; तर दुसऱ्या टप्प्यात खारघर ते उरण पट्ट्यात विकास केला जात आहे. 40 वर्षांत या परिसराचा विकास झाला आहे. ऐरोली ते सीबीडीदरम्यान नव्या इमारती उभारण्यासाठी मोठी जागा आता शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे खारघरपासून पनवेल व उरणपर्यंत नव्या बांधकामांना सुरुवात झाली आहे. सिडकोकडे उरलेल्या मोकळ्या जमिनी विविध प्रकल्पांसाठी राखीव आहेत. उर्वरित जमिनी बांधकाम व्यावसायिक व गुंतवणूकदारांनी आधीच घेऊन ठेवल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात नवी मुंबईतील बांधकामांना "फूल स्टॉप' लागण्याची चिन्हे आहेत. तळोजामधील नियोजित गृहप्रकल्प वगळता सिडकोचाही एखादाच गृहप्रकल्प येण्याची शक्‍यता आहे.
 
सुनियोजित शहर म्हणून नावारूपास आलेल्या नवी मुंबई, पनवेल, उरण या परिसरातील लोकसंख्येने तब्बल 25 लाखांचा आकडा गाठला आहे. सिडकोने हे शहर 21 लाख लोकसंख्या डोळ्यांसमोर ठेवून वसविले आहे. नवी मुंबईतील लोकसंख्या वाढीचा दर 10 वर्षांत दुप्पट झाला आहे.
 
2004 पर्यंत 20 लाख लोकसंख्या वसविण्याचे, तसेच आठ लाख जणांसाठी रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट सिडकोने ठेवले होते. 2010 पर्यंत अपेक्षेपेक्षा अधिक गतीने नवी मुंबईची लोकसंख्या वाढली आहे. त्यातच नवी मुंबई सेझ, प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो रेल्वे प्रकल्प, आशिया खंडातील सर्वांत मोठे जंक्‍शन म्हणून उदयास येणारे पनवेल रेल्वेस्थानक आणि सुखसोईंनी अद्ययावत असलेल्या या शहरात वास्तव्यासाठी येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. येत्या 20 वर्षांत नवी मुंबईची लोकसंख्या 50 लाखांचा आकडा गाठण्याची; तर रोजगारनिर्मितीचा आकडा 16 लाख 80 हजारांवर पोचण्याची शक्‍यता "सिडको'च्या सूत्रांनी वर्तविली आहे. येत्या 20 वर्षांतील लोकसंख्यावाढीचा विचार करता, नवी मुंबईतील लोकसंख्या वर्षाला साडेबारा टक्‍क्‍यांनी वाढण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्‍त केला आहे. नवी मुंबईच्या लोकसंख्येच्या क्षमतेपेक्षा दीड पट लोकसंख्या येथे होणार असल्याने त्याचा ताण शहरावर पडणार आहे. मूलभूत सुविधा, दळणवळणाची साधने, रोजगारनिर्मिती यावर परिणाम होणार आहे. त्यामुळे भविष्यात पनवेल ते खोपोली आणि पेणदरम्यानचा परिसर विकसित करण्याची गरज निर्माण होणार आहे. लोकसंख्यावाढीचा विचार करून "तिसरी मुंबई' पनवेलनजीक वसविण्याच्या हालचालींना वेग येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
 
दर वर्षी 20 हजार घरांची गरज
नवी मुंबईतील लोकसंख्यावाढीचा विचार करता, "तिसरी मुंबई' वसविण्याशिवाय अन्य पर्याय नाही, असे मत प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुरेश हावरे यांनी "सकाळ'कडे व्यक्त केले. अत्याधुनिक सुखसोई असलेल्या नवी मुंबईत दर वर्षी 20 हजार घरे निर्माण व्हायला हवीत; परंतु सध्या केवळ दोन हजार घरे तयार होत आहेत. मागणी अधिक आणि पुरवठा कमी होत आहे; त्याला कारण म्हणजे जमिनीची कमतरता आहे, असेही ते म्हणाले. त्यामुळे भविष्यात तिसरी मुंबई वसविण्याची गरज आहे. त्यासाठी आतापासूनच हालचाली सुरू करण्याची आवश्‍यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
 
किती वाढते आहे ही लोकसंख्या - कुठे गेल्या त्या महामार्‍या ?
प्रस्तावना
वाढत्या लोकसंख्येचा प्रश्न वारंवार आपल्यासमोर येत असतो. मित्रपरिवारामधील चर्चेत, वर्तमानपत्रांत, भिंतीभिंतीवरच्या कुटुंबनियोजनाच्या जाहिरातींत, कितीतरी ठिकाणी... लोकसंख्या वाढत आहे, त्याबद्दल आपल्याला काळजी वाटते - कधीपर्यंत ही वाढत जाणार? वाटते, बेसुमार वाढत जाणे हाच लोकसंख्येचा गुणधर्म आहे काय? या बाबतीत आपल्या देशातल्या समाजातच काही विशेष दोष आहे का? असे प्रश्न पडता वेगवेगळ्या समाजातील लोकसंख्येच्या कालक्रमाचे निरीक्षण करणे मार्गदर्शक ठरते. विचारांना चौकट मिळाली की भूतकाळातील लोकसंख्यावाढीचे वर्णन करणे सोयीचे जाते, आणि भविष्यातील नियोजनासाठी काही आधार मिळू शकतो.
 
लोकसंख्येच्या संक्रमणाचा सिद्धांत
याबद्दल विचारांची एक उपयोगी चौकट वॉरन थॉमसन या लोकसंख्यातज्ञाने १९२९ साली आखली. औद्योगिकीकरणापूर्वीचा समाज जसाजसा औद्योगिक होतो, तसातसा वेगवेगळ्या टप्प्यांमधून जातो असे त्याने प्रतिपादन केले. समाजातील जन्म आणि मृत्युदराच्या वजाबाकीला अनुसरून त्याने टप्प्यांची व्याख्या केली. पुढे अन्य तज्ञांनी त्यात केलेल्या बदलांसह ते टप्पे पुढील तक्त्यात दिलेले आहेत.
 
तक्ता १
टप्पा जन्मदर मृत्युदर (जन्मदर - मृत्युदर)वजाबाकी एकूण लोकसंख्या
१ मोठी संख्या मोठी संख्या (मोठी - मोठी संख्या)=बदल नाही लहान आणि स्थिर
२ मोठी संख्या घटती संख्या (मोठी - घटती संख्या)=वाढ लहान आणि वाढती
३ घटती संख्या लहान संख्या (घटती - लहान संख्या)=वाढ मोठी आणि वाढती
४ लहान संख्या लहान संख्या ( लहान - लहान संख्या)=बदल नाही मोठी आणि स्थिर
५ घटती संख्या स्थिर संख्या ( घटती - स्थिर संख्या)=घट मोठी आणि घटती
 
या "लोकसंख्येच्या संक्रमणाच्या सिद्धांता प्रमाणे सांगितलेले वेगवेगळे टप्पे आकृती १ मध्ये चित्ररूपात दाखवले आहेत.
 
पण का? जनस्वास्थ्य-संक्रमण (epidemiologic transition)
लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत आकडेवारीचे ठीकठाक वर्णन करतो खरे. पण "औद्योगिकीकरण" या आर्थिक संकल्पनेची जन्म-मृत्यू या जैविक घटनांशी सांगड नेमकी कशी पडत असावी? जनस्वास्थ्यमिती (epidemiology) च्या शास्त्रातून याबद्दल आपल्याला काहीतरी उमजू शकते. लोकसंख्या-संक्रमणाच्या आकड्यांना समांतर जनस्वास्थ्य-संक्रमणही (epidemiologic transition) होत असते.
 
पहिला टप्पा
उद्योगपूर्व देशांमध्ये मृत्यूचा दर मोठा असतो इतकेच नव्हे तर बहुतेक मृत्यूंचे कारण साथीचे आणि संसर्गजन्य रोग (epidemics of infectious diseases) असतात. हे मृत्यू मोठ्या प्रमाणात अर्भकांचे आणि बालकांचे असतात. संतती मोठ्या प्रमाणात जन्माला घातली तरी जोडप्याची एक-दोन मुलेच प्रौढ होईस्तोवर जगतात. या काळात मध्यम आणि वृद्ध वयात होणारे जुनाट रोग (chronic diseases of old age) कमी प्रमाणात दिसतात, कारण त्या वयापर्यंत पोचणारे लोक थोडेच असतात. प्लेग किंवा कोलेराने लोक आधीच जवळजवळ संपवल्यावर, मधुमेहाने आणि कर्करोगाने ग्रसण्यासाठी उरले-सुरले थोडेच लोक असतात.
 
दुसरा टप्पा
आर्थिक प्रगती जशी होते, तशी मुले जगण्याचे प्रमाण वाढते, मृत्यूचा दर कमी होतो. तरी पिढीजात अनुभवाच्या शहाणपणामुळे जोडपी मोठ्या प्रमाणात संतती उत्पन्न करतच राहातात, जन्मांचा दर पूर्वीसारखाच राहातो.
 
तिसरा टप्पा
पुढे संसर्गजन्य रोगांमुळे बालकांच्या मृत्यूचा दर खूप कमी होतो, एक-दोन पिढ्यांना याची खात्री पटू लागते, आणि आर्थिक प्रगती झालेली काही जोडपी संततिनियमन करू लागतात. यामुळे जन्मांचा दरही कमी होऊ लागतो. मध्यवयापर्यंत आणि वार्धक्यापर्यंत खूप लोक जगू लागतात, तसे त्या वयात होणारे रोग अधिक दिसू लागतात. बहुतेक मृत्यू संसर्गजन्य आणि साथीच्या रोगांमुळे न होता, आता बहुतेक मृत्यू जुनाट अ-संसर्गजन्य रोगांमुळे झालेले दिसतात. या कालक्रमाला "जनस्वास्थ्य-संक्रमण" म्हणतात.
 
चवथा टप्पा
जुनाट रोगांनी आणि वृद्धापकाळाने मरण अटळ आहे, त्यापेक्षा मृत्युदर कमी होऊ शकत नाही. जन्मदर कमी-कमी होत-होत मृत्युदराइतका झाला की लोकसंख्या स्थिर होते.
 
पाचवा टप्पा
पुढे-पुढे काही देशांत असे दिसले आहे, की अनेक जोडपी एकच मूल जन्माला घालतात किंवा एकही मूल जन्माला घालत नाहीत. ही मुले प्रौढ होईपर्यंत जगतात खरी, आणि मत्यूच्या लहान दरात बहुतेक वृद्ध लोकच असतात खरे. पण ही अति-सीमित संतती त्या थोडक्या मृत्यूच्या दराची तूटही भरून काढत नाही. अशा परिस्थितीत देशाची मोठी लोकसंख्या अक्षरशः घटू लागते.
 
विशिष्ट समाजातील अनुभवांची सिद्धांतापासून फारकत
महत्त्वाच्या घटनांमुळे होणारे अल्पकालिक विचलन आणि आप्रवासन (migration)
लोकसंख्येच्या आणि जनस्वास्थ्याच्या संक्रमणांची ही चौकट इतिहासवर्णनासाठी आणि भविष्यनियोजनासाठी उपयुक्त असली, तरी हा कुठला भौतिकीतला किंवा गणितातला अगतिक कायदा नव्हे, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. एखाद्या लहान देशामध्ये कायमस्वरूपी स्थायिक होणाऱ्या लोकांमुळे, किंवा कायमस्वरूपी निघून जाणाऱ्या लोकांमुळे (immigration and emigration मुळे) लोकसंख्या वाढू-घटू शकते, ते या सिद्धांताच्या हिशोबात नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर परतलेल्या सैनिकांनी घरी परतल्यावर १९४५-१९५५ काळात मोठ्या प्रमाणात संतती प्रसवली, अशा मोठ्या घटनांमुळे सिद्धांताने सांगितलेला कालक्रम विचलित होतो - हे वर स्वीडनच्या आकडेवारीत (आकृती २आ) स्पष्टच दिसते. अशा प्रकारे सिद्धांताने सांगितलेली लोकसंख्येची दीर्घकालिक प्रवृत्ती आहे, अनुवार्षिक बदल नव्हेत.
 
लोकशिक्षणाचा प्रभाव
त्याच प्रकारे मृत्यूचा दर कमी होऊ लागल्यानंतर जन्माचा दर कमी होण्यापूर्वी किती पिढ्यांचा अनुभव स्माजाला लागतो? याबद्दल कुठलाच गणिती कायदा नाही. युरोपातील देशांमध्ये संततिनियमनाबाबत सरकारी लोकशिक्षण मोठ्या प्रमाणात झाले नाही, आणि जन्मदर घटायला (म्हणजे बहुतेक जोडप्यांनी आपोआप तसे ठरवायला) दीड-दोनशे वर्षे लागली असतील. भारतासारखा एखादा देश "एक किंवा दोन मुले पुरे" असे लोकशिक्षण करतो. तेव्हा "तुमची मुले बहुधा मरणार नाहीत" ही माहिती गर्भित रूपाने लोकांच्या मनात लवकर पोचत असते. अशा परिस्थितीत जन्मदर ५०-१०० वर्षांतही कमी होऊ शकतो.
 
रोगांच्या प्रमाणात सिद्धांतापासून फारकत
लोकशिक्षणाने जन्मदर कमी केलेल्या भारतात जनस्वास्थ्याचे संक्रमणही थोडे वेगळे दिसते. युरोपातील काही देशांत आधी संसर्गजन्य रोगांनी होणारे मृत्यू खूप घटले, मग जुनाट असंसर्गजन्य मृत्यूंची संख्या वाढू लागली. भारतात मात्र अजून संसर्गजन्य रोगही मध्यम प्रमाणात दिसतात, तेव्हाच असंसर्गजन्य रोगांचे प्रमाण वाढलेले दिसू लागले आहे.
 
मुला-मुलींच्या प्रमाणात काही समाजांमध्ये फरक
काही देशांमधील समाजमानसाला मुले हवी असतात, आणि मुली नको असतात. अशा वेळेला स्त्रीभ्रूणहत्येचे असंतुलित "संततिनियमन" होते, त्याचा हिशोबसुद्धा या संक्रमण-सिद्धांतात केलेला नाही.
 
या चौकटीने विचारांत काय फरक पडतो?
वेगवेगळ्या देशांतील समाजांच्या अनुभवात थोडेबहुत फरक असले, तरी लोकसंख्या आणि जनस्वास्थ्य-संक्रमणाची ढोबळ चौकटीमुळे ते फरक समजणेसुद्धा सुकर होते. आपल्याला सुरुवातीला पडणारी काही कोडी तितकी कूट राहात नाहीत. उदाहरणार्थ आपल्यापैकी काही लोकांना प्रश्न पडतो, "संततिनियमनाचा सर्वाधिक फायदा गरिबीने गांजलेल्या लोकांना होईल, तरी त्यांच्यामध्येच जास्त संतती दिसते. यात गरीब लोकांचा नाठाळपणा दिसतो का?" सिद्धाताच्या आधाराने विचार करता आपल्याला काय दिसते? की उलट अधिक संतती उत्पन्न करणे म्हणजे पूर्वीच्या काळच्या समाजाच्या अनुभवाचा शहाणपणा होता. कालबाह्य झाल्यानंतरही तो चालत राहातो. आपल्या आजा-पणजांच्या काळात सुशिक्षित, सुखवस्तू कुटुंबांतही उदंड लेकरे दिसत. शहाणे सुशिक्षित लोक आपोआपच संतती कमी करणे सुज्ञ समजतील असा पूर्वग्रह तथ्याशी विसंगत आहे. आर्थिक सुस्थितीनंतर एक-दोन पिढ्या मुले जगू लागल्यानंतरच संततिनियमन इतके "स्पष्ट शहाणपण" वाटू लागते. सिद्धांताच्या मदतीने विचार केला, तर मागास समाजांच्या "नाठाळ" संततीविषयी हल्ली संततिनियमन करणारे सुशिक्षित लोक त्रागा करणार नाहीत. उलट वस्तुस्थिती समजून लोकशिक्षणाचे कार्यक्षम मार्ग शोधतील.
 
इतिवाक्ये
पूर्वीच्या काळी प्लेग-कॉलेरासारख्या महामाऱ्या लोकसंख्या सीमित ठेवत होत्या. महामार्‍या नाहिशा झाल्या तशा लोक म्हातारे होऊ लागले, वृद्धापकाळाचे जुनाट रोग आणि लोकसंख्या वाढ या समस्या आपल्या वाट्याला आल्या. पण त्या महामार्‍यांपेक्षा या नव्या समस्या परवडल्या असेच म्हणावे लागेल. जुन्या काळच्या सीमित पण अल्पजीवी लोकसंख्येबद्दल अपरिपक्व हळहळ आपण बाळगू नये. मोठ्या लोकसंख्येच्या या नव्या समस्यांशी भविष्याकडे तोंड करून लढण्यात आपल्या समाजाची परिपक्वता दिसेल.
२३,४४८

संपादने