"गजानन महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
59.99.152.161 (चर्चा)यांची आवृत्ती 599484 परतवली.
ओळ ३२:
* '''धार कल्याणचे रंगनाथ महाराज''' - धार कल्याणचे रंगनाथ महाराज त्यांना भेटायला आले, परंतु त्यांचे सांकेतिक भाषण समजण्यास कोणीच समर्थ नव्ह्ता. या संदर्भात दासगणूंनी लिहिले आहे, "धार कल्याणचा साधू रंगनाथ|आला शेगावासी भेटावया|उभयतांमाजी ब्रह्मचर्चा झाली|ती ज्यांनी ऐकली तेच धन्य||." "श्रीवासूदेवानंद सरस्वती | जे प्रत्यक्ष दत्तमूर्ति | ऐशा जगमान्य विभूति | आल्या आपल्या दर्शना ||,"<ref name=dasganu /> असे दासगणूंनी सार्थच म्हंटले आहे. "तुम्हा दोघांचा मार्ग वेगळा असूनही तुम्ही दोघे भाऊ कसे?" ह्या बाळाभाऊच्या प्रश्नाला उत्तर देतानाच महाराजांनी 'ज्ञानाच्या गावी' जाण्याचे तीन मार्ग कोणते, त्या त्या मार्गांचे पालन कसे केले जाते आणि त्या मार्गाने जाऊन संतत्व प्राप्त केलेल्या आजवरच्या थोर विभूतिंची नावे इत्यादि गोष्टींवर सुंदर आणि रसाळ विवेचन केले. सरतेशेवटी महाराज म्हणाले, "जो माझा असेल | त्याचेच काम होईल | इतरांची ना जरुर मला ||." महाराजांचे म्हणणे आहे की व्यर्थ धार्मिक वादविवादात पडू नका, ते म्हणतात, "कोणी काही म्हणोत | आपण असावे निवांत | तरीच भेटे जगन्नाथ | जगदगुरु जगदात्मा ||."
* '''बायजा माळीण''' - मुंडगावच्या बायजा माळीणीचे लग्न एका [[नपुंसक|नपुंसकाशी]] झाले होते, तिच्या थोरल्या दिराने तिला स्वतःच्या पापवासनेला बळी पाडायचे ठरविले.{{संदर्भ हवा}} परंतु सच्छील बायजाबाई त्याच्या वासनेला बळी पडली नाहीच उलट तिने महाराजांना सदगुरु मानून अखंड भक्तित उर्वरित आयुष घालविले. मुंडगावचाच आणखी एक परमभक्त जो पुंडलिक भोकरे त्याच्यासोबत बायजा शेगावच्या वार्‍या करु लागली, तेव्हा समाजकंटकांनी तिच्या चारित्र्यावर शंका घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी तिच्यावर आलेले चारित्र्यहननाचा बालंट दूर् करून महाराजांनी तिला, 'जशी नामदेवाची जनी, तशीच माझी बायजा' असे सांगून तिच्या भक्तिचा आणि पावित्र्याचा गौरव केला. तसेच महाराजांनी पुंडलिकाला सांगितले की बायजा ही त्याची पूर्वजन्मीची बहिण होती आणि त्याने तिला अंतर देऊ नये. महाराजांचे शब्द पुंडलिकाने अखेरपर्यंत पाळले. बायजाबाईच्या निर्वाणानंतर २८ वर्षांनी (म्हणजे १९६८ मध्ये) पुंडलिकाचे मुंबईत जरी निर्वाण झाले तरीदेखिल त्याच्या शेवटच्या इच्छेनुसार त्याची समाधी मुंडगावी बायजाबाईच्या समाधीजवळच बांधली आहे. जिच्या आयुष्याचे महाराजांनी सोने केले त्या बायजाबाईने १९४० मध्ये पुण्यदिनी देह ठेविला. आज मोठ्या आदराने तिचा "सती बायजाबाई" असा उल्लेख करतात.
* '''बंकटलाल अगरवाल''' - पातुरकरांच्या घरामधिल भेटीनंतर महाराज तेथून वेगाने निघून गेल्याने, बंकटलालाचे मन गुरुमहाराजांच्या भेटीकरिता तळमळू लागल्याने महाराज त्याला पुन्हा शिवमंदिराजवळ भेटले. तोवर बंकटलालाने वाटेमध्ये भेटलेल्या पितांबरासारख्या भोळ्याभाबड्या मित्राला महाराजांच्या थोरवीची कहाणी ऐकविल्याने तोही महाराजांना भेटावयाला उत्सुक होता. पर्यायाने महाराज त्यांना शिवमंदिराजवळ भेटले. तो प्रसंग होता टाकळीकरांच्या किर्तनाचा. भागवताच्या एकादश स्कंधातील ज्या श्लोकाचा पूर्वभाग कीर्तनकार बोलले त्याचा उत्तरार्ध महाराज दूर लिंबाच्या झाडाखाली बसून उच्चारते झाले; कीर्तनकारबुवा थक्कच झाले. त्यानंतर बंकटलाल मोठ्या सन्मानाने महाराजांना स्वगृही घेऊन गेला व त्यांना मोठ्या प्रेमादराने त्यांना तेथे ठेऊन घेतले. परंतु महाराज स्वतः सच्चे परमहंस संन्यासी असल्याकारणाने काही कालावधीनंतर त्यांनी बंकटलालाचे घर सोडून दिले व ते गावातील मारुतिच्या मंदिरात विसावले. महाराजांच्या समाधिनंतर जेव्हा समाधिसमोर अनेक धार्मिक कार्यक्रम झाले त्यात बंकटलालाच्या सुपुत्राने केलेला शतचंडिचे अनुष्ठान अथवा यज्ञ प्रख्यात झाला. त्यासमयी बंकटलालाचा देहांत होण्याचा प्रसंग उद्भवल्याने सर्वच चिंतित झालेले पाहून बंकटलालाने सर्वांना सांगितले, "अरे, माझा तारक समाधिमध्ये बसला असताना तुम्ही कशाला काळजी करता!" त्यांच्या भक्तिनुसार त्यांच्या जीवावरचे संकट टळले आणि यज्ञ सांग झाला. बंकटलालाचे सदन आजही शेगावला पहावयास मिळते; सर्व भक्त्तांनी ते अवश्य जाऊन पहावे.
 
==भक्तिमार्ग==