"गोविंद बल्लाळ देवल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३४:
 
 
गोविंद बल्लाळ देवल यांचा जन्म [[कोकण|कोकणातला]], त्यांचे बालपण [[सांगली]] जिल्ह्यात गेले आणि शालेय शिक्षण [[बेळगाव]] येथे झाले आणि तेथेच ते प्रख्यात नाटककार व अभिनेते [[बळवंत पांडुरंग किर्लोस्कर]] यांच्या संपर्कात आले. शिक्षण पूर्ण झाल्यावर (१८७९) देवल त्याच शाळेत शिक्षक म्हणून काम करीत. बेळगाव येथे असतांनाच देवल यांनी किर्लोस्कर नाटक मंडळीत जाण्यास सुरूवात केली होती. त्यांना त्या नाटक कंपनीत भूमिकाही मिळत गेल्या तसेच किर्लोस्कर यांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही देवल काम करू लागले. १८८५ साली किर्लोस्कर यांच्या निधनानंतरही देवल त्याच संस्थेत दिग्दर्शक म्हणून काम करीत राहिले. काही वर्षांनी (१८९४) मग देवल [[पुणे]] येथील शेतकी शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. मूळ स्वभाव नाटककाराचा असल्याने देवल यांनी पुण्यात आर्योद्धारक नाटक मंडळी नावाची संस्था स्थापन केली. १९१३ साली देवल [[बालगंधर्व | बाल गंधर्व]] यांच्या गंधर्व नाटक मंडळीत गेले.