"चळवळीचे दिवस (आत्मचरित्र)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
(नवीन पान: चळवळीचे दिवस या तीस पानी आत्मचरित्रात्मक पुस्तिकेत प्रखर आंबेडक...)
 
No edit summary
{{पानकाढा|कारण=अवैश्वकोशीय, ललित लेखन}}
चळवळीचे दिवस या तीस पानी आत्मचरित्रात्मक पुस्तिकेत प्रखर आंबेडकरवादी कांबळे सरांच्या बुद्धिवैभवाचा ,नेतृत्वगुणांचा प्रत्यय येतो..यांत नामांतर, मंडल आयोग, बौद्धांच्या सवलती, दलित राष्ट्रपती आदी प्रश्नांवर काम करताना त्यांनी घेतलेल्या भूमिका,वादप्रसंग ,परतवून लावलेली अरिष्टं व त्यांतून साकारणारे लढवय्या वृतीचे कांबळेसर पहावयास मिळतात.
आंबेडकरी चळवळीचे बाळकडू पाजणारे त्यांचे वडील ‘आबा’; हे शंकरराव खरात,बंधूमाधव यांचे शिक्षक.उत्तम गायक असणारे,निरिश्वरवादी,आंबेडकरवादी आबा तक्क्यात(महारांची चावडी) सर्वांसमक्ष ‘प्रबुद्ध भारताचा अंक लहानग्या अरूणकडून वाचून घ्यायचे, लेखन-वाचनाचा पहिला संस्कार सरांवर झाला.सकाळी शाळा,संध्याकाळी ‘सामुदायिक शेती योजना’ राबविणार्या, ,रात्री आंबेडकरांवरील गाणी गाणार्याल आबांनी वाचनालय,बोर्डिंग़ सुरू केले. लोकसेवा वृत्तीची अशी नकळतच घडण होत होती.कविता,वक्तृत्वांत बक्षिसं मिळविणार्याल व पुढे उत्तम व्याख्यानं देणार्याा आपल्या मुलाचे जवाहरलाल नेहरू,यशवंतराव चव्हाण यांची सांगलीच्या ज्या भव्य स्टेजवर भाषणे झाली तिथे भाषण व्हावे ही इच्छा आबांची होती.ती पूर्ण झाल्यावरचा आनंद गगनात न मावणाराच होता.आंबेडकरी चळवळ घरोघरी पोहोचविण्यास वचनबद्ध असलेल्या आबांच्या बहुगुणी व्यक्तिमत्वाचा प्रभाव सरांवर होता. सरांनी ‘नामांतराचे दिवस,’ ‘जनतांदलातील दिवस’ मधून वयाच्या तेवीसाव्या वर्षी दलित पॅंथरचे अध्यक्षपद स्वीकारून आपल्या खंबीर नेतृत्वाने जे महाराष्ट्रव्यापी,देशव्यापी जनांदोलन केले त्याचा वृत्तांत येतो.त्यांनी नामांतरासाठी प्रतिकूल असणार्याख मराठवाड्यातील आमदारांसमोर कांबळेसरांनी ‘डॉ.आंबेडकर व मराठवाडा’ यांचे अतूट नाते स्पष्ट करणारे ओजस्वी भाषण केले व त्यांचे मतपरिवर्तन घडविले.