"बाबूराव गोविंदराव शिर्के" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ८:
त्याच सुमारास [[इ.स. १९४७]] साली वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी त्यांनी ''विजया शिंदे'' यांच्याशी लग्न केले. त्यांच्या पत्नीने शिर्क्यांना उद्योगात वेळप्रसंगी सल्ले देऊन उद्योगाच्या उभारणीस हातभार लावला. ''सिपोरेक्स'' कंपनीच्या उभारणीमध्ये सौ. शिर्के यांचा मोठा सहभाग होता. इ.स. १९५३ सालापर्यंत [[पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठातील]] [[रसायनशास्त्र]] विभागाची पहिली मोठी इमारत, [[वीरचे धरण]] अशी कामे त्यांनी केली व या सुमारास त्यांचा व्यवसाय स्थिरावला होता. इ.स. १९६२ ते इ.स. १९८१ सालापर्यंत किर्लोस्कर कंपनीची पुण्यातील सर्व बांधकामे [[शंतनुराव किर्लोस्कर]] यांनी शिर्क्यांना विना-निविदा देऊ करत, त्यांच्या बांधकाम गुणवत्तेवर विश्वास टाकला.
 
== व्यवसायिक जीवनयश ==
''सिपोरेक्स'' ही बांधकामाचे साहित्य बनवणारी कंपनी भारतात स्थापताना शिर्क्यांना विविध गोष्टींसाठी संघर्ष करावा लागला. शासकीय कारभार, नोकरशाहीतील भ्रष्टाचार, परवाने मिळवण्यातील तांत्रिक अडचणी, भांडवलाची मोठी आवश्यकता यांतून त्यांना वाट काढावी लागली. या सर्व प्रश्नांना तोंड देऊन त्यांनी इ.स. १९७२ साली कारखान्याचे अधिकृत उत्पादन सुरू केले. इ.स. १९७४ साली दुबईतल्या पहिल्या परदेशी कंत्राटाने कंपनी तरली.
कोणतेही काम उत्तम दर्जाचे व वेळेवर करण्याचे बांधकाम शास्त्राचे अर्थशास्त्र बी.जी. शिर्केंनी अंगीकारले आहे. शिर्के यांनी आपल्या व्यवसायाचाच सखोल विचार केला असे नाही, तर आपली शिक्षण पद्धती, सरकारी धोरणे, समाजातील वाढता भ्रष्टाचार, उद्योगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन या सर्व गोष्टींचाही त्यांनी स्वतंत्र अभ्यास केल्याचे जाणवते. एखाद्या महत्त्वाच्या प्रश्नावर, देशाच्या समस्यांवर, व्यापक धोरणविषयक बाबींवर शिर्के महाराष्ट्रातीलच नव्हे तर दिल्लीतीलही अधिकारी व नेत्यांना पोटतिडकीने पत्रे लिहून आपले मत नोंदवतात. या सवयीचा यदा त्यांना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या एका भेटीमध्ये झाला. त्यांची काही पत्रे इंदिरा गांधींनी वाचलेली होती. देशाच्या र्हासाला कारणीभूत असणार्या व बांधकाम क्षेत्रात निर्माण होणार्या काळ्या पैशाची त्यांना प्रचंड चीड होती , आहे.
पुढे १९९३ साली शिर्क्यांच्या कंपनीने [[पुणे|पुण्यातील]] श्री शिवछत्रपती क्रीडानगरी उभारली. मोठ्या प्रमाणावरचे हे काम बी.जी. शिर्के कंपनीने केवळ एक वर्षात पूर्ण केले.
 
 
बांधकाम क्षेत्रात जागतिक स्तरावर एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांनी ख्याती मिळविली. परंतु हे यश मिळविताना, मुख्यत्वे सिपोरेक्स म्हणजे शिर्के हे समीकरण साधताना त्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहिला गेल्याचे दिसून येते. सिपोरेक्स कंपनी (बांधकामाचे साहित्य निर्माण करणारी कंपनी) भारतात स्थापन करताना वेगवेगळ्या गोष्टींसाठी करावे लागणारे संघर्ष, सरकारी कारभार, त्यातील भ्रष्टाचार, तांत्रिक अडचणी, अतोनात लागलेला पैसा यासाठी त्यांचे न मोजता येणारे कष्ट पणाला लागले होते. जागा, भांडवल, परवाने (लायसन्स) यांसारख्या यक्ष प्रश्नांना तोंड देऊन त्यांनी १९७२ मध्ये कारखान्याचे अधिकृत उत्पादन सुरू केले. १९७४ साली दुबईच्या पहिल्या विदेशी कामाने कंपनी तारली गेली. सिपोरेक्समधील मराठी कामगारांनी दुबईमध्ये अनेक मशिदी आणि शेकडो घरे बांधली आहेत.
 
बी. जीं.चे वैशिष्ट्य म्हणजे मोठे होताना ते आपल्या गावाला कधीही विसरले नाहीत. शिर्के यांच्या उद्योगाच्या माध्यमातून कामानिमित्ताने पसरणी गावातील घरटी एक माणूस परदेशात गेलेला आहे. एवढेच नव्हे, या सर्व कामगारांनी बी.जीं.नी गावात सुरू केलेल्या शैक्षणिक संस्थेस मोठी देणगीही दिली आहे. अशाच कामगारांच्या मदतीने बी. जी. शिर्के यांनी १९९३ साली म्हणजे स्वत:च्या वयाच्या ७५ व्या वर्षी पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रिडानगरी उभारली. ह्या क्रीडानगरीत ऑलिंपिक दर्जाचे ९०% खेळ एकाच ठिकाणी, एकाच परिसरात खेळले जाऊ शकतात. एवढे प्रचंड काम बी.जी. शिर्के कंपनीने केवळ एक वर्षात पूर्ण केले. या कामाने शिर्के आत्यंतिक समाधानी आणि मनस्वी आनंदी झाले.
 
बी. जीं ना केवळ पैसा कमवायचा नव्हता, तर बांधकाम क्षेत्रात नवे तंत्र - यंत्र - मंत्र आणून बांधकाम शास्त्राचे औद्योगिकीकरण,आधुनिकीकरण व आदर्श व्यावसायिकीकरण करायचे होते. बांधकामाची जुनी, कालबाह्य निविदा पद्धती, गुणवत्तेपेक्षा व्यक्तीला महत्त्व देण्याची पद्धत त्यांना मोडून काढायची होती. या ध्यासानेच बी. जी. शिर्के सतत ३० वर्षे समाजातील, सरकारमधील विविध प्रवृत्तींशी लढत होते.
 
[[१९८४]] च्या दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री [[वसंतदादा पाटील]] यांनी शिर्के यांच्या आधुनिक तंत्राचा व विचारांचा उपयोग महाराष्ट्राला होईल असे निर्णय शासकीय पातळीवर घेतले. अर्थातच या शासकीय निर्णयांना विरोध झालाच. बी. जीं.ना सतत १३ वर्षे या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी कोर्टाच्या पायर्या चढाव्या लागल्या. शेवटी त्यांचाच विजय झाला आणि या ठरावाच्या आधारावर त्यांना [[महाराष्ट्र विद्यूत महामंडळ]], [[पुणे]] व [[पिंपरी]]-[[चिंचवड]] महानगरपालिका, [[संरक्षण मंत्रालय]], [[कर्नाटक]] व [[आंन्ध्रप्रदेश]] शासनांची कामे-अशी असंख्य महत्त्वाची कामे मिळाली. काही शासकीय संस्थांनी मात्र या काळात त्यांना प्रचंड मनस्ताप दिला. या सगळ्या अनुभवावरूनच ते म्हणतात की, व्यापारी संस्कृती भिनलेल्या लोकांनी पैशाच्या जोरावर उद्योग काढल्याने अप्रामाणिकपणा वाढला आहे, परिणामी हाडाच्या उद्योजकाला वाव मिळत नाही.
 
आजच्या आधुनिक युगात टिकून राहण्यासाठी आपल्या शिक्षण पद्धतीतही त्यांनी काही बदल सुचविले आहेत. स्पर्धेच्या युगात यशस्वीपणे टिकायचे असेल, तर गुणवत्तेला पर्याय नाही असे त्यांना वाटते. मराठी तरुणांनी सकाळी १० ते सायंकाळी ६-नोकरी या संकुचित वृत्तीचा त्याग केला पाहिजे व उद्योग संस्कृती अंगीकारली पाहिजे. सर्व क्षेत्रात मराठी माणूस आघाडीवर असला, तरी व्यापार-उद्योग क्षेत्रात तो मागे आहे. मराठी माणसाने उद्योगातील धोके जाणून कष्ट करण्याची जिद्द ठेवली, तर उद्योग क्षेत्रात मराठी माणूस पुढे येऊ शकेल. ज्या समाजात उद्योजक संस्कृती व व्यापारी संस्कृती वाढीस लागते, त्याच समाजाचा उत्कर्ष होतो. मराठी माणसाला आपली भाषा व संस्कृती टिकवण्यासाठी उद्योजकता आत्मसात करायला हवी.